Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सालबर्डी’मध्ये सरपंच-उपसरपंचांची जुगलबंदी! शशांक शेंडे आणि ओंकार भोजने आमने-सामने

शशांक शेंडे आणि ओंकार भोजने या दोघांचा आगामी मराठी चित्रपट लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ‘सालबर्डी’ या चित्रपटामध्ये नवी कथा आणि शशांक शेंडे आणि ओंकार भोजनेची अनोखी केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 11, 2026 | 04:00 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीत ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित कथा नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसते. गावातील नाती, स्थानिक राजकारण, त्यातून निर्माण होणारे तणाव आणि विनोदी प्रसंग यांची रंगत पडद्यावर पाहायला मिळाली की प्रेक्षकांना त्यात वेगळीच मजा येते. आता अशीच एक रंगतदार कथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी ‘सालबर्डी’ या चित्रपटात गावच्या राजकारणातील सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील नोकझोक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

या चित्रपटात अनुभवी अभिनेते शशांक शेंडेसरपंच गणपत पाटील यांच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर आपल्या खास विनोदी शैलीसाठी ओळखला जाणारा ओंकार भोजने उपसरपंच मुकिंदा थोरात ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. गावातील सत्तासंघर्ष, एकमेकांवरची टोलेबाजी आणि संवादांमधील चुरस यामुळे या दोघांच्या व्यक्तिरेखा चित्रपटात विशेष रंगत आणणार आहेत. ग्रामीण राजकारणाच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी ही कथा प्रेक्षकांना एकाच वेळी थरार, रहस्य आणि विनोदाचा अनुभव देणार असल्याचे बोलले जात आहे. हा चित्रपट येत्या १७ एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

निक जोनसची बहिण मायाचं निधन, अवघ्या ३० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, दुर्लभ आजाराने होती ग्रस्त

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शशांक शेंडे म्हणाले की, “‘सालबर्डी’ची कथा खूप रहस्यमय आहे. स्थानिक पातळीवरचे राजकारण, त्यातून निर्माण होणारे तणाव आणि माणसांमधील नातेसंबंध यांची झलक या कथेत पाहायला मिळते. ओंकारसोबत काम करताना उत्तम ट्युनिंग जमले आणि आम्ही साकारलेल्या भूमिका पडद्यावर पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरेल.”

तर ओंकार भोजने यांनीही आपल्या भूमिकेबद्दल उत्साह व्यक्त केला. ते म्हणाले, “उपसरपंच मुकिंदा थोरात ही व्यक्तिरेखा खूप रंगतदार आहे. शशांक सरांसारख्या अनुभवी कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. आमची ही जुगलबंदी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा मला विश्वास आहे.”

महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या ‘सालबर्डी’ या गावात घडणाऱ्या रहस्यमय आणि अस्वस्थ करणाऱ्या घटनांचा शोध घेणारी ही कथा आहे. गावातील वातावरण, स्थानिक राजकारण आणि त्या पार्श्वभूमीवर उलगडणारा थरार या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट नेब्युला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून दिग्दर्शनाची धुरा रमेश साहेबराव चौधरी यांनी सांभाळली आहे.

“अश्लील शब्द वापरणे म्हणजे क्रिएटिव्हिटी नाही…”, सोना मोहापात्रा यांचा संताप, Badshah च्या ‘टिटरी’ गाण्यावर केली टीका

‘सालबर्डी’मध्ये शशांक शेंडे आणि ओंकार भोजने यांच्यासोबत पूजा सावंत, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर आणि कोमल चौधरी अशा अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत. दमदार स्टारकास्ट, ग्रामीण पार्श्वभूमी आणि रहस्यमय कथानकामुळे ‘सालबर्डी’ सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. ग्रामीण राजकारणातील संघर्ष, नातेसंबंध आणि रहस्य यांचा संगम असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच वेगळा अनुभव देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Salbardi movie shashank shende omkar bhojane sarpanch upsarpanch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 03:59 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Marathi News

संबंधित बातम्या

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
1

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
2

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
3

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल
4

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.