FIR दाखल केल्यानंतर उल्लू अॅपकडून माफीनामा, नेमकं काय म्हणाले ?
उल्लू अॅप (Ullu App) वरील ‘हाउस अरेस्ट शो’ सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सोबतच अभिनेता एजाज खानही वादात अडकला आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून शो’च्या निर्मात्यांविरोधात आणि एजाज खानच्या विरोधात मुंबईच्या अंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ‘हाउस अरेस्ट शो’च्या निर्मात्यांविरोधात आणि बिग बॉस फेम एजाज खानच्या विरोधात अश्लील कंटेंट दाखवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय, शो बंद करण्याचीही मागणी होत आहे. आता या संपूर्ण प्रकरणानंतर उल्लू अॅपकडून माफी मागण्यात आली आहे.
प्रार्थना बेहरेच्या घरी गोंडस पाहुण्याचे आगमन, नावही ठेवलंय खास…
‘हाउस अरेस्ट शो’चे सर्व एपिसोड्स डिलीट केल्यानंतर उल्लू अॅपने बजरंग दलाची माफी मागितली आहे. उल्लू अॅपवरील ‘हाऊस अरेस्ट’ या शोबाबत बजरंग दलाने तक्रार दाखल केली होती. उल्लू अॅपकडून माफीनामा जाहीर करण्यात आला. त्या माफीनाम्यात लिहिले आहे की, “आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ‘हाऊस अरेस्ट’ शोचे सगळे एपिसोड ३-४ दिवसांपूर्वीच डिलीट करण्यात आले आहेत. टीमने दुर्लक्ष केल्यामुळे आणि काळजी न घेतल्यामुळे ही सर्व घटना घडली. आम्ही कायद्याचं पालन करतो. त्यामुळे शोमधील जे एपिसोड प्रसारित करण्यात आले, त्याबद्दल आम्ही माफी मागतो. तुमच्या सतर्कतेमुळे ही गोष्ट लक्षात आणू दिल्याबद्दल आम्ही तुमची प्रशंसा करतो. तरीदेखील यामुळे तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल पुन्हा एकदा तुमची माफी मागत आहोत”
‘आश्रम ३’च्या शूटिंगदरम्यान अदिती पोहनकरच्या वडिलांचं निधन; म्हणाले “माझ्यासाठी परत येऊ नकोस.. “
उल्लू अॅपवर स्ट्रीम करण्यात आलेल्या एका क्लिपमध्ये एजाज खान एका अभिनेत्रीला अश्लील दृश्य करण्यास प्रवृत्त करताना दिसत आहे. तो सीन सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी आलेल्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी एजाज खानविरुद्ध FIR दाखल करण्यात आला होता. बजरंग दलाचे कार्यकर्ते गौतम रावरियाँ यांनी मुंबईच्या अंबोली पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. एजाज खान, ‘हाउस अरेस्ट शो’चे निर्माते आणि उल्लू अॅप संबंधित काही व्यक्तींविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. ‘हाउस अरेस्ट शो’मध्ये असलेली अश्लील भाषा आणि शोमधील काही दृश्यांमुळे महिलांच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचला आहे, अशा तक्रारीच्या आधारे एजाज खानविरोधात हा FIR नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६, ३ (५), माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ ६७ (अ) आणि कलम ४, ६ आणि ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे कलम महिलांवर आधारित आहेत.
फुलेराचे गोड आणि आंबट राजकारणासाठी मैदान तयार, प्रधान जी अन् भूषण आमनेसामने; पाहा Teaser
राष्ट्रीय महिला आयोगानेही (NCW) उल्लू अॅपचे सीईओ विभू अग्रवाल आणि होस्ट एजाज खान यांना याआधी समन्स पाठवले होते. दोघांनाही ९ मे पर्यंत आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयोगाचे म्हणणे आहे की, अशाप्रकारचा कंटेट केवळ महिलांच्या प्रतिष्ठेच्या विरोधात नाही तर मनोरंजनाच्या नावाखाली लैंगिक छळाला प्रोत्साहन देणारा आहे. आरोप सिद्ध झाले, तर ते भारतीय न्याय संहिता, 2023 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 अंतर्गत गंभीर गुन्ह्याच्या श्रेणीत येईल.