Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिलदार माणूस! कोणताही गाजावाजा न करता भरत जाधवने केली होती ‘या’ मराठी चित्रपटाला मदत; टिव्ही अभिनेत्याने शेअर केला किस्सा

अभिनेता भरत जाधव यांनी गेल्या २ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या अशाच एका मराठी चित्रपटाला पाठिंबा दिला होता. मात्र, आजवर याबद्दल त्यांनी कुठेही वाच्यता केलेली नाही. याविषयी स्वप्नील राजशेखर यांनी एक पोस्ट शेअर केलीये.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 29, 2025 | 07:04 PM
दिलदार माणूस! कोणताही गाजावाजा न करता भरत जाधवने केली होती 'या' मराठी चित्रपटाला मदत; टिव्ही अभिनेत्याने शेअर केला किस्सा

दिलदार माणूस! कोणताही गाजावाजा न करता भरत जाधवने केली होती 'या' मराठी चित्रपटाला मदत; टिव्ही अभिनेत्याने शेअर केला किस्सा

Follow Us
Close
Follow Us:

मराठमोळा अभिनेता भरत जाधव सध्या त्यांच्या अपकमिंग चित्रपटामुळे कमालीचे चर्चेत आहे. येत्या १ मे रोजी, भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव स्टारर ‘आता थांबायचं नाय’ चित्रपट रिलीज होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता चर्चेत असताना आणखी एका कारणामुळे अभिनेता चर्चेत आला आहे. अभिनेता स्वप्नील राजशेखर यांनी अभिनेता भरत जाधव यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरी मोलकरणीने केली चोरी, लाखो रुपयांचे दागिने लंपास

अभिनेता भरत जाधव यांनी गेल्या २ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या अशाच एका मराठी चित्रपटाला पाठिंबा दिला होता. मात्र, आजवर याबद्दल त्यांनी कुठेही वाच्यता केलेली नाही. याचविषयी अभिनेता स्वप्नील राजशेखर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये स्वप्नील यांनी भरत जाधव यांच्याबद्दलचा हा खास अनुभव शेअर केला. स्वप्नील राजशेखर हे भरत जाधवसोबत एका चित्रपटाच्या प्रदर्शन सोहळ्यासाठी गेले होते. त्या चित्रपटाला थिएटरमध्ये म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मेकर्सनी अनोखी उपाययोजना करत हा चित्रपट गावोगावी, शाळा आणि कॉलेजमध्ये दाखवण्याचा निर्णय घेतला. यादरम्यानचा प्रसंग स्वप्नील राजशेखर यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितला आहे.

 

भरत जाधवसाठी शेअर केलेल्या पोस्टमध्ये स्वप्नील राजशेखर काय म्हणाले ?

मुद्दा असतो एका सकारात्मक कृतीचा…
ती महत्वाची असते…
आणि निरपेक्ष भावनेतून केलेली कृती तर अनन्यसाधारण मोठी ठरते आजच्या जगात…

‘तेंडल्या’ नावाचा भन्नाट सिनेमा सचिन जाधव आणि चमुने अत्यंत अनेक वर्षांच्या कष्टाने बनवला.. शेत गहाण ठेवुन, गहाणवट शेतीत राबुन, त्यातला पैसा सिनेमात लावुन….
सिनेमा गेल्या १० वर्षात मराठी मधे बनलेल्या सर्वोत्तम पाचात येईल ईतका भारी झाला… पण थिएटरमध्ये त्याचं काही घडलं नाही…

नेहमीची सगळी कारणं…
वितरण न होणे, थिएटर्स न मिळणे, प्रेक्षकांची अनास्था ई.

खचुन न जाता तेंडल्याच्या मेकर्सनी “तेंडल्या तुमच्या दारी” चळवळ सुरु केली.. गावोगावी शाळा कॉलेजं सोसायटी ई. मधे जाऊन सिनेमा दाखवायचा.

या उपक्रमाची सुरुवात करताना जो प्रदर्शन कार्यक्रम झाला त्यासाठी आपला सुपरस्टार भरत जाधव आणि मी गेलो. चांगल्या सिनेमाला एक पाठिंबा म्हणुन.

भरतला सिनेमा अत्यंत आवडला. मेकर्सची जिद्द भावली.. स्वयंप्रेरणेनं त्यानं या उपक्रमाला एक रक्कम प्रदान केली..
त्याची वाच्यता कुठेही न करण्याचा अटीवर…

रक्कम त्या मेकर्सना आधार देणारी.. त्यापेक्षा भरत जाधव सारखा अभिनेता आपल्या पाठीशी उभा रहातोय ही भावना प्रचंड बळ देणारी..

त्याच्या या gesture ने सगळेच भारावले… मला व्यक्तिशः वाटलं की ही गोष्ट अनेकांना प्रेरक ठरेल…
सध्याच्या नकारात्मक वातावरणामधे अशा सकारात्मक गोष्टींचा दिलासा मिळतो…
कुणीतरी अत्यंत निरपेक्ष भावनेने कुणासाठी, विशेषतः नव्या कलावंतासाठी काही करु पहातंय हे किती आनंददायी आहे…

भरतला वारंवार विनंती करुनही तो याची जाहिर वाच्यता न करण्याच्या अटीवर ठाम होता…
शेवटी मी हट्टाने त्याच्याकडुन परवानगी न घेता ही गोष्ट लिहीतोय.. ती सांगणं महत्वाचं आहे म्हणुन…

भरत सारखे अनेक मराठी कलावंत ढिंढोरा न पिटता सर्वतोपरी समाजकार्यासाठी हातभार लावत असतात, हे मी जवळून पाहिलंय… आपली ही बाजू कळु देण्याची त्यांची वृत्ती नसते. पण हे लोकांपर्यंत पोहोचायला हवं…
गरजेचं आहे…

मराठी कलांवत पैशाने असतील, त्याहुन मनाने श्रीमंत आहेत हे समजायला हवं आपल्याच मायबाप प्रेक्षकाना…

भरत love you…

प्रिती झिंटा भाजपामध्ये प्रवेश करणार ? चाहत्याच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिले थेट उत्तर

Web Title: Marathi actor swapnil rajshekhar praises bharat jadhav for helping tendlya movie makers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 07:04 PM

Topics:  

  • Bharat Jadhav
  • marathi actor

संबंधित बातम्या

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा
1

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला
2

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला

अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन
3

अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन

का पाहावा ‘आता थांबायचं नाय’ चित्रपट? ‘ही’ आहेत ५ कारण, ज्याने बदलेल तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन
4

का पाहावा ‘आता थांबायचं नाय’ चित्रपट? ‘ही’ आहेत ५ कारण, ज्याने बदलेल तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.