Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bandhu Marathi Movie: प्रेम, जिव्हाळा आणि त्यागाची कहाणी; ‘बंधू’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Bandhu Marathi Movie: दोन भावांमधील प्रेम, मतभेद, दुरावा आणि त्यागाची हृदयस्पर्शी गोष्ट सांगणाऱ्या ‘बंधू’ या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत दाखल होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 31, 2026 | 04:41 PM
प्रेम, जिव्हाळा आणि त्यागाची कहाणी; ‘बंधू’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

प्रेम, जिव्हाळा आणि त्यागाची कहाणी; ‘बंधू’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Follow Us
Follow Us:
  • दोन भावांच्या नात्याची हळवी गोष्ट!
  • ‘बंधू’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित
  • ‘बंधू’ चित्रपट २० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
Bandhu Marathi Movie: भाऊ-भावामधील नातं हे प्रेम, जिव्हाळा, मतभेद आणि त्याग अशा अनेक भावनांनी गुंफलेलं असतं. कधी भांडणं, कधी रुसवे-फुगवे, तर कधी एकमेकांच्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणं, हे या नात्याचे वेगवेगळे पैलू असतात. याच अतूट भावबंधांची हृदयस्पर्शी गोष्ट घेऊन येणाऱ्या ‘बंधू’ या आगामी मराठी चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.(Bandhu Marathi Movie)

गीतकार गुरु ठाकूर यांच्या शब्दांतून व्यक्त झालेलं ‘भाऊ काय, बंधू काय… जणू दूध आणि साय!’ हे नातं ट्रेलरमधून उलगडताना दिसतं. उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांच्या दमदार अभिनयाची झलक असलेला हा ट्रेलर दोन भावांमधील प्रेम, मतभेद आणि भावनिक गुंतागुंत दाखवतो. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच सोशल मीडियावर त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला असून, तो ट्रेंडिंगमध्येही आला आहे.

‘पंजाबी लोकांना लढायला शिकवू नका’; CJP आंदोलनावरून दिलजीत दोसांझ चर्चेत! समाजाबद्दलच्या वक्तव्यावर अभिजीत दिपके काय म्हणाले?

दमदार कलाकारांची फळी

रजत बेदी प्रस्तुत, जे एस् डी स्टुडिओ आणि ट्राईफ्लिक्स एंटरटेनमेंट यांच्या सहकार्याने हा चित्रपट साकारला आहे. प्रणव देसाई, जुही देसाई आणि कुलदीप सुनील ओझा यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. लेखन, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी सांभाळली आहे.

‘आटपाडी नाईट्स’ आणि ‘सरला एक कोटी’ या चित्रपटांनंतर नितीन सुपेकर पुन्हा एकदा मानवी नात्यांच्या भावविश्वाचा वेध घेणारी कथा घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहेत. उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांच्यासोबत मिताली जगताप आणि मृण्मयी देशपांडे महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. रेणुका दफ्तरदार, स्मिता तांबे, श्रीकांत यादव, विठ्ठल काळे, यशपाल सरणात, ज्ञानरत्न अहिवळे, चैतन्य सोलणकर, श्रीपाद पानसे यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटात आहेत.

संगीताचीही सुरेल साथ

चित्रपटातील गीतांना गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख यांनी शब्दबद्ध केले असून, विजय नारायण गवंडे यांनी संगीत दिले आहे. अजय गोगावले, अतुल गोगावले, अमिता घुगरी आणि शमिका भिडे यांच्या आवाजाने गाण्यांना सुरेल साथ लाभली आहे. गाण्यांचे संगीत हक्क झी म्युझिककडे आहेत.

‘बंधू’च्या ट्रेलर लाँच सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार रामदास आठवले यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. त्यांनी ट्रेलरचे कौतुक करत संपूर्ण टीमला चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. प्रेम, जिव्हाळा आणि त्यागाची जाणीव करून देणारा ‘बंधू’ हा चित्रपट २० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Avinash Narkar emotional video : ‘हे होतं रिल,आता रिअल मध्ये सांगतो’; अविनाश नारकरांचा भावनिक व्हिडिओमागचं सत्य उघड

💡

Frequently Asked Questions

  • Que: ‘बंधू’ चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे?

    Ans: ‘बंधू’ हा मराठी चित्रपट २० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

  • Que: ‘बंधू’ चित्रपटात प्रमुख भूमिका कोण साकारत आहेत?

    Ans: उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी दोन भावांच्या प्रमुख भूमिका साकारत आहेत. त्यांच्या सहचारिणींच्या भूमिकेत मिताली जगताप आणि मृण्मयी देशपांडे दिसणार आहेत.

  • Que: ‘बंधू’ चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन कोणी केले आहे?

    Ans: या चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी केले आहे.

Web Title: Bandhu marathi movie trailer released upendra limaye jitendra joshi sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • marathi film
  • marathi movie

संबंधित बातम्या

Shital Upare Engagement: अभिनेत्री शितल उपरेने उरकला साखरपुडा! अमित सिंह यांच्यासोबतच्या रोमँटिक फोटोंनी वेधले लक्ष
1

Shital Upare Engagement: अभिनेत्री शितल उपरेने उरकला साखरपुडा! अमित सिंह यांच्यासोबतच्या रोमँटिक फोटोंनी वेधले लक्ष

Maharashtra Epstein Files: ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’मधील भोंदूबाबाचे रहस्य उलगडणार! मनोज जोशींचा दमदार लूक रिव्हील
2

Maharashtra Epstein Files: ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’मधील भोंदूबाबाचे रहस्य उलगडणार! मनोज जोशींचा दमदार लूक रिव्हील

Phulpakharu Song: आई-मुलीच्या नात्याची हळवी गोष्ट; चिमुकल्या परीच्या निरागस दुनियेची सफर घडवणारं ‘फुलपाखरू’ गाणं प्रदर्शित!
3

Phulpakharu Song: आई-मुलीच्या नात्याची हळवी गोष्ट; चिमुकल्या परीच्या निरागस दुनियेची सफर घडवणारं ‘फुलपाखरू’ गाणं प्रदर्शित!

Maitreya Movie:  मैत्रीचं प्रेमात रूपांतर! ‘मैत्रेया’मधील ‘तुला पाहते’ हे रोमँटिक गाणं रिलीज
4

Maitreya Movie: मैत्रीचं प्रेमात रूपांतर! ‘मैत्रेया’मधील ‘तुला पाहते’ हे रोमँटिक गाणं रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.