(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
कॅनडातील Surrey येथील प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. गोल्डी ढिल्लन नावाच्या कुख्यात गुंडाने या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. सुरक्षा संस्था आणि मुंबई पोलिस सध्या या वृत्ताची पडताळणी करत आहेत. आतापर्यंत गोळीबारात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
कपिलच्या कॅफेमध्ये १२ पेक्षा अधिक राऊंडमध्ये गोळीबार झाला असल्याचे वृत्तात सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कारमध्ये बसलेले काही लोक कॅफेच्या दिशेने गोळीबार करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ ९ सेकंदांचा आहे, ज्यामध्ये १२ पेक्षा जास्त राउंड गोळीबार करण्यात आला. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. गोल्डी ढिल्लन स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचे सांगत असून त्याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, या टोळीने म्हटले, “जय श्री राम, सत श्री अकाल. सर्व भावांना राम राम. गोल्डी ढिल्लन आणि लॉरेन्स बिश्नोई टोळी आज कपिल शर्माच्या कॅप्स कॅफे, सरे येथे झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेते. आम्ही त्याला फोन केला, पण त्याने रिंग ऐकली नाही, त्यामुळे आम्हाला कारवाई करावी लागली. जर त्याने पुन्हा फोन केल्यावर रिंग ऐकली नाही, तर लवकरच मुंबईत पुढील कारवाई केली जाईल.”
‘कॅनडा तुमच्या बापाचा नाही…’, ‘Kap’s Cafe’ च्या गोळीबारानंतर कपिल शर्माला मिळाली धमकी
कपिल शर्माच्या कॅनडामधील त्याच कॅप्स कॅफेवर १० जुलै २०२५ रोजी गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात नऊ राउंड गोळीबार करण्यात आला. खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीने या घटनेची जबाबदारी घेतली. यानंतर, टीमने कॅप्स कॅफेच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक निवेदन प्रसिद्ध केले. त्यात म्हटले आहे की, मी या कठीण काळातून जात आहे, पण माझे स्वप्न चालू ठेवेन. लोकांना एकमेकांशी जोडलेले वाटावे म्हणून हा कॅफे सुरू करण्यात आला होता.” या कॅफेची सर्व जबाबदारी कपिल शर्माची पत्नी गिन्नी चतरथ यांच्या हातात आहेत. कपिल शर्मा यांनी ७ जुलै रोजी कॅप्स कॅफेचे उद्घाटन केले आणि तीन दिवसांतच या कॅफेवर हल्ला झाला होता.
This is unbelievable. Someone actually filmed while shooting? Video apparently of a shooting at Kapil Sharma’s cafe in Canada. https://t.co/6bccvebpQZ
— Smita Prakash (@smitaprakash) July 10, 2025
कपिल शर्माचा द कपिल शर्मा शो सध्या नेटफ्लिक्सवर सुरू आहे आणि त्याच्या या शो ला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. कपिलच्या नावाने कॅनडात कॅफे सुरू करण्यात आला होता. मात्र चालू झाल्या दिवसापासून हा कॅफे अडचणीत सापडला आहे. आतापर्यंत दोन वेळा या कॅफेवर गोळीबार करण्यात आला असून त्याला धमकीही देण्यात आली आहे. या गोळीबारामागील कारण अद्यापही स्पष्ट नाही. केवळ कपिलने फोन न उचलल्यामुळे हा गोळीबार करण्यात आला आहे असं धमकी देणाऱ्या ढिल्लोकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.