Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Movie : “मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही, हे रडगाणं…” सचिन खेडेकरांचा तो सवाल! मांजरेकर स्पष्टच बोलले

Sachin Khedekar आणि Mahesh Manjrekar यांच्यातील संवाद सध्या चर्चेत आहे. Kon Honar Marathi Crorepati या कार्यक्रमात मराठी सिनेमांवर मनमोकळ्या गप्पा रंगल्या.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 02, 2026 | 03:21 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • शोचे होस्ट सचिन खेडेकर यांनी मराठी सिनेमा या विषयावर महेश मांजरेकरांशी मनसोक्त गप्पा केल्या
  • “मराठी सिनेमा आणि त्याला न मिळणारं थिएटर” हा विषय चांगलाच गाजला
  • तेव्हा महेश मांजरेकर स्पष्ट शब्दात उत्तर दिलं
Marathi Movie : नुकतेच सोशल मिडीयावर अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि अभिनेते सचिन खेडेकर या दोघांमध्ये झालेला संवाद चर्चेत आलेला आहे. ‘कोण होणार मराठी करोडपती?’ या मराठी कार्यक्रमात महेश मांजरेकर उपस्थित होते, त्यावेळी शोचे होस्ट सचिन खेडेकर यांनी मराठी सिनेमा या विषयावर महेश मांजरेकरांशी मनसोक्त गप्पा केल्या. या संवादादरम्यान “मराठी सिनेमा आणि त्याला न मिळणारं थिएटर” हा विषय चांगलाच गाजला आणि हाच विषय सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

‘घर बरकत आई…’, Munawar Faruqui ने दिली Good News! पत्नी मेहजबीन आणि मुलीची पहिली झलक पहाच!

नक्की काय झाला संवाद?

या संवादादरम्यान सचिन खेडेकरांनी दिग्दर्शक महेश मांजरेकरांना सवाल केला की “तुम्ही मराठी तसेच हिंदी सिनेमे करता. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाहीत असे आपण रडगाणे करतोय. आपल्यावर अन्याय होतो? यावर तुम्हाला काय वाटतं?” तेव्हा महेश मांजरेकर स्पष्ट शब्दात उत्तर देतात.

दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणतात की, “मला नाही वाटत हा अन्याय आहे. आपला सिनेमा चालला नाही तर प्रत्येक जण हेच म्हणतो की थिएटर मिळत नाही. लोकं सिनेमा पाहायला आले नाही म्हणजे नक्कीच सिनेमात काही कमतरता असेल. याच खापरं आपण थिएटरवर नाही फोडू शकत. नटसम्राट, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय तसेच काकस्पर्श हे देखील मराठी सिनेमेच होते आणि या सिनेमांना आफत शो मिळाले आहेत. तो थिएटरवाला बसलाय ना तिथे! त्याला बिजनेस करायचा आहे. जर सिनेमा चालणार तर तो नक्कीच शो वाढवणार.” इतकं सांगताना महेश मांजरेकरांनी मराठी Filmmakers ला मोलाचा संदेश दिला आहे. त्यांचं म्हणणं आहे की “मराठी सिनेमाने आता पुढे गेलं पाहिजे. कंटेन्ट तसा असेल तर प्रेक्षक नक्कीच दाद देतात. मराठी सिनेमांनी आपल्या बजेटला आता वाढवलं पाहिजे.” त्यांचे म्हणणे आहे की 3 कोटींच्या रकमेने 10 सिनेमे काढण्यापेक्षा 30 कोटींचा एकच सिनेमा काढा ना! OTT आल्यापासून सिनेमांचा एक दर्जा तयार झाला आहे आणि त्या दर्जाचे सिनेमे काढण्यामध्ये आपण कमी पडतोय.

IPL संपताच बॉक्स ऑफिसवर होणार धुमाकूळ! Ram Charan चा बहुचर्चित Peddi चित्रपट ‘या’ तारखेला चित्रपटगृहात

महेश मांजरेकरांच्या या उत्तरावर अनेक मराठी प्रेक्षकांनी सहमती दाखवली आहे. तसेच महेश मांजरेकरांकडून एका उत्तम मराठी चित्रपटाची अपेक्षा वर्तवली आहे.

Web Title: Mahesh manjrekar about marathi cinema and less theaters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • mahesh manjrekar
  • Sachin khedekar

संबंधित बातम्या

Dasami Marathi Movie: ‘दशमी’चा पहिला पोस्टर प्रदर्शित; महेश मांजरेकरांसह दिग्गज कलाकारांची फौज
1

Dasami Marathi Movie: ‘दशमी’चा पहिला पोस्टर प्रदर्शित; महेश मांजरेकरांसह दिग्गज कलाकारांची फौज

Kon Honar Crorepati: ‘कोण होणार करोडपती’मध्ये मोठा बदल; बॉलिवूडची मराठमोळी अभिनेत्री सांभाळणार सूत्रसंचालनाची धुरा, प्रोमो व्हायरल
2

Kon Honar Crorepati: ‘कोण होणार करोडपती’मध्ये मोठा बदल; बॉलिवूडची मराठमोळी अभिनेत्री सांभाळणार सूत्रसंचालनाची धुरा, प्रोमो व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.