Govind Namdev Befitting Reply To Shivangi Verma Over Last Year Viral Photo
गेल्या काही दिवसांपासून टॉलिवूड अभिनेता गोविंद नामदेव कमालीचे चर्चेत आहे. अभिनेत्री शिवांगी वर्मासोबत जोडल्या गेलेल्या नावामुळे अभिनेत्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. शिवांगी वर्मा हिने ज्येष्ठ अभिनेते गोविंद नामदेव यांच्या विरोधात लिहिलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. त्या पोस्टवर स्वत: टॉलिवूड अभिनेता गोविंद नामदेव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गोविंद नामदेव आणि शिवांगी वर्मा हिचा ‘गौरीशंकर गोहरगंज’ चित्रपटातील शुटिंग दरम्यानचा एक फोटो व्हायरल होत आहे. जो शिवांगी वर्माने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला होता. फोटो शेअर करताना शिवांगीने “प्रेमाला वय नसते, मर्यादा नसते.” असं कॅप्शन दिलं आहे. यानंतर अभिनेत्रीने अभिनेत्याविरुद्ध काही शब्द बोलले, त्यानंतर आता अभिनेत्याने तिला चोख उत्तर दिले आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, “कोणीतरी बरोबर म्हटले आहे, वाढत्या वयानुसार वृद्ध लोक वेड्यासारखे वागतात.” अभिनेत्याने या पोस्टवर प्रत्युत्तर दिले आहे.
रेणुका शहाणे दिग्दर्शित मराठी ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म New York Indian Film Festival सादर होणार
३१ वर्षीय अभिनेत्री शिवांगी वर्माच्या पोस्टवर ७० वर्षीय अभिनेते गोविंद नामदेव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने सांगितले की, “एखाद्या व्यक्तीचे संगोपन कसे असते ? त्याचे संस्कार कसे असतात ? तो त्याच विचारसरणीचा माणूस असतो आणि त्यानुसार त्याचे जीवन पाहतो आणि लोकांशी व्यवहार करतो. त्यांची मानसिकता या गोष्टींमुळे तयार होते आणि ते जीवनाकडे पाहण्याच्या आणि इतरांशी संवाद साधण्याच्या दृष्टिकोनातून प्रतिबिंबित होते. ही संपूर्ण परिस्थिती त्याचेच प्रतिबिंब आहे. माफी मागण्याऐवजी ती गोष्टी कशा हाताळते हे तिच्या स्वतःच्या समजुतीवर अवलंबून आहे, मी अशा गोष्टींकडे जास्त लक्ष देत नाही.”