'याला म्हणतात संस्कार...' गौरव मोरेचा 'तो' व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांची कमेंट; अभिनेत्याचं होतंय कौतुक
“गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा” म्हणणारा गौरव मोरे सध्या त्याच्या एका कृत्यामुळे चर्चेत आहे. “महाराष्ट्राची हास्यजत्रा” या कॉमेडी शोच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरात प्रसिद्ध झालेला गौरव मोरे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. नुकतंच शरद केळकरच्या ‘रानटी’ चित्रपटाचा प्रीमियर पडला. या प्रीमियरला मराठी इंडस्ट्रीतल्या अनेक लोकप्रिय कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी बॉलिवूड इंडस्ट्रीतल्याही काही मोजक्या कलाकारांनी उपस्थिती लावली होती. चित्रपटाच्या प्रीमियरला सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनीही उपस्थिती लावली होती. बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक येताच गौरवने केलेल्या कृत्यामुळे तो चर्चेत आला आहे.
अर्जुन कपूरच्या ब्रेकअपनंतर मलायका अरोराने केले मूव्ह ऑन, परदेशात घेतेय सुट्टीचा आनंद!
‘राजश्री मराठी’च्या इन्स्टा अकाऊंटवर प्रीमियर दरम्यानचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ‘रानटी’ चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियरला मराठी इंडस्ट्रीसह बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारांनीही उपस्थिती लावली होती. प्रीमियरला अभिनेता गौरव मोरे उपस्थित होता. यावेळी बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनीही उपस्थिती लावली होती. गायक कैलाश खेर आणि ‘रानटी’ चित्रपटाचे दिग्दर्शक समित कक्कड यांनी एकमेकांची भेट घेतल्यानंतर अभिनेता गौरव मोरेने दोघांचेही पाया पडून आशिर्वाद घेतले. त्याच्या ह्या कृत्याचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये गौरव मोरेचे नेटकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे. व्हायरल व्हिडिओवर नेटकरी म्हणतात, “याला म्हणतात संस्कार”, “जमिनीवर पाय असलेला अभिनेता गौरव मोरे”, “ग्रेट आहेस तू”, “मराठी माणसांचे संस्कार”, “तो खूप साधा आणि नम्र माणूस आहे, त्याने उत्तम कॉमेडीमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय”, “अभिमान आहे, गौरव तुझा…” अशा शब्दात चाहत्यांनी अभिनेत्याचे कौतुक आहे. ‘अल्याड पल्याड’, ‘बॉईज ४’, ‘लंडन मिसळ’, ‘अंकुश’ या चित्रपटांमुळे आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ‘मॅडनेस मचाएंगे’ या दोन शोमुळे गौरव चर्चेत आला आहे. गौरव मोरे लवकरच प्रसाद ओकच्या ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नागा चैतन्य आणि शोभिता नाही करणार धुमधडाक्यात लग्न; अभिनेता नागार्जुनने शेअर केले खास तपशील!