अल्ट्रा झकासवर नवीन वर्षाच्या सुरुवातीला मिळणार नव्या कलाकृतींची मेजवानी, पाहा यादी
अल्ट्रा झकास मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म 2025 ची सुरुवात धमाकेदार मनोरंजनाच्या खजिन्याने करत आहे. यात प्रेक्षकांना नव-नव्या मराठी ओरीजनल वेबसीरिज पहायला मिळतील, ज्यामध्ये दमदार कथा, जबरदस्त अभिनयांचा अनुभव घेता येईल. यासोबतच प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा एक बहुचर्चित मराठी चित्रपटही या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. आणि थांबा, एवढ्यावरच नाही तर अल्ट्रा झकास तुमच्यासाठी हॉलिवूड आणि साऊथ सिनेमांचे डब चित्रपटही घेऊन येत आहे. प्रत्येक सिनेमा आणि वेबसीरिज तुम्हाला नवीन वर्षात वेगळीच मजा देऊन जाईल!
सौभाग्यवती सरपंच
महिला सशक्तीकरणाची प्रेरणादायी कहाणी!
अल्ट्रा झकासची पहिली ओरीजनल वेब सिरीज ‘IPC’ च्या यशानंतर नवीन वर्षाच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा नवी कोरी ओरिजिनल वेब सिरीज घेऊन येण्यास अल्ट्रा झकास तयार आहे. ‘सौभाग्यवती सरपंच’ हि वेब सिरीज 22 जानेवारी 2025 रोजी तुमच्या भेटीला येत असून आज 10 जानेवारी 2025 रोजी या चित्रपटाचा धमाकेदार पोस्टर प्रदर्शित झाला आहे याचे दिग्दर्शन ‘संतोष कोल्हे’ यांनी केले असून हि सिरीज स्वबळावर लढणाऱ्या एका महिलेची कहाणी आहे जी आपल्या कुटुंबासोबत गावच्या सरपंच पदाची शिदोरी हाती घेते. या सिरीजमध्ये देविका दफ्तरदार, किशोर कदम, आशा ज्ञाते, नागेश भोसले, अश्विनी कुलकर्णी, पद्मनाभ भिंड, नित्या पवार मुख्य भूमिकेत पाहायला मिळतील.
रुखवत
थरारक आणि रहस्यमय अनुभव!
नुकताच डिसेंबर २०२४ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला चित्रपट सुशील कुमार अग्रवाल, अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंट ग्रुप प्रस्तुत आणि राबरी एन्टरटेन्मेंट निर्मित ‘रुखवत’ चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये जोरदार धुमाकूळ घातला होता याच प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादामुळे या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर २६ जानेवारी २०२५ ला अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर होणार आहे. या चित्रपटाची कथा एका कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या ग्रुपची आहे, जे शैक्षणिक सहलीसाठी एका प्राचीन वाड्यात जातात. त्या वाड्यात त्यांना ‘रुखवत’ सापडते आणि तेच ‘रुखवत त्या सर्वांना खेळवून ठेवते. आता त्या वाड्याचा आणि त्या रुखवतचा काय इतिहास? या सर्वाचा उलगडा या चित्रपटात पहायला मिळेल. दरम्यान या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील अशोक समर्थ, अभिजीत चव्हाण, राजेंद्र शिसातकर आदी कलाकार देखील मुख्य भूमिकेत दिसून येतील.
संगीतप्रेमींसाठी पर्वणी; सुरेश वाडकरांसह महेश काळेपर्यंत… महाकुंभ २०२५ मध्ये होणार सुरांची बरसात
Bending The Rules [बेंडिंग द रुल्स]
हॉलीवूड ॲक्शन आणि कॉमेडीचा अफलातून संगम!
हा एक ॲक्शन आणि कॉमेडीने परिपूर्ण चित्रपट आहे, जो प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. हा चित्रपट ३ जानेवारी २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची कथा थिओ गोल्ड (जेमी केनेडी) या न्यू ऑरलियन्स कोर्टातील गरम डोक्याच्या वकिलाची आहे, जो नेहमीच नियमांमध्ये राहून लढण्यावर विश्वास ठेवतो. दुसरीकडे, निक ब्लेड्स (ॲडम ‘एज’ कोपलँड) हा एक पोलीस अधिकारी आहे, ज्याला नियम मोडल्यामुळे निलंबित केले जाते. या दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्तींना एकत्र येऊन एका मोठ्या रहस्याचा पर्दाफाश करायचा असतो. आणि त्यांच्यासाठी हा प्रवास नक्कीच गोंधळून टाकणारा असतो.
Super Over [सुपर ओव्हर]
क्रिकेटच्या दुनियेतला थरारक प्रवास!
‘सुपर ओव्हर’ हा तमिळ भाषेतील सुपरहिट एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपटदेखील ३ जानेवारी २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाला असून सर्वाना तुम्हाला याचा आनंद घेता येणार आहे. क्रिकेटच्या विश्वात राहणाऱ्या मित्रांची हि कहाणी आहे, या चित्रपटात कासी आणि त्याचे मित्र क्रिकेट बेटिंगमध्ये पैसे लावून बेट जिंकतात, पण त्याच्या काही दिवसांनी ते सर्व मोठ्या अडचणीत सापडतात. पुढे त्यांच्यासोबत एका मागोमाग एक विचित्र घटना घडू लागतात आणि त्यांच्यासमोर कल्पनाही करू शकत नाही असे अनपेक्षित वळण येते.
अपघातानंतर उर्मिला कोठारेची पहिली पोस्ट, सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Bull Fight [बुलफाईट]
प्रेम, संघर्ष, आणि कुटुंबातील वादांनी भरलेली कथा!
‘बुलफाईट’ हि तमिळ भाषेतील सुपरहिट वेब सिरीज १० जानेवारीला २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर येत आहे. या वेब सीरीजमध्ये एका युवकाच्या संघर्षाची कहाणी दाखवली आहे.जो त्याच्या प्रेमाला जिंकण्यासाठी एका मुलीच्या घरातील बैलाला फसवून त्याला नियंत्रित करण्याच्या प्रयत्नात असतो. आणि याच कारणामुळे दोन्ही कुटुंबांमधील जुने शत्रुत्वाचे सबंध पुन्हा जागे होतात आणि दोघांच्या कुटुंबात पुढे जाऊन खूप समस्या निर्माण होतात या समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं. आता ‘तो’ या समस्या कशाप्रकारे सोडवेल याचा उलघडा चित्रपटात होईल.