(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
लोकप्रिय विनोदी कलाकार कपिल शर्मा सध्या चर्चेत आहे. कपिल शर्माने नुकतेच कॅनडामध्ये ‘कॅप्स कॅफे’ नावाचे त्यांचे नवीन कॅफे उघडले. या कॅफेवर अनेक वेळा गोळीबार करण्यात आला. आता कपिल शर्मालाही याबद्दल धमक्या मिळाल्या आहेत. कपिल शर्माचा ‘कॅफे’ सध्या चर्चेत आहे. या संपूर्ण प्रकरणाची बरीच चर्चा आहे. कपिल शर्माला आता कोणती धमकी मिळाली आहे आणि ती कोणी दिली आहे हे जाणून घेऊयात.
कपिल शर्माला मिळाली धमकी
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गुरपतवंत सिंह पन्नू यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कपिल शर्माला धमकी देण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये गुरपतवंत सिंह म्हणाले आहेत की, ‘मी कपिल आणि मोदी ब्रँडच्या इतर प्रत्येक हिंदुत्ववादी गुंतवणूकदाराला सांगू इच्छितो की कॅनडा तुमचे खेळण्याचे मैदान नाही. तुमचे कष्टाचे पैसे भारतात परत घेऊन जा.’ अशी धमकी देताना ते या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
‘बिग बॉस’ फेम Abdu Rozik वर चोरीचा आरोप, दुबई विमानतळावर झाली अटक
गुरपतवंत सिंह पन्नू यांनी दिली धमकी
त्यांनी पुढे म्हटले की, व्यवसायाच्या नावाखाली कॅनडा हिंसक हिंदुत्व विचारसरणीला मूळ धरू देणार नाही. कपिल ‘मेरा भारत महान’चा नारा देतात आणि ते मोदींच्या हिंदुत्वाचे समर्थन करतात. व्हिडिओमध्ये पुढे विचारण्यात आले आहे की ते भारताऐवजी कॅनडामध्ये गुंतवणूक का करत आहेत? खलिस्तान समर्थक फुटीरतावादी गट शीख फॉर जस्टिसचे संस्थापक गुरपतवंत सिंह पन्नू यांनी कपिलला थेट धमकी दिली आहे.
‘सन ऑफ सरदार’च्या सीक्वलमध्ये संजय दत्त का नाही? विंदू दारा सिंह जरा स्पष्टच बोलला…
९ जुलै रोजी झाला गोळीबार
९ जुलै रोजी कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये अनेक फेऱ्यांमध्ये गोळीबार करण्यात आला होता. जेव्हा हा गोळीबार झाला तेव्हा कर्मचारी त्यावेळी कॅफेमध्ये उपस्थित होते. सुदैवाने, यावेळी कोणीही जखमी झाली नाही आणि कोणालाही दुखापत झाली नाही. इतकेच नाही तर घटनेनंतर कपिलच्या कॅफेने अधिकृत निवेदनही जारी केले. त्याच वेळी, आता कपिलला मिळालेल्या धमकीमुळे कपिलचे चाहतेही तणावात आले आहेत. हे कॅफे नुकतेच उघडले आहे, त्यामुळे इतक्या लवकर घडणारी अशी घटना लोकांमध्ये भीती निर्माण करते. तसेच, घाबरण्याचे काही कारण नाही आता पुढे काय घडते यासाठी चाहते चिंता व्यक्त करत आहेत.