जान्हवी कपूरनंतर आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याचा पत्ता कट, करण जोहरने 'दोस्ताना २' चा खेळच बदलला
करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेला ‘दोस्ताना २’ चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. २०१९ मध्ये निर्माता करण जोहरने ‘दोस्ताना-२’ ची घोषणा केल्यानंतर चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. करण जोहर निर्मित ‘दोस्ताना २’ मध्ये कार्तिक आर्यन आणि लक्ष्य लालवानी यांच्यासोबत जान्हवी कपूरची निवड करण्यात आली होती. परंतु, करण जोहरबरोबरच्या वैचारिक मतभेदामुळे कार्तिकने चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला होता. आता अशातच या संदर्भातील नवीन माहिती समोर आली आहे. ‘दोस्ताना २’ मध्ये अभिनेता विक्रांत मॅसी झळकणार असल्याची चर्चा सुरु आहे. आता निर्मात्यांनी ‘दोस्ताना- २’ च्या कास्टिंगमध्ये बदल करण्यात आल्याचं समजतंय.
प्रसिद्ध युट्यूबर निघाली पाकिस्तानची गुप्तहेर, पोलिसांनी केले अटक; काय आहे संपूर्ण प्रकरण?
‘दोस्ताना- २’मध्ये, कार्तिक आर्यनची रिप्लेसमेंट विक्रांत मेस्सी करणार असल्याचं बोलले जात आहे. तर, जान्हवी कपूरची रिप्लेसमेंट कोण असणार याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘दोस्ताना- २’ची निर्मिती करण जोहरच्या मालकीची असलेल्या ‘धर्मा’ या प्रॉडक्शन हाऊस करणार आहे. चित्रपटात अभिनेता विक्रांत मॅसी आणि अभिनेता लक्ष्य लालवाणी पाहायला मिळणार असून या चित्रपटातील मुख्य नायिकेसाठी नवीन चेहऱ्याला पसंती दिली जाणार आहे. तर पुढच्या वर्षी जानेवारी २०२६ मध्ये चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. लवकरच चित्रपटाच्या शुटिंगलाही सुरुवात केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
पाकिस्तानविरुद्ध बॉलिवूड कलाकार का बोलत नाहीत? दिग्दर्शक अनिल शर्मा जरा स्पष्टच बोलले…
प्रियांका चोप्रा, अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम स्टारर ‘दोस्ताना’ चित्रपट २००८ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरने तर, दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले होते. त्याकाळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती. या चित्रपटातील गाणी त्याकाळी बरीच गाजली होती.