Fandry Fame Rajeshwari Kharat On Her Marriage Rumors With Somnath Awghade
२०१४ साली रिलीज झालेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फॅंड्री’ चित्रपटातून महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्ध झालेल्या जब्या आणि शालूची जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चित्रपटामध्ये जब्याची भूमिका सोनमाथ अवघडेने तर, शालूची भूमिका राजेश्वरी खरातने साकारली होती. जब्या आणि शालूचा गेल्या काही दिवसांपूर्वी लग्नाचा एक फोटो व्हायरल झाला होता. तेव्हापासून सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते जब्या आणि शालू तुम्ही खरंच एकमेकांशी लग्न केलंय का ? असा प्रश्न विचारताना दिसत आहे.
रेणुका शहाणे दिग्दर्शित मराठी ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म New York Indian Film Festival सादर होणार
राजेश्वरीने गेल्या काही दिवसांमध्ये जब्यासोबतचे अनेक फोटो शेअर केले होते. अखेर या फोटोंविषयी आणि सोमनाथसोबत खरंच लग्न केलंय का? याविषयी राजेश्वरी खरातने एका मुलाखतीच्या माध्यमातून मोठा खुलासा केला आहे. अलिकडेच राजेश्वरीने ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये राजेश्वरीने खुलासा केला की, “मला असं वाटतं की तो प्रश्न सध्या मी गुपितच ठेवते; कारण लग्न झालं आहे की नाही हे लोकांना ठरवू दे. मला थोडा सस्पेन्स ठेवायचा आहे, मी काही दिवसातच सर्वांना ‘गुड न्यूज’ देईन.”
नीना कुळकर्णी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित; ‘या’ नाटकाने पटकवला सर्वोत्कृष्ट नाटकाचा किताब
मुलाखतीमध्ये पुढे राजेश्वरीने सांगितले की, “मी गेल्या काही दिवसांमध्ये सोमनाथसोबत अनेक शूट्स केले आहेत, लवकरच सर्वांना छान प्रोजेक्ट पाहायला मिळतील. तर माझी आणि त्याची अपूर्ण राहिलेली गोष्ट होती, ती पूर्ण झालेली या प्रोजेक्टमधून पाहायला मिळणार आहे. खूप छान प्रोजेक्ट्स, स्टोरी आणि स्क्रिप्ट्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत.” असे म्हणत सोमनाथसोबतचे अनेक प्रोजेक्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत, असा खुलासा राजेश्वरीने केला. पण, खऱ्या आयुष्यात त्यांचे लग्न झाले आहे यावर काही दिवसांनी खुलासा करेन, असे अभिनेत्रीने सांगितले.
Kedarnath Helicopter Crash वर राहुल वैद्यने व्यक्त केला संताप, म्हणाला ‘मानवी जीवनाचे शून्य मूल्य…’
अभिनेत्री राजेश्वरी खरात कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. रिल्स आणि डान्सच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणारी अभिनेत्री आता कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबरोबरच राजेश्वरी कोणती आनंदाची बातमी देणार, हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे.