‘विश्वामित्र’मधील ‘खोटारडी’ हे अखेरचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!
एकविरा म्युझिक प्रस्तुत 'विश्वामित्र' या अल्बममधील तीन गाणी प्रदर्शित झाल्यानंतर आता अखेरचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'विश्वामित्र', 'तुझ्याविना' आणि `दूर दूर' या तीनही गाण्यांना संगीतप्रेमींचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या अल्बममधील 'खोटारडी' हे तुटलेल्या हृदयाची कहाणी सांगणारे गाणे प्रदर्शित झाले आहे.