Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर ठरलं ! केव्हापासून ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला, शीर्षकगीतही प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी संस्कृतीचा वारसा जपत नावीन्यपूर्ण कार्यक्रम देण्याचा प्रयत्न सोनी मराठी वाहिनी कायम करते. परंपरा कायम ठेवत, भक्ती आणि मनोरंजन यांचा मिलाफ साधत ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’शो प्रेक्षकांच्या भेटीला येतो.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 09, 2025 | 02:45 PM
अखेर ठरलं ! केव्हापासून 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' येणार प्रेक्षकांच्या भेटीला, शीर्षकगीतही प्रेक्षकांच्या भेटीला

अखेर ठरलं ! केव्हापासून 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' येणार प्रेक्षकांच्या भेटीला, शीर्षकगीतही प्रेक्षकांच्या भेटीला

Follow Us
Close
Follow Us:

टाळमृदंग घेऊन विठूनामाच्या गजरात… मंगलमय वातावरणात… पुण्यातला लक्ष्मी रस्ता, कसबा पेठ परिसर भक्तिमय झाला. निमित्त होतं सोनी मराठी वाहिनीच्या येणाऱ्या नव्या रिअ‍ॅलिटी शोच्या शीर्षकगीताच्या चित्रीकरणाचं. मराठी संस्कृतीचा वारसा जपत नावीन्यपूर्ण कार्यक्रम देण्याचा प्रयत्न सोनी मराठी वाहिनी नेहमीच करत आली आहे. ही परंपरा कायम ठेवत, भक्ती आणि मनोरंजन यांचा मिलाफ साधत सोनी मराठी वाहिनी ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा नवा रिअ‍ॅलिटी शो प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. कार्यक्रम १ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.०० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

“लगान चित्रपट का तयार करताय?, एक दिवसही चालणार नाही… ”, जावेद अख्तर यांनी केलेलं वक्तव्य; आमिर खानचा खुलासा

‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या कार्यक्रमाच्या शीर्षकगीताचं चित्रीकरण नुकतंच पुण्यात झालं. गीतकार ईश्वर अंधारे यांच्या लेखणीतून उतरलेलं ‘इठ्ठल इठ्ठल, संग म्हणायला चला चला चला कीर्तनाला चला’ हे गाणं संगीतकार हर्ष-विजय यांनी संगीतबद्ध केलं आहे. गायक हृषीकेश रिकामे यांचा स्वरसाज या गाण्याला लाभला आहे. सुप्रसिद्ध छायाचित्रकार महेश लिमये यांच्या नजरेतून हे गाणं चित्रित झालं आहे.

‘पंढरीची वारी’ हा महाराष्ट्राचा सामाजिक-सांस्कृतिक असा अनमोल ठेवा आहे. वारीची दिव्य परंपरा सोप्या आणि साध्या शब्दांत उलगडत गाण्याच्या माध्यमातून हा भव्य आणि अनुपम सोहळा जसाच्या तसा दाखवण्याचा प्रयत्न सोनी मराठी वाहिनी करत आहे. तो रसिकांना नक्कीच आवडेल असा विश्वास छायाचित्रकार महेश लिमये यांनी व्यक्त केला.

Chhaava: ५०० कोटीच्या क्लबमध्ये सामील, ‘जवान’ला मिळणार टक्कर, किंग खानच्या चित्रपटाचा मोडणार रेकॉर्ड?

‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।।’ असं म्हणत आजवर असंख्य कीर्तनकारांनी कथा, विनोद, दैनंदिन घडामोडी यांच्या आधारानं कीर्तन करत जनजागृती केली. सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या कार्यक्रमातून महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांचा शोध घेतला जाणार आहे. टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच कीर्तनकारांवर आधारित रिअ‍ॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यासाठीच्या ऑडिशन्स नुकत्याच पूर्ण झाल्या. महाराष्ट्रातल्या ३६ जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या स्पर्धकांनी या ऑडिशन्सना भरघोस प्रतिसाद दिला. स्पर्धकांची निवड सुरू झाली असून ‘चला चला चला कीर्तनाला चला’ या उत्साहपूर्ण शीर्षकगीतामुळे स्पर्धकांचा हुरूप वाढला आहे. हे गाणं सर्व वयोगटांतल्या व्यक्तींची कीर्तनाची ओढ वाढवेल हे नक्की…!

Web Title: Kon honar maharashtracha ladka kirtankar title song shooing in pune kasba peth laxmi road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • Marathi Television Show
  • Television Shows

संबंधित बातम्या

“माझ्या मृत्यूची बातमी…”; अफवा पसरवणाऱ्यांवर भडकला ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता, प्रिया मराठेच्या फोटोबरोबर होतं युट्यूब Thumnail
1

“माझ्या मृत्यूची बातमी…”; अफवा पसरवणाऱ्यांवर भडकला ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता, प्रिया मराठेच्या फोटोबरोबर होतं युट्यूब Thumnail

Priya Marathe: करियर, मैत्री आणि स्ट्रगल ते फिल्मी स्टाईल प्रपोज; ‘अशी’ आहे प्रिया शंतनूची लव्हस्टोरी
2

Priya Marathe: करियर, मैत्री आणि स्ट्रगल ते फिल्मी स्टाईल प्रपोज; ‘अशी’ आहे प्रिया शंतनूची लव्हस्टोरी

मनोरंजनाचा महासंगम; मधुभाऊंचा खुनी समोर येणार? ठरलं तर मग मालिकेचा महाएपिसोड
3

मनोरंजनाचा महासंगम; मधुभाऊंचा खुनी समोर येणार? ठरलं तर मग मालिकेचा महाएपिसोड

“आई बापाला जिवंत गाडलं तिथं मुलीचं काय ?”अजय पूरकर दिसणार नव्या भूमिकेत ; स्टार प्रवाहवर येतेय नवी मालिका, पाहा प्रोमो
4

“आई बापाला जिवंत गाडलं तिथं मुलीचं काय ?”अजय पूरकर दिसणार नव्या भूमिकेत ; स्टार प्रवाहवर येतेय नवी मालिका, पाहा प्रोमो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.