मुंबई : सध्या दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपट असा वाद सुरू आहे. दाक्षिणात्य चित्रपटाला बॅालिवू़ड चित्रपटाच्या तुलनेत बॅाक्स ऑफिसवर तुफान चालताना दिसत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांना मिळणाऱ्या यशावर मते मतांतर आहेत. मात्र, एखादा चित्रपट हिट होतो तेव्हा ‘साऊथ’ नाही ‘भारतीय’ चित्रपट हिट होतो असं म्हणालया हवं असं मत व्यक्त केलय. अभिनेता कमल हासन (Kamal Haasan) यांनी. मुंबईत त्यांच्या आगामी विक्रम (vikram) चित्रपटाच्या प्रमोशनल इवेंट दरम्यान हे वक्तव्य केलयं.
अभिनेता कमल हासन, विजय सेतुपती, फहद फासिल अशी तगडी स्टारकास्ट असलेला विक्रम चित्रपट येत्या ३ जूनला प्रदर्शित होतोय. तमिळ सुपरस्टार कमल हासन यांनी काल मुंबईत चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमाला हजेर लावली. यावेळी चित्रपटाविषयी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पॅन इंडियन सिनेमा विषयी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, भारतीय चित्रपटसृष्टीची व्याप्ती फार मोठी आहे. चित्रपटात जागतिक भाषा बोलली जाते. चित्रपट लोकांना एकत्र आणण्याचं काम करतात. आपण कधीही सिनेमागृहात शेजारी बसलेल्या प्रेक्षकाची जात आणि त्याच स्टेटस नाही विचारतं. तिथं केवळ निखळ मनोरंजन आपल्याला मिळतो. त्यामुळे एखादा चित्रपट हिट होतो तेव्हा तो ‘साऊथ’ नव्हे ‘भारतीय’ चित्रपट असतो असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
विविधतेत एकता असलेला आपला देश आहे. भारतात भाषा जरी अनेक बोलल्या जात असल्या तरी राष्ट्रगीत तर सगळे एकचं गातो. त्यातली संवेदनशिलता आपल्याला एकत्र आणते. मी माझ्या लहानपणापासून चित्रपट बघत मोठा झालोय. मुघले-ऐ-आझम आणि शोले सारख्या चित्रपटांचा तेव्हा लोकांवर विशेष प्रभाव होता. मात्र असे चित्रपट तेव्हा तमिळ आणि मल्याळम चित्रपटांनाही परवडणारे नव्हते. प्रत्येकाची एक भाषा आहे आणि आपण त्याचा आदर करायला हवा. तामिळनाडूमधील परमकुडी येशील लोकांमध्ये सचिन तेंडुलकरचं खूप क्रेझ आहे. जिथं हिंदीचा एकही शब्द लोकांना माहित नाही मात्र, तेडुंलकर हा एकमेव मराठी शब्द ते उच्चारु शकतात. हेचं तर आपल्या देशातल्या भाषेचं सौंदर्य आहे. असंही ते म्हणालेेेे.