Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आई तुळजाभवानी’ मालिकेत सुरभी हांडेची एन्ट्री! साकारणार म्हाळसाची भूमिका

महाराष्ट्राची कुलस्वामिनी 'आई तुळजाभवानी' मालिकेत आतापर्यंत देवीचे अनेक अवतार पाहायला मिळाले. आता म्हाळसा देवीच्या भूमिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री सुरभी हांडेची मालिकेत एन्ट्री होणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 07, 2024 | 06:31 PM
'आई तुळजाभवानी' मालिकेत सुरभी हांडेची एन्ट्री! साकारणार म्हाळसाची भूमिका

'आई तुळजाभवानी' मालिकेत सुरभी हांडेची एन्ट्री! साकारणार म्हाळसाची भूमिका

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्राची कुलस्वामिनी ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत आतापर्यंत देवीचे अनेक अवतार पाहायला मिळाले आहेत. देवीच्या विविध अवतारांचा हा आध्यात्मिक प्रवास प्रेक्षकांसाठी निश्वितच वेगळा ठरत आहे. अशातच आता म्हाळसा देवीच्या भूमिकेद्वारे घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री सुरभी हांडेची या मालिकेत एन्ट्री होणार आहे. ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत सुरभी म्हाळसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका प्रेक्षकांना दररोज रात्री 9 वा. ‘कलर्स मराठी’वर पाहता येईल. या भागामध्ये म्हाळसा देवी आई तुळजा भवानीचे नव्या प्रवासात अनोख्या पद्धतीने स्वागत करताना दिसणार आहे.

मुनव्वर फारुकीच्या मुलाला झालाय ‘हा’ गंभीर आजार, अभिनेत्याने सांगितला कठीण काळातला किस्सा

तुळजा आणि म्हाळसा मिळून दुर्जनानांचा संहार कसा करतील हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. म्हाळसा या पात्राच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात सुरभी हांडेने आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. आता ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेच्या माध्यमातून सुरभी प्रेक्षकांवर छाप पाडायला सज्ज आहे. चेहऱ्यावर भक्तीमय तेज, आकर्षक दागिने, पारंपारिक साडी, प्रभावशाली असं दैवी व्यक्तिमत्त्व म्हाळसाच्या रुपात पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘आई तुळजाभवानी’ मालिकेच्या कथानकाने वेग पकडला असून असुरांपासून भक्तांचे रक्षण करण्यासाठी म्हाळसा तुळजाला पाठिंबा देताना दिसून येईल.

अखेर शशांक केतकरच्या प्रयत्नांना यश, BMC ला धन्यवाद तर दिले पण मारला एक पुणेरी टोमणा!

सुरभी हांडे म्हणाली,”10 वर्षांनी पुन्हा एकदा म्हाळसा सर्वांसमोर येतेय याचा आनंद आहे. म्हाळसाला बघायला प्रेक्षकांना जसं आवडतं तसंच ते पात्र साकारायला मला आवडतं. हे पात्र माझ्यासाठी नेहमीच खास होतं. आता ‘आई तुळजाभवानी’ या पात्राच्या माध्यमातून मला म्हाळसाला न्याय देण्याची एक चांगली संधी मिळाली आहे”.

सुरभी पुढे म्हणाली,’आई तुळजाभवानी’सह म्हाळसा जेव्हा असूरांसोबत युद्ध करते असा सीन शूट करताना मला वाटत होतं की, दोन स्त्रीशक्ती कोणासोबत तरी लढत आहेत. पूजासोबत काम करताना खूप छान वाटलं..तिचंही कौतुक वाटलं. ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत म्हाळसा हे पात्र साकारण्याची संधी दिल्याबद्दल ‘कलर्स मराठी’ आणि बहुरुपी प्रोडक्शनचे आभार”.

‘पुष्पा 2’च्या प्रिमियरमध्ये चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांना अभिनेत्याकडून मदतीचं आश्वासन

Web Title: Jai malhar actress marathi actress mhalsa aka surabhi hande entry in aai tuljabhavani serial with aai tulja bhawani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2024 | 06:31 PM

Topics:  

  • colors marathi

संबंधित बातम्या

Colors Marathi Serial: नियतीचा खेळ सुरू; ‘आई तुळजाभवानी’ मध्ये जगदंबा आणि महादेव यांची अद्भुत भेट
1

Colors Marathi Serial: नियतीचा खेळ सुरू; ‘आई तुळजाभवानी’ मध्ये जगदंबा आणि महादेव यांची अद्भुत भेट

Colors Marathi Serial: ‘बाईपण जिंदाबाद!’चा नवा टप्पा, ‘शर्ट’मध्ये दिसणार बदलत्या स्त्रीविश्वाची कथा
2

Colors Marathi Serial: ‘बाईपण जिंदाबाद!’चा नवा टप्पा, ‘शर्ट’मध्ये दिसणार बदलत्या स्त्रीविश्वाची कथा

Exclusive: ‘अजूनही कॉमिक टायमिंगचं टेन्शन येतं, पण अशोकजी खूप चांगलं सांभाळून घेतात’ – निवेदिता सराफ
3

Exclusive: ‘अजूनही कॉमिक टायमिंगचं टेन्शन येतं, पण अशोकजी खूप चांगलं सांभाळून घेतात’ – निवेदिता सराफ

जय जय स्वामी समर्थ; स्त्रीशक्ती, भक्ती आणि चमत्कार यांचा संगम असलेला विशेष आठवडा!
4

जय जय स्वामी समर्थ; स्त्रीशक्ती, भक्ती आणि चमत्कार यांचा संगम असलेला विशेष आठवडा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.