सूरज चव्हाणचे बिग बॉसने केले कौतुक; म्हणाले, 'तुम्ही महाराष्ट्राचे सुपुत्र...' स्तुती ऐकून आले डोळ्यात पाणी
बिग बॉसच्या पाचव्या सीझनचा हा शेवटचा आठवडा सुरू आहे. ह्या शेवटच्या आठवड्यात स्पर्धकांना भेटायला त्यांना त्यांचे चाहते येत आहेत. स्पर्धकांचा फिल्म इंडस्ट्रीतला प्रवास संपूर्ण महाराष्ट्राला बिग बॉसच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. कालच्या एपिसोडपासून प्रेक्षकांना स्पर्धकांचा प्रवास पाहायला मिळत आहे. आजच्या एपिसोडमध्येही प्रेक्षकांना काही स्पर्धकांचा प्रवास पाहायला मिळणार आहे.
काही तासांपूर्वी कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर आजच्या एपिसोडचा पहिला प्रोमो शेअर करण्यात आला आहे. शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये गोलीगत सूरज चव्हाणचा प्रवास पाहायला मिळणार आहे. प्रोमोमध्ये मंचावर, सूरजची गोलीगत एन्ट्री होते. तर सूरजला बिग बॉस म्हणत आहेत,”आपण माझेच काय तर सबंध महाराष्ट्राचे सूपूत्र आहात. या सीझनमध्ये अनेक पॅटर्न पाहायला मिळाले, पण या घरात गाजला तो म्हणजे गोलीगत पॅटर्न…”
बिग बॉसच्या घरात आज प्रत्येक सदस्याच्या प्रवासाचं सेलिब्रेशन असणार असून हे सेलिब्रेशन करण्यासाठी बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे आला आहे. प्रत्येक सदस्याला भेटण्यासाठी त्यांचे चाहते आले आहेत. येत्या ६ ऑक्टोबरला बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले आहे. सध्या बिग बॉसच्या घरामध्ये एकूण सात स्पर्धक आहेत. या सात स्पर्धकांमधून एकूण पाच स्पर्धक ग्रँड फिनालेसाठी पोहोचतील आणि त्यातूनच एक स्पर्धक बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची ट्रॉफी जिंकेल.