Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे यांना ‘माणिक रत्न’ पुरस्काराने सन्मानित

'पद्मश्री' ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. याकरिता हे वर्ष माणिक वर्मा फाउंडेशनतर्फे ‘माणिक स्वर शताब्दी’ २०२५-२०२६ म्हणून साजरं केलं जाणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: May 17, 2025 | 06:22 PM
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे यांना 'माणिक रत्न' पुरस्काराने सन्मानित

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे यांना 'माणिक रत्न' पुरस्काराने सन्मानित

Follow Us
Close
Follow Us:

‘पद्मश्री’ ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. याकरिता हे वर्ष माणिक वर्मा फाउंडेशनतर्फे ‘माणिक स्वर शताब्दी’ २०२५-२०२६ म्हणून साजरं केलं जाणार आहे. या जन्मशताब्दीचे औचित्य साधत आयोजित एका विशेष कार्यक्रमात भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे यांचा सन्मान सुप्रसिद्ध तालयोगी पं.सुरेश तळवलकर यांच्या हस्ते करण्यात आला. तुळशी वृंदावनचे सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देत अत्यंत प्रतिष्ठेचा ‘माणिक रत्न’ पुरस्कार अश्विनी भिडे-देशपांडे यांना याप्रसंगी प्रदान करण्यात आला. वंदना गुप्ते, भारती आचरेकर,अरुणा जयप्रकाश, राणी वर्मा आणि चौरंगचे अशॊक हांडे यावेळी मंचावर उपस्थित होते.

ठरलं! ‘वॉर २’चा टीझर केव्हा रिलीज होणार ? ज्यु. एनटीआरच्या वाढदिवशी हृतिक रोशन देणार खास गिफ्ट…

या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना गायिका अश्विनी भिडे-देशपांडे म्हणाल्या कि, ‘ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार खरंच आनंददायी आहे. माणिक वर्मा यांच्या सोबत माझं वेगळं नातं होतं, त्यामुळे त्यांच्या या ‘स्वरोत्सवात’ माझा हा सन्मान होणं मी भाग्याचं समजते’. ‘ज्यांच्याकडे पहावं आणि त्यांना आदर्श घ्यावा’ असं व्यक्तिमत्त्व म्हणजे माणिक वर्मा. त्यांच्या कुटुंबाकडून प्रेमाचा वारसा मला आजही मिळतोय यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. आजवर अनेक पुरस्कार मिळाले पण हा पुरस्कार माझ्यासाठी विशेष आहे. शब्दांतही व्यक्त करता येणार नाही इतका हा पुरस्कार मोलाचा असून या प्रेमासाठी मी ऋणी आहे’.

जान्हवी कपूरनंतर आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याचा पत्ता कट, करण जोहरने ‘दोस्ताना २’ चा खेळच बदलला

ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या आठवणींना उजाळा देताना सुप्रसिद्ध तालयोगी पं.सुरेश तळवलकर म्हणाले कि, ‘तुमच्याकडे जर चांगलं वागण्याचा स्वभाव नसेल तर कोणतीही कला रुजू शकत नाही. माणिकताईंचा स्वभाव नम्र असल्याने अनेकांना त्यांनी आपलंस केलं. आपल्या याच नम्र स्वभावामुळे माणिकताईंनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. आजही एवढ्या मोठ्या संख्यने उपस्थित असलेले रसिक ही त्यांच्यावरील प्रेमाची व त्यांच्या कलेच्या यशाची पावती आहे’.

‘माणिक मोती’ या कार्यक्रमाचे लेखन-दिग्दर्शन करणारे चौरंगचे अशॊक हांडे यांनी सांगितले कि, आपल्या कलेचा ठसा उमटविणाऱ्या जुन्या व्यक्तिमत्वांची आठवण आपण ठेवायलाच हवी. ‘प्रेरणा’ म्हणून आणि ‘शिकण्यासाठी’ आपल्याला या दिग्गज मान्यवरांनी दिलेला वारसा पुढच्या पिढीपर्यंत नेणं महत्त्वाचं आहे. या कार्यक्रमासाठी मी बरंच संशोधन केलं असून माणिकताईंच्या या चारही लेकींची मला तितकीच उत्तम साथ लाभली यासाठी मी त्यांचा आभारी राहीन.

रश्मिका मंदान्नासोबतच्या नात्याबद्दल विजय देवरकोंडाने सोडले मौन, अभिनेता नक्की काय म्हणाला ?

या पुरस्कार सोहळ्यानंतर चौरंगचे अशोक हांडे आणि माणिक वर्मा फाउंडेशनतर्फे माणिक वर्मा यांच्या जीवनावरील ‘माणिक मोती’ हा कार्यक्रम सादर झाला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी हा कार्यक्रम पुरस्कृत केला होता. यावेळी गायिका माणिक वर्मा यांची एकाहून एक सरस गीते ऐकण्याची संधी रसिकांना मिळाली. या मैफिलीला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी वर्मा यांनी केले.

जयपूर-आत्रोली ख्याल गायिकेच्या परंपरेतील उत्कृष्ट गायिका म्हणून अश्विनी भिडे-देशपांडे यांची संपूर्ण जगात ओळख आहे. त्यांचे शास्त्रीय संगीताचे प्राथमिक शिक्षण पंडित नारायणराव दातार यांच्याकडे झाले. त्यानंतर आपली आई माणिक भिडे यांच्याकडून जयपूर-अत्रौली घराण्याची तालीम त्यांनी घेतली. शास्त्रीय संगीताबरोबरच ठुमरी, दादरा हे उपशास्त्रीय गायन प्रकारसुद्धा त्या गातात. त्यांच्या संस्कृत भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी अनेक स्तोत्रे, स्तुती यांचे गायन केले आहे. त्यांनी स्वतः अनेक बंदिशी रचल्या आहेत.

प्रसिद्ध युट्यूबर निघाली पाकिस्तानची गुप्तहेर, पोलिसांनी केले अटक; काय आहे संपूर्ण प्रकरण?

Web Title: Manik ratna award senior classical singer padmashri ashwini bhide deshpande honored with manik ratna award

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 06:22 PM

Topics:  

  • marathi film
  • Marathi Film Industry

संबंधित बातम्या

१२ वर्ष लिव्ह-इन रिलेशननंतर अभिनेता सारंग साठ्येनं केले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले PHOTO
1

१२ वर्ष लिव्ह-इन रिलेशननंतर अभिनेता सारंग साठ्येनं केले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले PHOTO

‘लास्ट स्टॉप खांदा…’ चित्रपटाचे कलरफुल पोस्टर लाँच, श्रमेश बेटकरसोबत दिसणार ‘ही’ अभिनेत्री
2

‘लास्ट स्टॉप खांदा…’ चित्रपटाचे कलरफुल पोस्टर लाँच, श्रमेश बेटकरसोबत दिसणार ‘ही’ अभिनेत्री

‘बिन लग्नाची गोष्ट’ मधील पाहिलं गाणं रिलीज, प्रिया बापट आणि भारती आचरेकरचा लाभला आवाज
3

‘बिन लग्नाची गोष्ट’ मधील पाहिलं गाणं रिलीज, प्रिया बापट आणि भारती आचरेकरचा लाभला आवाज

Bal Karve: ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4

Bal Karve: ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.