Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बाईपण भारी देवा’ची लय भारी कामगिरी, पहिल्या वीकेंडला ‘इतक्या’ कोटींची कमाई, केदार शिंदेंची भावूक पोस्ट

केदार शिंदे यांनी ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचं एक पोस्टर शेअर केलंय. त्यात त्यांनी या चित्रपटाने पहिल्या वीकेंडच्या कमाईबद्दल सांगितलं आहे.

  • By साधना
Updated On: Jul 04, 2023 | 02:21 PM
baipan bhari deva

baipan bhari deva

Follow Us
Follow Us:

दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’(Baipan Bhari Deva) या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या वीकेंडच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. त्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी एक पोस्ट करत याबद्दल सांगितलंय.

केदार शिंदे यांनी ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचं एक पोस्टर शेअर केलंय. त्यात त्यांनी या चित्रपटाने पहिल्या वीकेंडच्या (Baipan Bhari Deva First Weekend Collection) कमाईबद्दल सांगितलं आहे. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने पहिल्याच वीकेंडला 6.45 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे पहिल्याच आठवड्याच्या अखेरीस सर्वाधिक कमाई करणारा हा या वर्षातला सुपरहिट मराठी चित्रपट ठरला आहे. यानिमित्ताने केदार शिंदे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले आहेत.

केदार शिंदे यांनी लिहिलं आहे की,“ही स्वामींची कृपा. हा सिध्दीविनायकाचा महाप्रसाद. मला 21 वर्ष लागली दादरचा एक रस्ता क्रॉस करायला! 2002 साली सही रे सही आलं. त्याला तुम्ही मायबाप प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. गेली कित्येक वर्ष त्याचे “हाऊसफुल्ल” चे बोर्ड मी पाहातो आहे. त्यानंतर अनेक नाटकं, सिनेमे यालाही भरभरून प्रतिसाद दिलात. अगं बाई अरेच्चा, जत्रा ते महाराष्ट्र शाहीर पर्यंतच्या प्रवासात तुमची साथ लाखमोलाची ठरली. मात्र खऱ्या अर्थाने “सही” नंतर “बाईपण भारी देवा” चं हे यश पाहातो आहे. याला फक्त तुम्हीच कारणीभूत आहात. मी काम अविरतपणे सुरू ठेवेन. तुम्ही मात्र सोबत राहा. खुप भावना व्यक्त करायच्या आहेत. पण योग्य वेळी नक्कीच करीन”.

दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटासाठी प्रेक्षक गर्दी करताना दिसत आहेत. या चित्रपटाचे सगळे शो हाऊसफुल सुरू आहेत. हा चित्रपट चित्रपटगृहात दणदणीत कमाई करताना दिसतोय.  प्रेक्षक या चित्रपटाचं भरभरून कौतुक करतायत.

सहा बहिणींची कथा
या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट म्हणजे सहा बहिणींची कथा आहे.

Web Title: Kedar shinde post about first weekend box office collection of baipan bhari deva nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2023 | 02:04 PM

Topics:  

  • entertainment
  • kedar shinde

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.