Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bandhu Movie: भावाच्या गोष्टीत बहिणींच्या नात्याचा हळवा स्पर्श; ‘बंधू’ चित्रपटात मृण्मयी देशपांडे आणि स्मिता तांबे प्रथमच एकत्र

Bandhu Movie: भावा-बहिणीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि भावनिक गुंफण उलगडणाऱ्या ‘बंधू’ या आगामी मराठी चित्रपटात अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि स्मिता तांबे प्रथमच एकत्र झळकणार आहेत. भावाच्या गोष्टीसोबतच बहिणींच्या नात्याचा हळवा स्पर्श या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 04, 2026 | 03:29 PM
भावाच्या गोष्टीत बहिणींच्या नात्याचा हळवा स्पर्श; ‘बंधू’ चित्रपटात मृण्मयी देशपांडे आणि स्मिता तांबे प्रथमच एकत्र

भावाच्या गोष्टीत बहिणींच्या नात्याचा हळवा स्पर्श; ‘बंधू’ चित्रपटात मृण्मयी देशपांडे आणि स्मिता तांबे प्रथमच एकत्र

Follow Us
Follow Us:
  • भावाच्या गोष्टीत बहिणींच्या नात्याचा हळवा स्पर्श
  • ‘बंधू’मध्ये मृण्मयी देशपांडे आणि स्मिता तांबे प्रथमच एकत्र!
  • भावंडांच्या नात्याची अनोखी गोष्ट उलगडणार
Bandhu Movie: बहिणींचं नातं म्हणजे कधी मैत्री, कधी भांडणं, तर कधी न बोलताही एकमेकींच्या मनाचा ठाव घेणारी हक्काची साथ! हेच नातं अधिक जवळून अनुभवण्याची संधी ‘बंधू’ या आगामी चित्रपटातून मिळणार आहे. विशेष म्हणजे, मृण्मयी देशपांडे आणि स्मिता तांबे या दोन कसलेल्या अभिनेत्री पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर बहिणींच्या भूमिकेत दिसणार आहेत. रजत बेदी प्रस्तुत, जे एस् डी स्टुडिओ आणि ट्राईफ्लिक्स एंटरटेनमेंट यांच्या सहकार्याने साकारलेल्या या चित्रपटाची निर्मिती प्रणव देसाई, जुही देसाई आणि कुलदीप सुनील ओझा यांनी केली आहे. चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी केले आहे. ‘बंधू’ चित्रपट येत्या २० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. (Bandhu Movie)

‘बंधू’ हा चित्रपट भावाभोवती केंद्रित असला, तरी त्यातील विविध नात्यांचे भावविश्वही तितकेच महत्त्वाचे आहे. याच भावविश्वात मृण्मयी देशपांडे आणि स्मिता तांबे यांनी एकमेकींसोबत साकारलेले सख्ख्या बहिणींचे नाते विशेष ठरणार आहे. छोट्या-मोठ्या कुरबुरींपासून एकमेकींच्या सुख-दुःखात खंबीरपणे साथ देण्यापर्यंत, या नात्यातील हळवे क्षण आणि भावनिक गुंतवणूक चित्रपटातून उलगडणार आहे. एकमेकींच्या प्रतीची आपुलकी आणि समजूतदारपणा यांचा सुंदर अनुभव या दोघींच्या अभिनयातून निश्चित मिळणार आहे.

गाण्यांनंतर आता अभिनयात धडक! लोकप्रिय गायिका Pragati Nagpal ची मोठ्या पडद्यावर एन्ट्री; ‘पार्टी ॲनिमल्स’ चित्रपटातून पदार्पण

मृण्मयी देशपांडे सांगते, ‘बंधू’ ही केवळ दोन भावांची गोष्ट नाही, तर कुटुंबांतील नात्यांमधील प्रेम, जिव्हाळा आणि भावनिक गुंतवणूक उलगडणारी कथा आहे. या चित्रपटातील बहिणींचं नातं अतिशय आपुलकीचं आणि हळवं आहे. स्मिताताईंसोबत पहिल्यांदाच एकत्र काम करण्याचा अनुभव खूप छान होता. एकमेकींच्या भावना समजून घेत हे नातं पडद्यावर साकारताना एक वेगळीच केमिस्ट्री अनुभवायला मिळाली. हे नातं प्रेक्षकांनाही नक्कीच भावेल, अशी आशा आहे.”

