"उपाध्येंचा 'राशीयोग' बरा नव्हता…"; मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत, निलेश साबळेबद्दल म्हणाले…
सध्या सोशल मीडियावर अभिनेता निलेश साबळे आणि राशीचक्रकार शरद उपाध्ये यांच्यात जोरदार शाब्दिक वाद सुरु आहे. ‘चला हवा येऊ द्या २’ या कार्यक्रमामध्ये डॉ. निलेश साबळे ऐवजी लोकप्रिय मराठमोळा अभिनेता अभिजित खांडकेकर सुत्रसंचालन करणार आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या’मध्ये राशीचक्रकार शरद उपाध्ये यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी निलेश साबळेने शरद उपाध्ये यांना शोच्या सेटवर व्यवस्थित वागणूक दिली नव्हती. त्यासंबंधित शरद उपाध्ये यांनी पोस्ट शेअर केली होती.
मुलाच्या मृत्यूची खोटी बातमी कोणी पसरवली? पोस्ट शेअर करत रेशम टिपणीस संतापली
त्या पोस्टवर प्रतिक्रिया म्हणून, निलेश साबळेने व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर देखील शेअर केली. व्हिडिओमध्ये अभिनेत्याने स्पष्टीकरण देताना म्हटले की, “तुम्ही माझ्यासाठी गुरुतुल्य आहात, तुमचा मी मोठा फॅन आहे. कृपया, यापुढे कोणत्याही गोष्टीची माहिती न घेता पोस्ट शेअर करु नका. तुम्ही पोस्टमध्ये सुरुवातीला लिहिलंय की, “निलेश साबळेला ‘झी मराठी’ने डच्चू दिला…” हे अशाप्रकारे कोणत्याही माहिती नसलेल्या गोष्टीवर व्यक्त होताना जबाबदारीने बोलणं महत्त्वाचं आहे. झी मराठीमध्ये तुमचीही ओळख आहे तुम्ही एकदा फोन करून खरी माहिती घ्यायला हवी होती. मला ‘झी मराठी’ने बाहेर काढलेलं नाही. सध्या मी एका चित्रपटाच्या शूटमध्ये व्यग्र असल्याने या प्रोजेक्टमधून मी स्वतःहून माघार घेतली आहे.”
निलेश साबळेने या वादावर स्पष्टीकरण दिलेल्या व्हिडिओवर इंडस्ट्रीतल्या अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिलेली आहे. अनेक सेलिब्रिटी निलेश साबळेच्या समर्थनार्थ आपली प्रतिक्रिया देत आहे. आता या प्रकरणावर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी फेसबूक पोस्ट शेअर करत स्पष्ट मत मांडलं आहे.
या प्रकरणात, उपाध्येना ज्या पद्धतीच्या अटेंशनची सवय वर्षानुवर्षे लागली असेल तसं आणि त्या प्रमाणात अटेंशन झी च्या त्या सेटअप मधे न मिळणं… हे सुध्दा या सगळ्याचं मूळ असु शकेल… त्यांच्यासोबत अजुन दोघे मान्यवर त्या एपिसोड मध्ये होते. शिवाय स्किटस… अशात उपाध्येंना स्वतःच्या शो मधे फोकस मिळतो तसा तिथे एकट्याला स्क्रीन टाईम किती मिळेल?
‘हवा येऊ द्या’हा वर्षानुवर्षे निलेश साबळेचा बराचसा एकखांबी तंबु राहिला आहे. लेखन दिग्दर्शन सुत्रसंचालन अशा त्यातल्या महत्वाच्या क्रिएटिव्ह बाजू एकत्रीत संभाळताना… त्यातल्या अभिनेत्यांना तालीम आणि सादरीकरण हे काम असतं… त्यामुळे कदाचित त्यांना शुटींग दरम्यान रिकामा वेळ मिळु शकेल.
पण लेखक दिग्दर्शक आणि सुत्रसंचालक.. म्हणजे एकाअर्थी त्या कार्यक्रमाचा सर्वेसर्वा असणाऱ्या निलेश साबळेला तितका फावला वेळ सेटवर मिळण्याची आणि त्याने सतत हसऱ्या चेहऱ्याने ऑफस्क्रीन सर्वाना अटेंड करत वावरत असण्याची अपेक्षा करणं हेच चुकीचं आहे. त्याला टेंशन किती असेल याची कल्पना कुणालाही करता येऊ शकते.
पण उपाध्येंना या माध्यमाची माहिती आणि सवय नसल्याने, ते स्वतः सहसा एकपात्री सादरीकरणात असल्याने त्यांची गफलत झालेली असावी… तरीही, दहा वर्षे मनात राग साठवुन राहणे आणि तो असा जाहीर व्यक्त करणे हे उपाध्येंसारख्या वयोवृद्धाकडून मुळीच अपेक्षित नाही…शिवाय समजा, खरच जर उपाध्येंचा समज झाला तसं निलेश साबळेला वगळून तो कार्यक्रम सुरु होत असता, (जे खरं नाही हे निलेशनी आपल्या व्हिडिओतून सांगातलं आहेच) तर ते निलेश साबळेसाठी आनंदाचं नक्की नसतं.. अशावेळी ‘बरं झालं, डच्चु दिला’ वगैरे अशा पद्धतीने व्यक्त होणं हे सभ्यतेला धरुनही नव्हे!
तस्मात माझ्या मते, उपाध्येंचा राशीयोग या दोन तीन दिवसात काही बरा नव्हता!!