Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

…म्हणून ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून किरण माने यांना काढलं; प्रॉडक्शन हाऊसचा खुलासा

किरण माने (Kiran Mane) यांना त्यांच्या वर्तणुकीमुळे तीनवेळा वाॅर्निंग देऊन मग सिरियलमधून काढण्यात आले. परंतु, त्यांनी त्याचा राजकीय स्टंट केल्याचा आरोप 'मुलगी झाली हो' (Mulgi Zali Ho) या मालिकेचे लाइन प्रोड्युसर सचिन ससाणे यांनी केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 16, 2022 | 05:24 PM
…म्हणून ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून किरण माने यांना काढलं; प्रॉडक्शन हाऊसचा खुलासा
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : किरण माने (Kiran Mane) यांना त्यांच्या वर्तणुकीमुळे तीनवेळा वाॅर्निंग देऊन मग सीरीयलमधून काढण्यात आले. परंतु, त्यांनी त्याचा राजकीय स्टंट केल्याचा आरोप ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या मालिकेचे लाइन प्रोड्युसर सचिन ससाणे (Sachin Sasane) यांनी केला आहे.

किरण माने यांच्या स्टंटमुळे गावातील आणि जिल्ह्यातील शुटींगसाठीचे वातावरण गढूळ झाले आहे. शुटींगमुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. असे असताना कित्येकांच्या पोटावर पाय आणण्यासाठी किंवा आपल्याकडे शुटींगच येऊ नयेत, अशा पध्दतीने राजकीय पोस्ट करुन दबाव निर्माण केला आहे. पण यात काही तथ्य नाही. चुकीच्या धोरणामुळे किरण माने यांना तीनवेळा वाॅर्निंग देऊन मग त्यांना काढले आहे, असा खुलासा सचिन ससाणे यांनी केला आहे.

सोशल मीडियावर राजकीय पोस्ट केल्याने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढून टाकल्याचा आरोप अभिनेता किरण माने यांनी केला. हे प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. वाई तालुक्यातील गुळुंब ग्रामपंचायती अंतर्गत मयुरेश्वर गावात या मालिकेचे चित्रीकरण सुरु आहे. गुळुंब गावच्या सरपंचांनी चित्रीकरणाची परवानगी रद्द केल्याचे पत्र व्हायरल केले असले तरी आज या मालिकेचे चित्रीकरण सुरु होते.

सरपंचांचे पत्र

गुळुंब ग्रामपंचायतीच्या सरपंच स्वाती शिवाजी माने यांनी किरण माने प्रकरणात एक पत्र व्हायरल करत उडी घेतली आहे. या पत्रात त्या म्हणतात, राजकीय भूमिका मांडणाऱ्या मराठी कलावंताला मालिकेतून काढल्याबद्दल मराठी चित्रपटसृष्टीचा जाहिर निषेध. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुऱ्हाड चालवणाऱ्या स्टार प्रवाह वहिनी व मुलगी झाली हो या मालिकेची संपूर्ण टीमने हे विसरू नये. अजूनही महाराष्ट्रात शिव, शंभू शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणारी लोकशाही नांदते. अशा मनूवादी विचारसरणीच्या स्टार प्रवाह वहिनी व मुलगी झाली हो मालिकेच्या टीमचे आमच्या गावी होत असलेल्या चित्रीकरणाला ग्रामपंचायत गुळुब तालुका वाई जिल्हा सातारा मान्यता नाकारत आहे. अशा प्रवृत्तीला इथून पुढे आमच्या हद्दीत प्रवेश नाही, असे या पत्रात नमूद केले आहे.

गुळुंब गावच्या सरपंचांचे चित्रीकरणाला मान्यता रद्द असे सांगणारे पत्र व्हायरल झाले असले तरी त्यांचा मोबाईल फोन काल रात्रीपासून बंद आहे. त्यांच्या गावीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. गावात ग्रामपंचायतीचा कोणीही पदाधिकारी या प्रकरणावर बोलायला तयार नाही.

Web Title: Line producer sachin sasane of mulgi zali ho serial clarification about termination of kiran mane from serial nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2022 | 05:23 PM

Topics:  

  • Kiran Mane
  • Mulgi Zali Ho

संबंधित बातम्या

“अनाजीपंता, कितीबी आग लाव…” ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर किरण मानेंची पोस्ट
1

“अनाजीपंता, कितीबी आग लाव…” ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर किरण मानेंची पोस्ट

शरद उपाध्ये- निलेश साबळे वादावर किरण मानेंची पोस्ट; म्हणाला, “टीकाकारांना उंच कोलून टाक आणि म्हण…”
2

शरद उपाध्ये- निलेश साबळे वादावर किरण मानेंची पोस्ट; म्हणाला, “टीकाकारांना उंच कोलून टाक आणि म्हण…”

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर किरण मानेची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल, पोस्ट शेअर करत भारतीय लष्कराचे केले अभिनंदन
3

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर किरण मानेची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल, पोस्ट शेअर करत भारतीय लष्कराचे केले अभिनंदन

Kiran Mane On Phule Movie: “हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट”, फुले सिनेमाच्या प्रदर्शनाच्या स्थगितीवरुन किरण मानेंची घणाघाती पोस्ट…
4

Kiran Mane On Phule Movie: “हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट”, फुले सिनेमाच्या प्रदर्शनाच्या स्थगितीवरुन किरण मानेंची घणाघाती पोस्ट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.