'गुढीपाडव्याचा उत्सव', कलाकारांना काय वाटतेय नवलाई?, मराठमोळ्या सणाबाबत व्यक्त केल्या भावना
गुढीपाडव्याची तयारी ही फक्त घरापुरती मर्यादित राहिलेली नाही तर मराठी अभिमान, स्वाभिमान व्यक्त करण्यासाठी गल्लीबोळातले तर ते अगदी उच्चभ्रू ठिकाणी सुद्धा शोभायात्रेचे आयोजन करणे हे वाढलेले आहे. मराठी बरोबर अमराठी नागरिक सुद्धा या उत्सवाचा आनंद मोठ्या प्रमाणात घेत असतात. हिंदी झी वाहिनीवर काम करणाऱ्या कलाकारांना या उत्सवाविषयी काय वाटते, हे जाणून घेऊया.
वाढदिवशी ‘या’ प्रसिद्ध रॅपरने गमावला आपला जीव, वयाच्या ३९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास !
किशोरी शहाणे
‘कैसे मुझे तुम मिल गये’मध्ये बबिताच्या भूमिकेतील किशोरी शहाणे या महाराष्ट्रीयन असल्यामुळे त्यांना आपले बोलणे काही आवडता आले नाही, ‘गुढीपाडवा हा आमच्या समृद्ध सांस्कृतिक वारशामध्ये आग्रहाचे निमंत्रण आहे. या दिवशी आम्ही आमच्या कुटुंबाच्या कथा आणि परंपरांमध्ये रममाण होतो. गुढी ही आमच्या सांस्कृतिक ओळख, चिकाटी आणि अढळ विश्वासाचे प्रतीक आहे. या सणाबद्दलच्या माझ्या आठवणी या आहेत जेव्हा माझा अख्खा परिवार एकत्र येत असे आणि मग आम्ही श्रीखंड पुरी आणि पुरणपोळी अशा चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेत असे. मग आम्ही सगळे एकत्र येऊन सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करायचो आणि नवीन वर्षासाठी आमची ध्येये निश्चित करायचो. गुढीपाडवा हा वर्षातील तो समय आहे जेव्हा आम्ही नवीन गोष्टींची सुरूवात करतो आणि मी तर दरवर्षी काही ना काही नवीन सुरू करतेच. गेल्या वर्षी मी ‘कैसे मुझे तुम मिल गये’च्या सेटवर पुरणपोळी बनवून आणली आणि या मालिकेच्या सर्व कलाकारांसोबत हा सण साजरा केला’,
सचिन पारिख
‘वसुधा’ मध्ये प्रभातची भूमिका भूमिका करणारा सचिन पारीख सांगतो, ‘माझ्यासाठी मुढीपाडव्या सण साजरा करण्याच्या खूप गोड आठवणी आहेत. मुंबईच्या समृद्ध संस्कृतीचा मी माझ्या जन्मापासून हिस्सा राहिलेला असून दरवर्षी श्रीखंड पुरीचा आस्वाद घेण्यासाठी उत्सुक असतो. माझे दोस्त माझ्यासाठी ते घेऊन येतात. श्रीखंड पुरी तर मी अगदी दररोजही खाऊ शकतो. मला आजही मुंबईमधील माझा पहिला गुढीपाडवा आठवतो जेव्हा माझ्या मित्राच्या परिवाराने या सणाच्या दिवशी आपल्या घरी माझे मनापासून स्वागत केले होते. तो माझ्यासाठी नवीन आणि भावस्पर्शी अनुभव होता ज्यामुळे माझ्या मनाला अतिशय आनंद झाला, हा गुढीपाडवा तुमच्यासाठी आनंद, यश आणि अनंत आशिर्वाद घेऊन येवो’
Kunal Kamra: कुणाल कामराच्या अडचणी आणखी वाढ, कॉमेडियनवर तीन गुन्हे दाखल!
ऐश्वर्या खरे
‘भाग्य लक्ष्मी’ मध्ये लक्ष्मीच्या भूमिकेतील ऐश्वर्या खरे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते तिलाही आपले मत व्यक्त करावेसे वाटले आहेम, ‘मी मुंबईमध्ये अनेक वर्षांपासून राहत आहे आणि प्रत्येक वर्षागणिक इथल्या गुढीपाडव्याचे महत्व मला अधिकाधिक भावले आहे. या शहराची ऊर्जा या दिवशी खरोखरीच खास असते. घरे सुंदर सजवली जातात, लोक अप्रतिम पारंपारिक पोशाख परिधान करतात आणि घराघरांमध्ये नवीन सुरूवाती आणि समृद्धीचे प्रतीक असलेली गुढी उभारण्यात येते. दरवर्षी मी मुंबईमधील माझ्या जवळच्या दोस्तांसोबत हा सण साजरा करते. त्यांच्या घराला भेट देते आणि पुरणपोळीचा आस्वाद घेते. पुरणपोळी माझी सर्वांत आवडती आहे. मी नेहमीच ती प्रमाणापेक्षा जास्त खाते. एकदा माझ्या शेजारच्या मावशींनी ती मला बनवायलाही शिकवली होती आणि ती माझी अगदी गोड आठवण आहे. त्यांनी मला सहनशक्तीने मार्गदर्शन केले आणि पुरणपोळी बनवताना माझ्या चुका पाहून आम्हीच खूप हसलो. आणि सणांचे हेच तर सौंदर्य असते. त्या केवळ रूढी नसतात तर त्यामागे प्रेम, ऊबदारपणा आणि एकोपा दडलेला असतो.
कोट्यावधी फसवणुकीच्या आरोपावर श्रेयस तळपदेने सोडले मौन, म्हणाला – ‘हे दुःखद आहे की…’
राजश्री ठाकूर
‘बस इतना सा ख्वाब’मधील अवनीच्या भूमिकेतील राजश्री ठाकुर सांगते, ‘गुढीपाडव्याचे नेहमीच माझ्या मनात खास स्थान राहिले आहे. त्यादिवशी घरी कडुनिंबाच्या पानांचा वास आणि स्वयंपाकघरात बनत असलेल्या पुरणपोळी व श्रीखंड पुरीचा सुवास दरवळत असतो. मला आजही आठवतंय, लहान असताना माझ्या आईला गोलगोल, मऊमऊ, सोनेरी पुरणपोळ्या बनवताना पाहायला मला अतिशय आवडायचं. पण जेव्हा मी पुरणपोळीला आकार द्यायचा प्रयत्न करायचे, तेव्हा त्या कधीच गोल बनत नसत. अर्थात त्यामुळे सणाचा आनंद कधी कमी झाला नाही. यावर्षी मी माझ्या परिवारासोबत हा सण साजरा करण्यासाठी उत्सुक आहे. आम्ही रेशमी साडी, बत्ताशांचा हार आणि कडुनिंबाची पाने असलेली विजय आणि समृद्धीचे प्रतीक असलेली गुढी उभारून आमच्या दिवसाची सुरूवात करू. अर्थातच, श्रीखंड पुरीचा आणि सोबत पुरणपोळी आस्वाद न घेता हा सण पूर्ण होऊच शकत नाही. पण ह्या खाद्यपदाथपिक्षाही अख्ख्या परिवाराचे एकत्र येऊन हसणे, गप्पागोष्टी आणि प्रेम ह्या गुढीपाडव्याच्या सणाला खरोखरीच खास बनवेल. मी हे क्षण आयुष्यभर माझ्या मनात जपून ठेवेन आणि यावर्षी आणखी सुंदर आठवणी निर्माण करण्यासाठी उत्सुक आहे