छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा शो लोकांच्या पसंतीस उतरला आहे. प्रेक्षकांच भरभरुन मनोरंजन करणाऱ्या या शोचे देशभरात चाहते आहेत. हा शो रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. नुकताच हा शो बबिता जी आणि टप्पूच्या एंगेजमेंटमुळे चर्चेत होता. आता हा शो चर्चेत येण्याचे कारण म्हणजे अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवाल (Jennifer Mistry Bansiwal) जी या शोमध्ये मिसेस सोधीची भूमिका साकारत आहे. जेनिफर मिस्त्रीने गेल्या वर्षी ‘तारक मेहता’चे निर्माते असित कुमार मोदी (Asit kumar Modi) यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते. याबाबत त्यांनी असितविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. आता वर्षभरानंतर निकाल आला आहे. रिपोर्ट्सनुसार, जेनिफरने असितविरोधातील केस जिंकली आहे. असितकुमार मोदी यांनी जेनिफर यांची थकित रक्कम आणि पाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
[read_also content=”पंचायत सीझन 3 ची आतुरतेनं वाट पाहणाऱ्यांसाठी मोठा ट्विस्ट, ‘फुलेरा’त येणार नवीन सचिवजी, त्रिपाठींजी होणार बदली? https://www.navarashtra.com/movies/panchayat-season-3-update-jitendra-kumar-will-replace-by-aasif-khan-as-a-new-secretary-nrps-518219.html”]
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये मिसेस सोढीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्रीने असित कुमार मोदी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणात महाराष्ट्र सरकारच्या मदतीने कारवाई करण्यात आली. जेनिफर मिस्त्रीने यापूर्वी तिच्या बाजूने निकाल देऊनही आरोपीला शिक्षा न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. स्थानिक तक्रार निवारण समितीची स्थापना केल्यानंतर या प्रकरणातील सुनावणीला वेग आला. त्यानंतर निर्माते असित कुमार मोदी हे कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ विरोधी कायदा 2013 नुसार, चार महिन्यात दोषी आढळले.
अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान जेनिफरने केस जिंकल्याबद्दल सांगितले होते, ‘होय, मी केस जिंकली आहे. या खटल्याचा निर्णय होऊन 40 दिवस उलटले आहेत. पण आत्तापर्यंत प्रॉडक्शन हाऊसने मला पैसे दिलेले नाहीत.सर्वप्रथम म्हणजे हा माझ्या कष्टाने कमावलेला पैसा आहे ज्याची मी पात्र आहे. न्यायासाठी मी न्यायालयात धाव घेतली, पण वर्ष उलटूनही मला माझे पैसे मिळालेले नाहीत. आजपर्यंत न्याय मिळालेला नाही. वास्तविक ज्या समितीचा आदेश आहे त्यांनी मला आदेशाचा तपशील प्रसारमाध्यमांसोबत शेअर करू नका असे सांगितले होते, त्यामुळे मी महिनाभराहून अधिक काळ काहीही शेअर केले नाही, पण कसे तरी माध्यमांसमोर आले आहे, म्हणून मी आता तुम्हाला सांगत आहे.