Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुरुपौर्णिमा विशेष, अद्वितीय स्वामी समर्थांची लीला उलगडणार ‘नामस्मरणाचे’ महात्म्य

कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत या आठवड्यात बघायला मिळणार आहे गुरुपौर्णिमा विशेष भाग. अध्यात्म, परंपरा आणि भक्तीने न्हालेलं अक्कलकोट गाव यंदा गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका विलक्षण साक्षात्काराचं साक्ष बनणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jul 09, 2025 | 07:38 PM
गुरुपौर्णिमा विशेष, अद्वितीय स्वामी समर्थांची लीला उलगडणार 'नामस्मरणाचे' महात्म्य

गुरुपौर्णिमा विशेष, अद्वितीय स्वामी समर्थांची लीला उलगडणार 'नामस्मरणाचे' महात्म्य

Follow Us
Close
Follow Us:

कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत या आठवड्यात बघायला मिळणार आहे गुरुपौर्णिमा विशेष भाग. अध्यात्म, परंपरा आणि भक्तीने न्हालेलं अक्कलकोट हे गाव यंदा गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका विलक्षण साक्षात्काराचं साक्ष बनणार आहे. एकीकडे पारंपरिक कर्मकांडांवर विश्वास ठेवणारा प्रतिष्ठित ब्राह्मण आणि दुसरीकडे श्रम करताना अखंड नाम घेणारा एक साधा शेतकरी यांच्यातील अदृश्य वैचारिक संघर्ष अक्कलकोटच्या अध्यात्मिक वातावरणात गूढतेचं सावट निर्माण करतात.

सती प्रथेवर आधारित ‘सत्यभामा’ चित्रपटाचा पोस्टर रिलीज; सिनेमा केव्हा रिलीज होणार ?

गावभर गुरुपौर्णिमेची जय्यत तयारी सुरू असताना, अक्कलकोट स्वामींच्या एका अनपेक्षित निर्णयामुळे सर्व भक्तगण आणि सेवेकरी चक्रावून गेले आहेत. स्वामींनी उत्सवाचं केंद्रस्थान अचानक बदलल्याने, एकच चर्चा सुरू आहे “गुरुपौर्णिमेच्या या भक्तीमय सोहळ्यात प्रत्यक्ष गुरू स्वतः कोणाच्या हातात हात घालून अवतरतील?” यंदाची गुरुपौर्णिमा केवळ धार्मिक विधी न राहता, ती एक अंतर्मनाचा शोध घेणारी अंतर्बिंबनाची प्रक्रिया ठरणार आहे. स्वामींच्या कृपेने अक्कलकोटमध्ये उलगडत आहे – एका साध्याशा शेतकऱ्याच्या नितळ श्रद्धेतून साकारलेलं दिव्य सत्य – जिथे पूजा नाही, समारंभ नाही, पण “नाम” आहे… आणि नामातूनच गुरूचे साक्षात दर्शन आहे. स्वामी समर्थ कसे पटवून देणार नामस्मरणाचे महत्व, मालिकेत कसा साजरा होणार हा गुरुपौर्णिमेचा दिवस. पहा जय जय स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा विशेष या आठवड्यात रात्री ८ वा. आपल्या कलर्स मराठीवर.

प्रिया बापट- उमेश कामत तब्बल १२ वर्षांनी चित्रपटात एकत्र झळकणार; सोबतीला असणार ‘हे’ कलाकार, पोस्टर रिलीज

स्वतःला ज्ञानी, कर्मनिष्ठ मानणाऱ्या मधुकरचा आत्मविश्वास ठाम आहे की हाच क्षण त्याच्यासाठीच आहे. यज्ञ, होम, विधी आणि कर्मकांड यांतूनच तो ईश्वरप्राप्तीचा मार्ग शोधतो. त्याच्या श्रद्धेला गरिमा आहे पण अहंकाराचं सावटही आहे. तर दुसरीकडे आहे सुदाम शेतात राबणारा, देवळात कधीही न गेलेला, पण गुरूचं नाम मनापासून घेत राहणारा एक शेतकरी. त्याची श्रद्धा गूढ आहे कारण ती प्रदर्शनातून नव्हे तर कर्मातून व्यक्त होते. तो मान मिळवण्याच्या स्पर्धेत नाही, पण त्याच्या जीवनशैलीत गुरूकृपेची निशाणी स्पष्ट जाणवते. ही गोष्ट आहे – श्रद्धा आणि अहंकार, कर्मकांड आणि साधेपणा, यज्ञ आणि नाम यांच्यातल्या संघर्षाची. आणि या संघर्षातूनच उलगडतेय एक अलौकिक लीला जिथे “नाम” हे केवळ शब्द नाही, तर अंतरात्म्याला स्पर्श करणारा दिव्य अनुभव आहे.

राजकुमार- पत्रलेखा देणार ‘गोड बातमी’, लग्नाच्या साडेतीन वर्षांनंतर होणार आई- बाबा

स्वामींच्या लीलेतून आणि त्यांच्या मौन शिकवणीतून हे अधोरेखित होतंय की, ईश्वरप्राप्तीसाठी ना पोथी लागते, ना समारंभ… लागते ती मनापासूनची भक्ती. आणि याच निष्ठेच्या प्रकाशात साकार होते एक विलक्षण सत्य: नामस्मरण हे आधुनिक काळातलं मेडिटेशन आहे, जे आत्म्याला जागं करतं, मन शांत करतं, आणि श्रद्धेला सामर्थ्य देतं. याची प्रचिती यंदाच्या जय जय स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा विशेष भागात प्रेक्षकांना येणार आहे.

Web Title: Jai jai swami samarth colours marathi serial track guru purnima special swami samarth leela will reveal the greatness of namasmarana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 07:37 PM

Topics:  

  • colrs marathi serials
  • marathi serial update
  • tv serial

संबंधित बातम्या

विल स्मिथ करणार ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मध्ये धमाकेदार एन्ट्री? मालिकेत नवं वळण!
1

विल स्मिथ करणार ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मध्ये धमाकेदार एन्ट्री? मालिकेत नवं वळण!

दूरदर्शनवरील ‘या’ मालिकेच्या एका भागाचा झाला होता विरोध, ५०० टॅक्सी ड्रायव्हरांचे आंदोलन, ४० वर्षांनंतरही आठवण ताजी
2

दूरदर्शनवरील ‘या’ मालिकेच्या एका भागाचा झाला होता विरोध, ५०० टॅक्सी ड्रायव्हरांचे आंदोलन, ४० वर्षांनंतरही आठवण ताजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.