२० वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत 'ज्वेल थीफ' चित्रपटातील 'या' गाण्यात करणार रोमान्स, होतेय गाण्याची जोरदार चर्चा
सध्या सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर अभिनेता कमालीचा चर्चेत होता. आता अभिनेता त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘ज्वेल थीफ’ असं आहे. या चित्रपटात अभिनेता आपल्या लेकीच्या वयाच्या एका अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. २० वर्षे लहान असणाऱ्या अभिनेत्रीसोबत सैफ अली खान रोमान्स करणार आहे. सैफ अली खानसोबत ‘ज्वेल थीफ’चित्रपटात अभिनेत्री निकिता दत्तही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या गाण्याचं नाव ‘इल्जाम’ असं असून हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या हे गाणं फक्त इन्स्टाग्रामवरच नाही तर, युट्यूबवरही चांगलंच ट्रेंड होताना दिसत आहे.
क्राईम आणि थ्रिलर असणाऱ्या ‘ज्वेल थीफ’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत सैफ अली खानसोबत निकिता दत्त आणि जयदीप अहलावत सुद्धा मुख्य भूमिकेत आहे. ‘ज्वेल थीफ’ मधलं ‘इल्जाम’ हे दुसरं गाणं रिलीज झालेलं आहे. चित्रपटात सैफ त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अभिनेत्रीबरोबर किसिंग सीन केला आहे. अभिनेत्री निकिता दत्त सारापेक्षा फक्त पाच वर्षांनी मोठी आहे. हे गाणं गेल्या १७ एप्रिलला रिलीज झालं आहे. गाण्यात सैफ निकिताची केमिस्ट्री पाहायला मिळत असून ते दोघंही गाण्यामध्ये रोमान्स करताना दिसत आहे. दोघांचेही किसिंग आणि रोमँटिक सीन्सही गाण्यात चाहत्यांना पाहायला मिळतील. ५४ वर्षीय सैफचे २० वर्षांनी लहान निकिताबरोबरचे किसिंग सीन सध्या चांगलेच चर्चेत आहेत.
दिशा पटानीच्या कातिल अदांनी ‘आग लगादी…’
दरम्यान, ‘ज्वेल थीफ’ चित्रपटातलं ‘इल्झाम’गाण्याचे बोल कुमार यांनी लिहिले असून शिल्पा राव आणि विशाल मिश्रा यांनी आवाज दिला आहे. ‘इल्झाम’हे चित्रपटातलं दुसरं गाणं आहे. या गाण्यातून सैफ अली खान, निकिता दत्त आणि जयदीप अहलावत हे तिघेही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. याआधीही निर्मात्यांनी ‘जादू’ नावाचे एक गाणे रिलीज केले होते जे लोकांना खूप आवडले होते. दरम्यान, चाहत्यांमध्ये ‘ज्वेल थीफ’चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. निर्मात्यांनी १४ एप्रिल रोजी ‘ज्वेल थीफ’चा ट्रेलर रिलीज केला होता, ज्यामध्ये सैफ आणि जयदीप दोघेही उत्तम अभिनय करताना दिसत आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर असं वाटतंय की हे आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांना खिळवून ठेवतील. जयदीप आणि सैफला या क्राइम थ्रिलर चित्रपटात एकत्र पाहणं ही चाहत्यांसाठी पर्वणीच आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्याच्या दिर्घांक नाटकाची नाट्यप्रेमींना भुरळ, सगळेच प्रयोग ‘हाऊसफुल्ल’