आपल्या भूमिकेविषयी बोलताना स्मिता तांबे म्हणतात, “बहिणीचं नातं खूप खास असतं. या नात्यात प्रेम असतं, भांडणं असतात, एकमेकींची काळजी असते आणि अनेकदा न बोलताही एकमेकींच्या मनातलं ओळखण्याची ताकद असते. ‘बंधू’मधून हे नातं साकारताना त्यातील विविध भावनांशी जोडून घेता आलं, याचा मला खूप आनंद आहे. हे नातं पडद्यावर साकारताना त्यातील हळवेपणा आणि आपलेपणा जपण्याचा प्रयत्न केला आहे.”

चित्रपटातील ‘बंधू रामाचा’ हे पाळणागीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. निरागस प्रेमाची भावस्पर्शी अनुभूती देणारं हे पाळणागीत प्रेक्षकांना एका सुरेल भावविश्वात घेऊन जाणार आहे. या गाण्यात मृण्मयी आणि स्मिता पाहायला मिळणार आहे. या गाण्याचे शब्द वैभव देशमुख यांनी लिहिले असून, विजय नारायण गवंडे यांनी त्याला सुरेल संगीताची साथ दिली आहे. अमिता घुगरी आणि शमिका भिडे यांच्या आवाजाने हे पाळणागीत अधिकच श्रवणीय झालं आहे. या चित्रपटातील गाण्यांचे संगीत हक्क झी म्युझिककडे आहेत. दोन कसलेल्या अभिनेत्रींचा सहजसुंदर अभिनय आणि बहिणींच्या नात्यातील भावनिक पदर यांमुळे ‘बंधू’मधील ही बहिणींची जोडी देखील प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

भाईजान नव्या अंदाजात…Salman Khan च्या आवाजातील ‘तेरी सेक्सी ब्यूटी’ गाणे रिलीज; चित्रांगदा सिंहचा ग्लॅमरस अंदाज चर्चेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: ‘बंधू’ चित्रपटात कोणत्या दोन अभिनेत्री प्रथमच एकत्र दिसणार आहेत?

    Ans: ‘बंधू’ चित्रपटात मृण्मयी देशपांडे आणि स्मिता तांबे या दोघी प्रथमच एकत्र झळकणार आहेत.

  • Que: ‘बंधू’ चित्रपटाची कथा कोणत्या नात्यावर आधारित आहे?

    Ans: या चित्रपटात भावंडांच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि भावनिक बंध यांचा वेध घेण्यात आला आहे. विशेषतः बहिणींच्या नात्याचा हळवा स्पर्शही पाहायला मिळणार आहे.

  • Que: ‘बंधू’ चित्रपटात काय खास पाहायला मिळणार आहे?

    Ans: भावाच्या गोष्टीसोबतच बहिणींच्या नात्यातील भावना आणि कौटुंबिक नात्यांची गुंफण या चित्रपटाचे खास आकर्षण असणार आहे.

Web Title: Mrunmayee deshpande smita tambe first time together bandhu marathi film sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • marathi film
  • marathi movie
  • Smita Tambe

संबंधित बातम्या

‘अबीर’ चित्रपटातील ‘गुडघ्याला बाशिंग बांधलं…’ गाण्यात मानसी शिंदेच्या लावणीचा ठसकेबाज ठेका!
1

‘अबीर’ चित्रपटातील ‘गुडघ्याला बाशिंग बांधलं…’ गाण्यात मानसी शिंदेच्या लावणीचा ठसकेबाज ठेका!

Jai Shree Ram Marathi Movie: अयोध्येतील राम मंदिरानंतर पाकिस्तानमध्ये काय घडलं? ‘जय श्री राम’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात
2

Jai Shree Ram Marathi Movie: अयोध्येतील राम मंदिरानंतर पाकिस्तानमध्ये काय घडलं? ‘जय श्री राम’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात

Chikizing Movie: ‘चला चला मामाच्या गावाला…’ म्हणत उपेंद्र लिमये घेऊन येणार बालपणीच्या आठवणींची सफर; ‘चिकीझिंग’चे गाणे रिलीज
3

Chikizing Movie: ‘चला चला मामाच्या गावाला…’ म्हणत उपेंद्र लिमये घेऊन येणार बालपणीच्या आठवणींची सफर; ‘चिकीझिंग’चे गाणे रिलीज

Ant Ek Prarambh: अतुल परचुरेंचा शेवटचा चित्रपट OTTवर; ‘अंत एक प्रारंभ’मधून मिळणार अभिनयाची अनमोल भेट
4

Ant Ek Prarambh: अतुल परचुरेंचा शेवटचा चित्रपट OTTवर; ‘अंत एक प्रारंभ’मधून मिळणार अभिनयाची अनमोल भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.