अपघातानंतर उर्मिला कोठारेची पहिली पोस्ट, सांगितला संपूर्ण घटनाक्रम
‘तुझेच मी गीत गात आहे’ फेम उर्मिला कोठारेच्या कारला गेल्या काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला होता. भीषण अपघातात अभिनेत्री गंभीर जखमीही झाली होती. २८ डिसेंबरला मध्यरात्री शुटिंगवरून घरी परतत असताना, मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ अभिनेत्रीच्या कारचा भीषण अपघात झाला होता. कारचा भीषण अपघात अभिनेत्रीच्या ड्रायव्हरकडून झाला होता. अभिनेत्रीवर इतके दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. अभिनेत्री रुग्णालयातून घरी परतली असून, तिने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करत, घडलेल्या घटनेबद्दल प्रतिक्रिया देत देवाचे आभार मानले आहेत.
‘ऑलमोस्ट कॉमेडी…’; प्रसिद्ध लेखक बनणार कॉमेडीयन, होणार हास्याचा धमाका…
शेअर केलेल्या पोस्टमध्ये उर्मिला कोठारे म्हणते, “मी देवाकडे कृतज्ञता व्यक्त करते, माझा २८ डिसेंबर २०२४ रोजी रात्री १२ वाजून ४५ मिनिटाच्या सुमारास एक गंभीर कार अपघात झाला होता. कांदिवलीच्या पोईसर मेट्रो स्टेशनजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गावर हा प्रकार घडला. तिथे मेट्रोचं काम सुरू असताना, जवळपास मोठी यंत्रसामग्री आणि जेसीबी लोडर/एक्सकॅव्हेटर वाहने उभी होती. माझा ड्रायव्हर गाडी चालवत होता. तिथे अचानक वळण आल्याने आमच्या कारचा हा दुर्दैवी अपघात झाला. या धडकेनंतर मी आणि माझा ड्रायव्हर गंभीर जखमी झालो आणि बेशुद्ध पडलो. सुदैवाने, आम्हाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबई पोलीस आणि डिलिव्हरी कर्मचारी पवन शिंदे यांचे आभारी आहे ज्यांनी त्वरित कारवाई करून आम्हाला रुग्णालयात हलवले. मी आता घरी आहे. माझ्या पाठीला आणि बरगड्यांना अजूनही दुखापत आहे, थोडा त्रास होतोय. मला डॉक्टरांनी किमान ४ आठवडे तरीही कोणताही शारीरिक व्यायाम न करण्याचा सल्ला दिला आहे. माझ्या सर्व चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे आभार ज्यांनी माझ्या प्रकृतीसाठी आणि मी लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली. हा एक भीषण अपघात होता आणि यामुळेच पोलिसांनी माझ्या ड्रायव्हरविरोधात एफआयआर नोंदवला आहे. मला आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला माहित आहे की न्याय मिळेल आणि नक्कीच न्यायाचा विजय होईल.” असं उर्मिलाने या पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे.
“ना रहेगा बास, ना बजेगी बासुरी…”, कंगना रणौत ‘इंडियन आयडॉल 15’ मंचावर कोणावर बरसली…
उर्मिला कोठारेने अपघाताची माहिती देण्यासाठी शेअर केलेल्या ह्या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी आणि तिच्या चाहत्यांनी कमेंट्स करत अभिनेत्रीला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय अनेकांनी तिच्या तब्येतीची ही विचारपूस केली आहे. उर्मिला कोठारेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायंच तर, उर्मिला कानेटकर ही मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने ‘दुनियादारी’,’ शुभमंगल सावधान’, ‘ती सध्या काय करते’ सह ‘रानबाजार’ सारख्या वेबसीरीजमध्ये तिने काम केले आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून तब्बल १२ वर्षांनी उर्मिलाने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. दिग्दर्शक आणि अभिनेता आदिनाथ कोठारेची ती पत्नी असून निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांची ती सून आहे.