‘कान’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठीचा डंका, ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाची निवड
अमेरिकन नागरिक आणि मूळचे तामिळ भाषिक असलेल्या मायकेल थेवर यांची निर्मिती असलेल्या सिनेमाची थेट फ्रान्स मध्ये होणार्या कांन्स चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे. येत्या 13 मे पासून हा महोत्सव सुरू होत आहे.
मायकेल यांनी ” खालीद का शिवाजी ‘ या चित्रपटाची निर्मिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक वेगळा पैलू दाखविणारा हा सिनेमा आहे. या आधी अंजेटा चित्रपट महोत्सवातही या सिनेमाची निवड झाली होती. परीक्षकांच्या पसंतीस पडलेला हा सिनेमा आता थेट जागतिक पातळीवर पोहोचला आहे.
FIR दाखल केल्यानंतर उल्लू अॅपकडून माफीनामा, नेमकं काय म्हणाले ?
मायकेल मूळचे तामिळ भाषिक आहेत. शिक्षणासाठी ते 90 च्या काळात मुंबईत आले. निर्मला निकेतन आणि टाटा इन्स्टिट्यूट फॉर सोशल सायन्स मधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्याकाळात त्यांना ठाणे जिल्ह्यातील आदिवासी विभागात सामाजिक संस्थासोबत कार्य केले. शिक्षण घेत असताना त्यांना आर्थिक समस्या तर होत्याच पण सांस्कृतिक प्रश्नांना सामोरे जावे लागले. त्यानंतर ते अमेरिकेला गेले आणि तिथे पत्नी सुषमा गणवीर यांच्यासोबत त्यांनी उद्योग सुरू केला. ओमनी सर्व्हिसेस ही वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणारी कंपनी सुरू केली. आज ते एक यशस्वी उद्योजक आहेत.
प्रार्थना बेहरेच्या घरी गोंडस पाहुण्याचे आगमन, नावही ठेवलंय खास…
मराठी समाजाचे आपल्यावर उपकार आहेत या भावनेतून आणि चित्रपटाचा विषय छत्रपती शिवाजीराजे असल्याने त्यांनी याची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. सुषमा गणवीर या सह निर्मात्या आहेत. हे दोघे सामाजिक जाणिवेतून अनेक कार्य करत असतात. या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अजेंटा चित्रपट महोत्सवात या सिनेमाने परीक्षकांची मने जिंकली होती. राज मोरे हे सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. गणेश अनासपुरे या सिनेमात प्रमुख भूमिकेत असून ग्रामीण भागातील अनेक कलाकारांनाही यात संधी देण्यात आलेली आहे.