(फोटो सौजन्य-Social Media)
जयपूरमधील काही महिला तृप्ती डिमरी यांच्यावर नाराज आहेत. जयपूर FICCI FLO (फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री लेडीज ऑर्गनायझेशन) च्या महिलांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अभिनेत्रीने 5 लाख रुपये घेतले होते, परंतु पैसे दिल्यानंतरही ती कार्यक्रमाला पोहोचली नाही. अभिनेत्री कार्यक्रमाला न पोहोचल्याने आयोजक संतापले, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिड डेच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्रीने या कार्यक्रमासाठी 5.5 लाख रुपये घेतले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने मनीष मल्होत्राच्या फॅशन शोसाठी जयपूर इव्हेंट वगळला होता, ज्यामुळे अनेक लोक तिच्यावर नाराज झाले होते. सोशल मीडियावर एका महिलेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती तृप्ती डिमरीचा चेहरा काळा करताना दिसत आहे.
महिलेने अभिनेत्रीच्या तोंडाला काळे फासले
महिलेने रंगमंचावरील अभिनेत्रीच्या पोस्टरला काळे फासले आणि तोंड काळे करा असे सांगितले. ती महिला पुढे म्हणते, ‘हा चित्रपट कोणी पाहणार नाही. वचन दिल्याप्रमाणे हे लोक कार्यक्रमाला उपस्थितीत राहत नाहीत. ती किती मोठी सेलिब्रिटी झाली आहे. हिचे नाव देखील कुणाला माहीत नाही. कोण आहे ते बघायला आलो होतो. अजून कोण याना ओळखतही नाही तर यांचे एवढे नखरे आहेत. ही सेलिब्रिटी म्हणवण्याच्या लायकीची नाही आहे.” असे या व्हिडीओमध्ये ती महिला बोलताना दिसली असून, अभिनेत्रींच्या कृत्यावर ती खूप संतापलेली दिसत आहे.
Today Tripti did a ramp walk with Kartik Aryan for Manish Malhotra’s show walk for courage that’s why she couldn’t attend this event. It’s her team’s mistake they could have managed her dates well.
byu/Mediocre_Activity921 inBollyBlindsNGossip
हे देखील वाचा- पीएम मोदींनी रजनीकांत यांच्या पत्नीला फोन करून सुपरस्टारच्या प्रकृतीची केली विचारपूस!
तृप्ती डिमरी यांच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली
या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या समितीचा भाग असलेल्या एका महिलेने तृप्ती डिमरी यांच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. अभिनेत्रीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे तिने सांगितले. तिने सांगितले की तिने तृप्ती डिमरी यांना अर्धे पेमेंट दिले आहे आणि उर्वरित अर्धे पैसे देखील देणार होते, परंतु तिला 5 मिनिटे थांबण्यास सांगितले गेले. महिलेच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्रीच्या टीमने तिच्याकडून 5.5 लाख रुपये घेतले आहेत, जे तिने अद्याप परत केलेले नाहीत.