Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन फक्त ७०० मीटर दूर; पण…

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर ३४ वर्षीय प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक महेश कालावाडिया बेपत्ता झाला आहे. महेश त्या एअर इंडियाच्या विमानातही नव्हता किंवा ज्या हॉस्टेलवर ते विमान कोसळलं होतं, त्यातही तो नव्हता.

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 15, 2025 | 08:48 PM
अहमदाबाद विमान दुर्घटनेत प्रसिद्ध सिने निर्मात्याचा मृत्यू, DNA टेस्टनंतर पटली ओळख

अहमदाबाद विमान दुर्घटनेत प्रसिद्ध सिने निर्मात्याचा मृत्यू, DNA टेस्टनंतर पटली ओळख

Follow Us
Close
Follow Us:

अहमदाबाद विमान दुर्घटना होऊन चार दिवस उलटून गेले आहेत. या घटनेचा साधा विचार जरी केला तरी अंगावर काही सेकंदात काटा येतो. या घटनेमध्ये शेकडो लोकं मृत्युमुखी पडले आहेत. या विमान दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींची सध्या डीएनए टेस्टच्या माध्यमातून ओळख पटवण्याचं काम सध्या सुरु आहे. दरम्यान, अशातच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे, या दुर्घटनेनंतर ३४ वर्षीय प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक महेश कालावाडिया बेपत्ता झाला आहे. महेश त्या एअर इंडियाच्या विमानातही नव्हता किंवा ज्या हॉस्टेलवर ते विमान कोसळलं होतं, त्यातही तो नव्हता. त्या घटनेपासून गायक बेपत्ता असून त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेऊन काळजी व्यक्त करत आहेत.

गोविंद नामदेव यांनी शिवांगी वर्माच्या ‘त्या’ कमेंटवर दिले प्रत्युत्तर; म्हणाले, “एखाद्या व्यक्तीचे संस्कार…”

विमान दुर्घटनेनंतर गायकाच्या कुटुंबीयांनी त्याची रुग्णालय, शवगृह आणि पोलीस ठाण्यात चौकशी केली. परंतु महेशचा कुठेच पत्ता लागत नाही. महेश त्याच्या स्कूटरवरुन घरी येण्यासाठी निघाला होता. विमान दुर्घटनेला आज चार दिवस उलटून गेले तरीही अद्याप त्याच्या कुटुंबीयांना त्याच्याविषयी किंवा त्याच्या स्कूटरविषयी कोणतीही माहिती मिळाली नाही. महेशचे कुटुंबीय त्याच्याबद्दल चिंतेत असण्यामागचं मोठं कारण म्हणजे त्याच्या फोनचं शेवटचं लोकेशन… गायकाचं शेवटचं लोकेशन बीजे मेडिकल कॉलेज हॉस्टेलपासून 700 मीटरवर दाखवलं गेलं होतं. त्यानंतर त्याचा फोन स्वीच ऑफ झाल्याचं दाखवलं जात आहे. त्याच्या लोकेशनपासून जवळ असणाऱ्या या मेडिकल कॉलेज हॉस्टेलवरच एअर इंडियाचं हे विमान कोसळलं.

शालू- जब्यानं खरंच लग्न केलं का? राजेश्वरी खरातने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाली, “लवकरच मी सर्वांना गुड न्यूज…”

लोकप्रिय संगीत दिग्दर्शक महेशचा छोटा भाऊ कार्तिक याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की, “गुरुवारी दुपारी १ वाजून १० मिनिटांच्या सुमारास महेशने पत्नी हेतलशी फोनवर संवाद साधला होता. त्याची लॉ गार्डनजवळील मिटींग संपल्यानंतर तो घरी परतत होता, अशी त्याने स्वत: माहिती पत्नीला दिली होती. फोनवर दोघांची थट्टामस्करीही झाली होती. फोन केल्याच्या तासाभरानंतरही महेश घरी न परतल्याने हेतलने त्याचा नंबर पुन्हा डाएल केला. तेव्हा त्याचा फोन स्विच ऑफ असल्याचं समजलं. हेतलने त्याला सतत फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा नंबर स्वीच ऑफच येत होता.

Natya Parishad Puraskar: नीना कुळकर्णी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित; ‘या’ नाटकाने पटकवला सर्वोत्कृष्ट नाटकाचा किताब

हेतलला जेव्हा विमान दुर्घटनेविषयी समजलं, तेव्हा तिने लगेचच कार्तिकला फोन केला. पुढे गायकाच्या भावाने सांगितलं की, “महेशबाबत चिंताग्रस्त असतानाही मला वाटलं की यात काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही. कारण जिथे ही घटना घडली होती, तिथून त्याचा जाण्याचा मार्गच नाही. पण पोलिसांकडे चौकशी केल्यानंतर भावाच्या मोबाइलचं शेवटचं लोकेशन हे त्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलपासून 700 मीटर अंतरावर दाखवलं. पोलिसांनी सांगितलं की मोबाइलचा डेटा अचूक स्थान दाखवत नाही, त्यामुळे कदाचित तो दुर्घटनास्थळाच्या जवळही असावा”, असं कार्तिकने पुढे सांगितलं. तो नेहमीचा मार्ग नसतानाही महेश तिथून का गेला असावा, असा प्रश्न त्याच्या कुटुंबीयांना पडला आहे. त्यांनी जवळच्या सर्व रुग्णालयांमध्ये त्याच्याविषयी चौकशी केली. परंतु महेश अद्याप बेपत्ताच आहे.

Web Title: Mahesh kalawadia missing after ahmedabad plane crash last location 700 meters family search morgue hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 08:48 PM

Topics:  

  • Ahmedabad
  • Ahmedabad plane crash
  • Famous Singer

संबंधित बातम्या

Sunidhi Chauhan Birthday: वयाच्या चौथ्यावर्षी सुरु केला गाण्याचा प्रवास; कुटुंबासोबत लढून मोडले धर्माचे बंधन
1

Sunidhi Chauhan Birthday: वयाच्या चौथ्यावर्षी सुरु केला गाण्याचा प्रवास; कुटुंबासोबत लढून मोडले धर्माचे बंधन

Suresh Wadkar Birthday: कुस्ती स्पर्धा जिंकल्यानंतर कसे बनले महाराष्ट्राचे लाडके गायक? सुरेश वाडकर यांच्याबद्दल काही खास गोष्टी
2

Suresh Wadkar Birthday: कुस्ती स्पर्धा जिंकल्यानंतर कसे बनले महाराष्ट्राचे लाडके गायक? सुरेश वाडकर यांच्याबद्दल काही खास गोष्टी

India Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी धावणार? रेल्वे मंत्र्यानी स्पष्टच सांगितले…
3

India Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी धावणार? रेल्वे मंत्र्यानी स्पष्टच सांगितले…

Shocking News : बोटांमध्ये चावी फिरवत वर्गातून बाहेर पडली, नंतर थेट दहावीच्या विद्यार्थिनीने चौथ्या मजल्यावरून मारली उडी
4

Shocking News : बोटांमध्ये चावी फिरवत वर्गातून बाहेर पडली, नंतर थेट दहावीच्या विद्यार्थिनीने चौथ्या मजल्यावरून मारली उडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.