जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांची महत्त्वाची बैठक आज अंबादास दानवे यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून, ठाकरे गटातील दोन वादग्रस्त सदस्यही उपस्थित राहणार असल्याने वातावरण तापण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दंगा काबू पथकही तैनात करण्यात आले असून प्रशासन सतर्क आहे. बैठकीदरम्यान संबंधित सदस्यांना जाब विचारला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे.