कास पठारावर चारचाकी वाहनाने धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्या दोन तरुणांवर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. संबंधित तरुणांनी वाहन चालवताना स्वतःच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने स्टंट केल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतीक शिंदे आणि साहिल निकम यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच भविष्यात अशा प्रकारची स्टंटबाजी न करण्याचे त्यांच्याकडून लेखी आश्वासन घेण्यात आले आहे. कास पठारासारख्या संवेदनशील पर्यटन स्थळी अशा प्रकारचे प्रकार होऊ नयेत यासाठी पोलिसांकडून कडक इशारा देण्यात आला आहे.