प्रसिद्ध गायकाचं महात्मा गांधींविषयी धक्कादायक विधान, म्हणाले, "पाकिस्तानची निर्मिती त्यांनी केली..."
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य सध्या त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. कायमच आपल्या गाण्यातून प्रसिद्धीझोतात राहणारे, अभिजीत भट्टाचार्य यांनी काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी महात्मा गांधींविषयी एक धक्कादायक विधान केले आहे. ते म्हणाले की, “महात्मा गांधी हे भारताचे नाही तर, पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते…” त्यांच्या विधानाने सर्वांचेच लक्ष वेधलेय. दरम्यान, या विधानामुळे गायक चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले असून त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे.
गौरव खन्ना ठरला ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’चा विनर, या खास रेसिपीने संजीव कपूरही भारावले…
गेल्या काही महिन्यांपूर्वी अभिजीत भट्टाचार्य यांनी एएनआय या वृत्तसंस्थेच्या पॉडकास्टमध्ये, सामाजिक मुद्द्यांवर मनमोकळेपणाने भाष्य केले. या मुलाखतीदरम्यान अभिजीत भट्टाचार्य महात्मा गांधींविषयी म्हणाले की, “भारतामध्ये आपल्याला शाळेमध्ये असं शिकवलं जातं की, जर तुम्हाला एका गालावर मारलं तर, लगेचच दुसरा गालही तुम्ही पुढे करा. ही गोष्ट खरंतर, शाळेमध्ये पुस्तकामध्ये शिकवली जाते. मी म्हणतो, दुसरं कोणी मारायच्या आधी, आपणंच त्याला मारावं. हे शिकवणं चुकीचं आहे. ही गोष्ट शिकवण्याचे अधिकार कोणी दिले ? पाकिस्तानचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आहेत. ते भारताचे राष्ट्रपिता नाही.”
“गांधी जी ने बनाया पाकिस्तान…” Abhijeet Bhattacharya’s controversial statement#SmitaPrakash #ANIPodcast #AbhijeetBhattacharya #MahatmaGandhi #Pakistan
Watch full episode here: https://t.co/hK6KNZV8wF pic.twitter.com/JJ20Ua5Hk4
— ANI (@ANI) April 11, 2025
पुढे मुलाखती दरम्यान अभिजीत भट्टाचार्य म्हणाले की, “पाकिस्तान बनवला गेला, तो कोणी बनवला? पाकिस्तान तर आस्तित्वात नव्हताच ना? तो १९४७ मध्ये बनवला गेला. भारत तर सुरुवातीपासूनच भारत होता. मग तुम्ही त्यांना राष्ट्रपिता कसं काय म्हणता? गांधीजींनी फक्त एकच राष्ट्र निर्माण केला आणि तो म्हणजे पाकिस्तान. इंदिरा गांधींनी बांगलादेश निर्माण केला. मी महात्मा गांधींपेक्षा इंदिरा गांधींचा जास्त आदर करतो. भारत कित्येक वर्षांपासून अस्तित्वात आहे. आपल्याकडे ऋषी आणि संत होऊन गेलेत.” दरम्यान, अभिजीत भट्टाचार्यच्या विधानाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून नेटकऱ्यांकडून त्यांच्या विधानाचे कौतुक केले जात आहे. अनेक युजर्सच्या मते, गायकाचे विधान हे कॉन्ट्रॉव्हर्शियल नाही.