Hrithik Roshan Teases War 2 Update For Jr. NTR's Birthday
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या (Hrithik Roshan) आगामी ‘वॉर २’ चित्रपटाची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. येत्या २० मे रोजी टॉलिवूड अभिनेता ज्युनियर एनटीआरचा (Jr. NTR) ४२ वा वाढदिवस आहे. यादिवशी हृतिक रोशन एक मोठं सरप्राईज देणार आहे. स्वतः हृतिकने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत टीझरची हिंट दिली आहे. अभिनेत्याची ही X पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
जान्हवी कपूरनंतर आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याचा पत्ता कट, करण जोहरने ‘दोस्ताना २’ चा खेळच बदलला
हृतिक रोशननने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तिने लिहिले की, “हॅलो ज्युनियर एनटीआर, तुम्हाला माहितीये का या वर्षी २० मे रोजी काय होणार आहे? माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला कल्पना नाहीये यावर्षी काय होणार आहे. तुम्ही ‘वॉर २’ साठी तयार आहात का?” ज्यु. एनटीआरच्या वाढदिवशी हृतिक ज्यु. एनटीआरला ‘वॉर २’चा टीझर रिलीज करत खास सरप्राइज देणार आहे. याविषयीचे संकेत हृतिकने दिले आहेत.
हृतिक आपल्या आणि एनटीआरच्या चाहत्यांना सरप्राइज देताना ज्यु. एनटीआरच्या ‘वॉर २’मधील पात्राचा पहिला लूक, टीझर किंवा पोस्टर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘वॉर २’ सिनेमाच्या माध्यमातून ज्यु. एनटीआर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. २० मे रोजी ज्युनिअर एनटीआरचा वाढदिवस असतो, त्याच दिवशी ‘वॉर २’ सिनेमाचा पहिला लूक, टीझर किंवा पोस्टर चाहत्यांच्या भेटीला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, ‘वॉर २’ हा २०१९ च्या ‘वॉर’ चित्रपटाचा सिक्वेल असून, यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील सहावा चित्रपट आहे.
रश्मिका मंदान्नासोबतच्या नात्याबद्दल विजय देवरकोंडाने सोडले मौन, अभिनेता नक्की काय म्हणाला ?
‘वॉर २’ चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत हृतिक रोशन, ज्यु. एनटीआर आणि कियारा अडवाणी असून चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केलं आहे. ‘वॉर २’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या १४ ऑगस्ट २०२५ रोजी देशासह परदेशातल्या थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची शुटिंग निर्मात्यांनी स्पेन, इटली, अबू धाबी आणि भारतातील विविध ठिकाणी केली आहे. हृतिक आणि ज्युनियर एनटीआर यांच्यातील एक भव्य डान्स सिक्वेन्स मार्च २०२५ मध्ये मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये शूट करण्यात आला. ज्यामध्ये ५०० हून अधिक बॅकग्राउंड डान्सर्स सहभागी होते.