Kesari 2 Actor Akshay Kumar Reacts On Jaya Bachchan Remark On His Film Toilet Ek Prem Katha
अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहुप्रतिक्षित ‘केसरी २’ चित्रपट येत्या १८ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. नुकताच ह्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. त्यानंतर आता माध्यमांसोबत संवाद साधला. पत्रकार परिषदेदरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ चित्रपटावर ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी टीका केली होती, यांसंबधित अक्षयला प्रश्न विचारण्यात आला. खासदार जया बच्चन यांनी या चित्रपटावर टीका करताना ‘असं कधी चित्रपटाचं नाव असतं का ?’ असं त्यांनी वक्तव्य केलं होतं. नेमकं जया बच्चन काय म्हणाल्या होत्या आणि त्या प्रश्नावर अक्षयने काय प्रतिक्रिया दिली, जाणून घेऊया…
‘प्रीती, तू किती Preety आहेस’ सौंदर्य असावे तर असे…
पत्रकार परिषद दरम्यान अक्षयला, जेव्हा सहकलाकार जेव्हा तुझ्या चित्रपटांवर टीका करतात, तेव्हा तुझी प्रतिक्रिया काय असते ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर अक्षयने उत्तर दिले की, “मला नाही वाटत, माझ्या चित्रपटांवर कोणी टीका केली असेल. कोणतरी मूर्खच असेल, जो टीका करेल. पॅडमॅन, टॉयलेट एक प्रेम कथा, एअरलिफ्ट, केसरी १ आणि २ हे चित्रपट खरंतर मी मनापासून बनवले आहेत. असे अनेक सिनेमे आहेत. त्यामुळे यावर टीका करणारा खरंच कोणी मूर्खच असेल. हे सिनेमे लोकांना आरसा दाखवतात.”
‘मिलिमीटर’ अब सेंटिमीटर हो गया…, पाहा आता कसा दिसतो ‘3 इडियट्स’मधला तो प्रसिद्ध अभिनेता
त्यानंतर, अक्षयने जया बच्चन यांनी ‘टॉयलेट एक प्रेमकथा’या टायटलवर टीका केली होती. त्यावर तो म्हणाला, “आता त्या जर असं म्हणाल्या असतील तर बरोबरच असेल. जर ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ चित्रपट बनवून मी काही चुकीचं काम केलं असेल, असं त्या म्हणत असतील तर त्यांचं म्हणणं बरोबर असेल.” अलीकडेच इंडिया टीव्ही कॉन्क्लेव्हमध्ये जया बच्चन यांनी ‘टॉयलेट एक प्रेमकथा’चा उल्लेख करत म्हणाल्या होत्या की, “चित्रपटाचे नाव पहा, मी असे टायटल असलेले चित्रपट केव्हाच पाहत नाही. असं कधी चित्रपटाचं नाव असतं का ? तुम्हीच सांगा, तुम्हाला अशा नावाचा चित्रपट पहायला आवडेल का? पाहा, इतक्या लोकांपैकी क्वचितच चार लोक हा चित्रपट पाहू इच्छितात; हे खूप दुःखद आहे. हा फ्लॉप चित्रपट आहे.”