(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अर्शद वारसी हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार्सपैकी एक आहे. आज अभिनेत्याचा ५६ वा वाढदिवस आहे आणि आता याचनिमित्ताने आपण त्याच्याबद्दल काही मनोरंजनक गोष्टी जाणून घेणार आहोत. १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटातून अभिनेत्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. २००३ मध्ये आलेल्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटात सर्किटची भूमिका साकारून अर्शद वारसीने प्रेक्षकांची मने जिंकली. यामध्ये त्याच्या अभिनयाची खूप चर्चा झाली होती, तसेच या चित्रपटामधील त्याच्या पात्राचे नाव आधी सर्किट नव्हते तर काहीतरी वेगळे होते, ज्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल.
चित्रपटातील अर्शद वारसीच्या व्यक्तिरेखेचे हे खरे नाव
प्रभू चावला यांच्या मुलाखतीदरम्यान, अर्शद वारसीने ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधील त्याच्या भूमिकेबद्दल एक मजेदार खुलासा केला. त्याने सांगितले होते की, ‘चित्रपटातील माझ्या सर्किट या पात्राचे खरे नाव खुजली होते. त्याचे कपडे आणि कृती खूप वेगळ्या होत्या. नाव ऐकताच तुम्हाला असे वाटेल की तो फक्त खाजवत राहील. तो यापेक्षा जास्त काय करू शकतो? मग संपूर्ण पॅकेज खराब झाले असते.’ असं त्याने सांगितले.
‘मला बिअर प्यायची आहे…’, गोविंदाने घेतली आईची परवानगी, काय म्हणाली निर्मला देवी?
दिग्दर्शकाने अर्शद वारसीचा सल्ला पाळला
अर्शद वारसीने खुलासा केला होता की त्याने ‘मुन्नाभाई एमबीबीएस’चे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना त्याच्या पात्राचे नाव आणि कपडेही बदलण्याचा सल्ला दिला होता. अर्शद वारसी म्हणाला, ‘मी केलेल्या पहिल्या चित्रपटात (मुन्नाभाई एमबीबीएस) मला खूप काही करावे लागले, कारण त्यावेळी राजूला माझ्या विनोदबुद्धीबद्दल माहिती नव्हती आणि म्हणूनच मला खूप काही करावे लागले. जवळजवळ प्रत्येक दृश्य होते आणि बरेच दृश्ये अशी होती ज्यात मी सर्वकाही केले.’ असं अभिनेता म्हणाला.
संजय दत्तनेही पाठिंबा दिला
चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या संजय दत्तनेही अर्शदच्या सूचनांना पाठिंबा दिला. अभिनेता म्हणाला, ‘संजू आणि माझी केमिस्ट्री चांगली होती. आमच्यात कोणताही अहंकार नव्हता. आम्हाला एकमेकांसोबत काम करताना खूप मजा आली. मी बऱ्याच वेळा म्हणायचो की संजू, तू हा विनोद सांग आणि मग मी अशी प्रतिक्रिया देईन, तो मान्य करायचा.’
“ध्यानी, मनी… Sunny Leone” सनीचा खास फोटोशूट पाहिलात का?
‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटामध्ये बोमन इराणी, ग्रेसी सिंग, सुनील दत्त यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या हे ज्ञात आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप यशस्वी ठरला. आणि तसेच हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आता लवकरच या चित्रपटाचा नवा भाग प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.
राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटांनी हिट झाल्यानंतर, अभिनेता दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या गोलमाल चित्रपटामध्ये दिसला. ज्यामध्ये तो प्रेक्षकांना खूप आवडला. अर्शद केवळ विनोदी भूमिकाच करायचा नाही तर तीव्र भूमिकाही खूप चांगल्या प्रकारे करतो. इश्किया आणि देढ इश्किया या चित्रपटातून त्यांनी हे सिद्ध केले. या दोन्ही चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांना समीक्षक आणि प्रेक्षकांनी कौतुकास्पद प्रतिसाद दिला. यानंतर अभिनेत्याचे सगळे चित्रपट सुपरहिट झाले.