Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला सशक्तीकरणाची प्रेरणादायी कथा सांगणाऱ्या ‘सौभाग्यवती सरपंच’वेबसीरीजचा ट्रेलर रिलीज…

Saubhagyawati Sarpanch Trailer Out : 'सौभाग्यवती सरपंच' ही फक्त एका स्त्रीच्या यशाची कहाणी नाही, तर ती प्रत्येक महिलेच्या संघर्षाला प्रेरणा देणारी आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 18, 2025 | 02:15 PM
महिला सशक्तीकरणाची प्रेरणादायी कथा सांगणाऱ्या ‘सौभाग्यवती सरपंच’वेबसीरीजचा ट्रेलर रिलीज...

महिला सशक्तीकरणाची प्रेरणादायी कथा सांगणाऱ्या ‘सौभाग्यवती सरपंच’वेबसीरीजचा ट्रेलर रिलीज...

Follow Us
Follow Us:

अल्ट्रा झकास, मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म, प्रजासत्ताक दिनानिमित्त खास प्रस्तुती घेऊन येत आहे. ‘सौभाग्यवती सरपंच’ ही ग्रामीण भागातील महिला सशक्तीकरणाचा संदेश देणारी वेब सिरीज 22 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होत असून, १५ जानेवारीला या वेब सिरीजचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. ‘सौभाग्यवती सरपंच’ ही फक्त एका स्त्रीच्या यशाची कहाणी नाही, तर ती प्रत्येक महिलेच्या संघर्षाला प्रेरणा देणारी आहे. महिला सशक्तीकरण हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक असून, स्वातंत्र्य, शिक्षण, आणि नेतृत्व या तीन गोष्टी प्रत्येक महिलेचे हक्क आहेत हेच या वेब सिरीस मधून आपल्याला पाहायला मिळेल.

सैफ अली खाननंतर ‘या’ ८ सेलिब्रेटींचा जीव धोक्यात? सरकारकडून मिळतेय X, Y आणि Z सिक्युरिटी

एका सामान्य गृहिणीच्या कर्तृत्वाचा आणि तिच्या यशाचा प्रवास म्हणजेच ‘सौभाग्यवती सरपंच’. महिला आरक्षित सरपंच पदावर निवडून आल्यानंतर एका सध्या गावातली गृहिणी कशी विकासासाठी स्वतःला झोकून देते आणि रूढीवादी मानसिकतेला कसा प्रतिउत्तर देते, याची प्रेरणादायी कथा या सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येते. अवलीच्या संघर्षाचा आणि यशाचा प्रवास प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी एक संदेश ठरणार आहे – स्वप्न पाहण्याचे आणि ते पूर्ण करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. या सिरीजमध्ये देविका दफ्तरदार, किशोर कदम, आशा ज्ञाते, नागेश भोसले, अश्विनी कुलकर्णी, पद्मनाभ भिंड आणि अन्य प्रमुख कलाकारांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत. संतोष कोल्हे यांनी या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले असून, ही कथा नातेसंबंध, पुरुषप्रधान व्यवस्थेतील मानसिकता, आणि महिला सशक्तीकरण यावर भाष्य करते.

Bigg Boss 18 : अविनाश मिश्रा हा बिग बॉसच्या इतिहासातला सर्वात ‘घमंडी’ स्पर्धक? स्पर्धकांवर मीडियाने लावले आरोप

अल्ट्रा मीडियाचे सीईओ, सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, “‘सौभाग्यवती सरपंच’ ही सिरीज केवळ मनोरंजन देत नाही, तर ती सामाजिक परिवर्तन सुद्धा करते. प्रेक्षकांना या सिरीजमधून महिला सशक्तीकरणाची प्रेरणा मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे. अल्ट्रा झकास नेहमीच प्रेक्षकांसाठी दर्जेदार आणि अर्थपूर्ण कंटेंट आणण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणूनच प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र संधीवर, महाराष्ट्रातील ग्रामीण भारतातील महिलांच्या शक्तीचा हा अनोखा प्रवास ज्यात त्यांनी कधीही न पाहिलेल्या स्वप्नांची भरारी 22 जानेवारीपासून फक्त अल्ट्रा झकासवर ‘सौभाग्यवती सरपंच’ तुम्हाला पाहायला मिळेल.

Web Title: Inspiring story of womens empowerment saubhagyawati sarpanch trailer released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2025 | 02:15 PM

Topics:  

  • marathi film

संबंधित बातम्या

Bandhu Movie: भावाच्या गोष्टीत बहिणींच्या नात्याचा हळवा स्पर्श; ‘बंधू’ चित्रपटात मृण्मयी देशपांडे आणि स्मिता तांबे प्रथमच एकत्र
1

Bandhu Movie: भावाच्या गोष्टीत बहिणींच्या नात्याचा हळवा स्पर्श; ‘बंधू’ चित्रपटात मृण्मयी देशपांडे आणि स्मिता तांबे प्रथमच एकत्र

Bandhu Marathi Movie: प्रेम, जिव्हाळा आणि त्यागाची कहाणी; ‘बंधू’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित
2

Bandhu Marathi Movie: प्रेम, जिव्हाळा आणि त्यागाची कहाणी; ‘बंधू’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.