'जय माताजी लेट्स रॉक' फुल्ल ऑन फॅमिली ड्रामा, टीकू तलसानिया आजारपणानंतर दिसणार पहिल्यांदाच चित्रपटात
गुजराती चित्रपट ‘जय माताजी लेट्स रॉक’ चा भव्य प्रीमियर मुंबईत आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये चित्रपटाचे मुख्य कलाकार मल्हार ठाकोर, टीकू तलसानिया, वंदना पाठक, नीला मूल्हेरकर, व्योमा नंदी, शेखर शुक्ला, आर्यन प्रजापती आणि उत्कर्ष मजूमदार उपस्थित होते.
“आपल्यासाठी नाही किमान आईसाठी तरी…”, मातृदिनानिमित्त अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा आईसाठी खास संदेश
फॅमिली फ्लिक्सच्या बॅनरखाली एन अहमदाबाद फिल्म्स प्रॉडक्शनने निर्मित केलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष सैनी यांनी केले आहे. या मनोरंजनपूर्ण कॉमेडी-ड्रामा चित्रपटाचे निर्माते सिद्धार्थ वडोदऱिया, काजल वडोदऱिया आणि रवींद्र संघवी आहेत. मनीष सैनी आणि आकाश जे.एच. शाह यांनी निर्मित व सचिन पटेल यांनी सहनिर्मित केलेल्या या चित्रपटाचे संवाद मनीष सैनी आणि निरन भट्ट यांनी लिहिले आहेत. याशिवाय, चित्रपटाचे एसोसिएट प्रोड्यूसर अनिरुद्ध सिंग रैहवार आहेत. उत्कर्ष मजूमदार, आर्यन प्रजापती, शिल्पा ठाकोर इत्यादी कलाकारही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. चित्रपटाला नाईट सॉन्ग रेकॉर्ड्सने संगीत दिले असून गीतांचे शब्दभार्गव पुरोहित यांनी लिहिले आहेत.
‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीने सांगितल्या आईबद्दलच्या खास गोष्टी; पाहा Video
हा चित्रपट एका ८० वर्षीय आजीच्या अनोख्या प्रवासाची कथा सांगतो, ज्या आजींचे शांत आणि साधे आयुष्य एका सरकारी योजनेमुळे अचानक बदलते. आजी आता स्वतःच्या अटींवर जीवन जगायचा निर्णय घेतात, आणि यानंतर सुरू होते मस्ती, मजा आणि कौटुंबिक चढउतारांनी भरलेली एक प्रवासकथा. चित्रपटात भरपूर हास्य आहे, तरीही तो वृद्ध लोकांचे समाजातील स्थान, आर्थिक संघर्ष आणि कुटुंबाचे महत्त्व यावर तीव्र सामाजिक भाष्य करतो.
भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर दीपिका कक्करची पोस्ट चर्चेत, म्हणाली- ‘देश युद्धबंदीचे उल्लंघन…’
दिग्दर्शक मनीष सैनी सांगतात, “या चित्रपटात आम्ही कौटुंबिक नाती आणि समाजातील गुंतागुंत एका अनोख्या आणि मजेशीर शैलीत सादर केली आहे. ही ८० वर्षांची आजी आहे, पण साधी-सरळ आजी नाही! त्या स्वतःच्या अटींवर जीवन जगण्यास तयार आहेत. संपूर्ण कास्ट आणि टीमने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आमचा हा चित्रपट प्रेक्षकांना एक अनोखा मनोरंजनाचा अनुभव देईल, जो हसवेलही आणि विचार करायलाही लावेल.” गुजराती सिनेमात कौटुंबिक हास्य आणि अर्थपूर्ण संदेश घेऊन येत असलेला ‘जय माताजी लेट्स रॉक’ – ९ मे २०२५ पासून आपल्या जवळच्या सिनेमागृहात