Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मलायका अरोराचा ‘माझा येक नंबर’ गाण्यात जलवा, अभिनेत्रीच्या कातील अदांनी चाहते घायाळ

प्रेक्षकांकडून तेजस्विनी पंडीतच्या 'येक नंबर' चित्रपटाच्या ट्रेलरला भरभरून प्रतिसाद मिळत असतानाच निर्मात्यांनी चित्रपटाचं टायटल साँग रिलीज केले आहे. एनर्जीने भरलेल्या 'माझा येक नंबर' या गाण्याला अजय-अतुल यांचे संगीत आणि शब्द लाभले आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Oct 02, 2024 | 01:42 PM
मलायका अरोराचा 'माझा येक नंबर' गाण्यात जलवा, अभिनेत्रीच्या कातील अदांनी चाहते घायाळ

मलायका अरोराचा 'माझा येक नंबर' गाण्यात जलवा, अभिनेत्रीच्या कातील अदांनी चाहते घायाळ

Follow Us
Close
Follow Us:

तेजस्विनी पंडीतच्या ‘येक नंबर’ चित्रपटाची सध्या प्रेक्षकांची चांगलीच चर्चा होत आहे. मोशन पोस्टर, टीझर आणि ट्रेलरनंतर चित्रपटाचं टायटल साँग रिलीज झालं आहे. आपली प्रेमकहाणी पूर्ण करण्यासाठी गावात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना घेऊन येण्यासाठी मुंबईत निघालेल्या एका सामान्य तरुणाची असामान्य कहाणी यात पाहायला मिळणार असल्याचे दिसत आहे. प्रतापचा राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचण्याचा संघर्षमयी प्रवास आपल्याला चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. काही तासांपूर्वीच चित्रपटाचं टायटल साँग रिलीज झालं आहे.

हे देखील वाचा – सूरज चव्हाणचे बिग बॉसने केले कौतुक; म्हणाले, ‘तुम्ही महाराष्ट्राचे सुपुत्र…’ स्तुती ऐकून आले डोळ्यात पाणी

प्रेक्षकांकडून चित्रपटाच्या ट्रेलरला भरभरून प्रतिसाद मिळत असतानाच निर्मात्यांनी चित्रपटाचं टायटल साँग रिलीज केले आहे. एनर्जीने भरलेल्या ‘माझा येक नंबर’ या गाण्याला अजय-अतुल यांचे संगीत आणि शब्द लाभले असून या जबरदस्त गाण्याला जोनिता गांधीचा आवाज लाभला आहे. तर सौरभ अभ्यंकरचं रॅप आहे. गणेश आचार्य यांचे नृत्यदिग्दर्शन लाभलेल्या या गाण्याची खासियत म्हणजे अवघ्या बॉलिवूडला भुरळ घालणारी मलायका अरोरा या गाण्याच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

या रॅपसाँग मधून मलायका आपल्या अदाकारीने चाहत्यांना घायाळ करणार आहे आणि यात तिला साथ लाभणार आहे महाराष्ट्राचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधवची. अशी तगडी टीम लाभलेले हे गाणे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात धुमाकूळ घालणार असल्याचे दिसतेय. हे आयटम साँग ऐकायला जितके एनर्जेटिक आहे तितकेच पाहायलाही कमाल आहे. प्रत्येकाला ठेका धरायला लावणाऱ्या या गाण्यात सिद्धार्थ एका अनोख्या अंदाजात दिसत आहे. मलायका आणि सिद्धार्थला एकत्र पडद्यावर पाहाणे, म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच आहे. खूप हॅपनिंग आणि एनर्जीने भरलेले हे गाणे प्रत्येकाच्या ओठांवर रुळणारे आहे.

गाण्याबद्दल अजय गोगावले सांगतात, “पूर्वी चित्रपटात हमखास आयटम साँग असायचे. हा प्रकार हल्ली जरा कमी झाला होता. मात्र पुन्हा एकदा आम्हाला येक नंबरच्या निमित्ताने आयटम साँग करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात आयटम साँग असले तरी ते विनाकारण नाही. कारण मुळात कथेची गरज होती. परंतु आपल्याकडे नृत्य म्हटले की मराठी ठेका, आपली एक मराठी शैली येते. परंतु आम्हाला यात काहीतरी वेगळे करायचे होते. त्यामुळे याचाच आधार घेत आम्ही रॅप, हिपहॉप पद्धतीने हे गाणे करण्याचा एक नवीन प्रयत्न केला आहे.”

हे देखील वाचा – ‘तोंड काळं करा हिचं’, जयपूरमध्ये तृप्ती डिमरीवर व्यक्त केला महिलांनी संताप, नेमकं काय आहे प्रकरण?

‘येक नंबर’म्हणजे एक कौटुंबिक, रोमँटिक लव्हस्टोरी, सस्पेन्स असे मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज आहे, हे नक्की ! झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित, ‘येक नंबर’चे तेजस्विनी पंडित, वरदा नाडियाडवाला निर्माते आहेत. तर झी स्टुडिओजच्या उमेश कुमार बन्सल यांचेही या चित्रपटाला सहकार्य लाभले आहे. येत्या १० ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजेश मापुस्कर दिग्दर्शित या चित्रपटात धैर्य घोलप, सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: Majha yek number song malaika arora enters in marathi cinema via yek number watch her item song

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2024 | 01:27 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.