संगीतप्रेमींसाठी पर्वणी; सुरेश वाडकरांसह महेश काळेपर्यंत... महाकुंभ २०२५ मध्ये होणार सुरांची बरसात
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये १६ जानेवारी ते २४ फेब्रुवारीपर्यंत बहुप्रतिक्षित महाकुंभमेळा पार पडणार आहे. प्रत्येकी १२ वर्षांनंतर ह्या महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. या सोहळ्यामध्ये करोडो भाविक उपस्थिती लावत असतात. १३ जानेवारीपासून महाकुंभ मेळ्याला सुरुवात होणार असून अवघे तीन दिवसच बाकी असल्यामुळे सध्या प्रयागराजमध्ये जोरदार तयारी सुरु आहे.. १४ जानेवारीला पहिलं स्नान होणार आहे. नुकतीच सांस्कृतिक मंत्रालयाकडून महाकुंभ मेळ्यात होणाऱ्या परफॉर्मन्सची यादी जाहीर केली. यामध्ये अनेक दिग्गज गायकांसह मराठी कलाकारांची नावं सामील आहेत.
Amruta Khanvilkar: नव्या वर्षात अमृताने केला नव्या घरात गृहप्रवेश, म्हणाली – ‘नवी सुरुवात…’
पहिल्या दिवशी, १६ जानेवारी रोजी, गायक शंकर महादेवन यांच्या परफॉर्मन्सने महाकुंभमेळ्याची सुरुवात केली जाणार आहे. या मेळ्यामध्ये शंकर महादेवन त्याचं ‘ब्रेथलेस’ गाणं सादर करणार आहे. तर, २४ फेब्रुवारी रोजी मोहित चौहान यांच्या आवाजातील भावगीतांनी महाकुंभ मेळ्याचा समारोप होणार आहे. शास्त्रीय गायक महेश काळेदेखील या कुंभमेळ्यात गाणार आहेत. ते १७ जानेवारीला गाणार आहे. संपूर्ण महोत्सवात कैलाश खेर, शान मुखर्जी, हरिहरन, कविता कृष्णमूर्ती, कविता सेठ सह इत्यादी गायकांचे कार्यक्रमामध्ये सादरीकरण केले जाणार आहे.
OTT Release: अखेर समजलेच! राम चरणचा ‘गेम चेंजर’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित!
संपूर्ण महाकुंभ मेळ्यात कैलाश खेर, शान मुखर्जी, हरिहरन, कविता कृष्णमूर्ती, कविता सेठ, ऋषभ रिखीराम शर्मा, शोवना नारायण, डॉ. एल सुब्रमण्यम, बिक्रम घोष, मालिनी अवस्थीसह देशातील काही प्रसिद्ध गायकही परफॉर्मन्स करणार आहे. यासोबतच ज्येष्ठ गायक पद्मश्री सुरेश वाडकर, राहुल देशपांडे, देवकी पंडीत, सुभद्रा देसाई आणि महेश काळे ह्या मराठी गायक मंडळींचादेखील परफॉर्मन्स होणार आहे. याचे सांस्कृतिक मंत्रालयाने एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. ज्यामध्ये असं म्हटलं आहे की, या कार्यक्रमांचे उद्दिष्ट भाविकांसाठी एक मंत्रमुग्ध करणारे आध्यात्मिक वातावरण निर्माण करणं आहे.
अपघातानंतर उर्मिला कोठारेची पहिली पोस्ट, सांगितला संपूर्ण घटनाक्रम
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीकडेच महाकुंभाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रयागराजला भेट दिली. यावेळी त्यांनी विविध आखाड्यांना भेट देत साधूंचीही भेट घेतली. त्यांच्या भेटीदरम्यान, मुख्यमंत्र्यांनी संगम घाट परिसरात ‘निषादराज’ क्रूझवर प्रवास केला आणि तयारीची पाहणी केली. या दौऱ्यात अधिकारीही त्यांच्याबरोबर होते. याशिवाय उत्तर प्रदेशच्या प्रशासनाने १२५ रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. अशाप्रकारे उत्तर प्रदेश सरकारने बरीच व्यवस्था केली. या महाकुंभ मेळ्यात १० कोटी भाविक येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.