मराठी कलाविश्वातील अभिनेता, कवी आणि उत्तम सूत्रसंचालक म्हणून अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) लोकप्रिय आहे. आपल्या कलागुणांमुळे अल्पावधीतच संकर्षण चाहत्यांमध्ये चर्चेत राहिला आहे. नाटक, मालिका आणि टेलिव्हिजन शो अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकणारा संकर्षण सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असतो. सध्या संकर्षण कऱ्हाडेचं ‘कुटुंब किर्रतन’ नावाचं नाटक कमालीचं लोकप्रिय ठरताना दिसत आहे. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारा संकर्षण सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.
संकर्षण कऱ्हाडे सध्या परदेशामध्ये त्याच्या फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहे. त्यादरम्यान, संकर्षणला एका परदेशी चाहत्याने खास पत्र लिहित त्याच्या भावना व्यक्त केल्या. याबद्दल सांगताना अभिनेत्याने पोस्टमध्ये लिहिलंय, “असे भारी आपले प्रेक्षक… २ दिवस सुट्टी मिळाली म्हणुन कुटुंबासोबत बाहेरगावी आलोय… एका टेबलवर जेवायला बसलो तर, पलीकडच्या टेबलवर ४ यंगस्टर्स बसले होते… मराठी, मध्येच हिंदी, इंग्लिश सगळं बोलत होते… अधे मध्ये माझ्याकडे पाहत होते… मी “त्यांनी मला ओळखलंय का नाही” हा अंदाज बांधत होतो आणि खरंतर “त्यांनी मला ओळखावं” अशी मनांत अपेक्षाही करतच होतो… जेवण झालं आणि ते निघून गेले… मी निघतांना हाॅटेलच्या स्टाफने पत्रं आणून दिलं… जान्हवी आणि वेदांत ह्यांनी अत्यंत सुंदर अक्षरांत त्यांचं म्हणनं पत्रातून माझ्यापर्यंत पोहोचवलं… मला त्या तरुणांच्या दोन्ही गोष्टींचं कौतुक वाटलं… पहिलं; त्यांना मी कुटुंबासोबत आहे ही जाणीव पण होती आणि दुसरं; त्यांना व्यक्तं व्हावं असंही वाटलं… क्या ब्बात है… हे वाचुन आणि अनुभवून मीच त्यांचा फॅन झालो आणि आता मलाच रूखरूख लागून राहीलीये की, मला त्यांच्यासोबत फोटो काढायचा होता… तो राहीला… मित्रांनो I hope ही पोस्ट तुमच्यापर्यंत पोहोचेल… कधीतरी माझ्या नाटकाला या…! मला तुमच्यासोबत फोटो काढायचाय …”
महिषासुराच्या विनाशासाठी आई तुळजाभवानीचे ‘बालरूप’, सत्य आणि धर्माच्या विजयासाठी नवा अध्याय