Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अशोक मा.मा.’ मालिकेतून प्रसिद्ध अभिनेत्रीची एक्झिट, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली…

‘कलर्स मराठी’वरील ‘अशोक मा.मा.’ मालिकेतून एका अभिनेत्रीने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. याबाबत तिने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट लिहित माहिती दिली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 15, 2024 | 06:13 PM
‘अशोक मा.मा.’ मालिकेतून प्रसिद्ध अभिनेत्रीची एक्झिट, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली…

‘अशोक मा.मा.’ मालिकेतून प्रसिद्ध अभिनेत्रीची एक्झिट, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली…

Follow Us
Follow Us:

हिंदी-मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखलं जातं. अशोक मामांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलंय. सध्या त्यांची ‘कलर्स मराठी’ वरील ‘अशोक मा.मा.’ मालिका टेलिव्हिजनवर चांगलीच चर्चेचा विषय होत आहे. ही मालिका टिव्हीवर २५ नोव्हेंबरपासून रात्री ८.३० वाजल्यापासून टेलिकास्ट होत आहे. मालिकेत मुख्य भूमिकेत अशोक सराफ यांच्यासह अभिनेत्री नेहा शितोळे, रसिका वाखारकर, शुभावी गुप्ते, आशिष कुलकर्णी असे बरेच कलाकार मंडळी आहेत.

‘कलर्स मराठी’वरील ‘अशोक मा.मा.’ ही मालिका अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील अशोक मा.मा., ईरा, ईशान, भैरवी, फुलराणी ही पात्र आता घराघरात पोहोचली आहेत. पण, अशातच या मालिकेतून एका अभिनेत्रीने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. याबाबत तिने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट लिहित माहिती दिली आहे.

‘सावळ्याची जणू सावली’ फेम अभिनेत्याचा शेतकऱ्यांसाठी स्तुत्य उपक्रम; पोस्टद्वारे दिली महत्त्वाची माहिती

अभिनेत्री चैत्राली लोकेश गुप्ते हिने ‘अशोक मा.मा.’ मालिकेतून एक्झिट घेतली आहे. मालिकेत चैत्रालीने पल्लवीची भूमिका साकारली होती. पण या भूमिकेचा प्रवास संपला आहे. त्यामुळे चैत्रीली गुप्तेची ‘अशोक मा.मा.’ मालिकेतून एक्झिट झाली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये चैत्राली गुप्ते म्हणते, “अशोक मा.मा…सुखद अनुभव…खूप वर्षांनी मराठी मालिकेमध्ये काम केलं आणि त्याचा अनुभव हां खूप सुखद आणि आनंददायी होता…एकतर महाराष्ट्राचे महानायक अशोक सराफ अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके अशोक मामा त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी , स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली; ज्याचे खूप दडपण होते आणि उत्सुकता पण होती…अशोक मामा एक महान नट तर आहेतच पण एक उत्तम माणूस आहेत हे खूप जवळून अनुभवता आले. थँक्यू मामा.”

 

पुढे चैत्रालीने लिहिलं की, “शुभावी, निआ, स्वराज, आशिष, नेहा या सगळ्यांबरोबरच काम करताना खूपच मजा आली…केदार वैद्य तुझ्याबरोबर खूप वर्षांनी काम केलं त्यामुळे जुने दिवस आठवले. थँक्यू केदार शिंदे, कलर्स मराठी. तसंच निवेदिता सराफ यांची मी आभारी आहे. त्यांनी मला पल्लवी भूमिका साकारण्यासाठी प्रोत्साहन दिलं. आणि सगळ्यात जास्त आभार माझ्या प्रेक्षकांचे, ज्यांनी माझ्यावर आणि पल्लवीवर खूप प्रेम केलं. सगळ्यांचे खूप खूप आभार…लवकरच भेटूया एका नवीन भूमिकेत एका नवीन मालिकेत आणि हो पल्लवी तुम्हाला अधून मधून भेटायला येईलच.”

किरण गायकवाड- वैष्णवी कल्याणकर अडकले लग्नबंधनात, ‘लागिरं झालं जी’च्या टीमने कपलला दिल्या हटक्या पद्धतीने लग्नाच्या शुभेच्छा

Web Title: Marathi actress chaitrali gupte exit from television serial ashok mama

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2024 | 06:13 PM

Topics:  

  • marathi actress
  • Television Actress

संबंधित बातम्या

‘आली लखाबाई’ गाण्यात अमृता धोंगडेचा रौद्रावतार; हितेश मोडकच्या संगीताने वेधलं लक्ष
1

‘आली लखाबाई’ गाण्यात अमृता धोंगडेचा रौद्रावतार; हितेश मोडकच्या संगीताने वेधलं लक्ष

‘तुंबाडची मंजुळा’मध्ये सई ताम्हणकरचा नवा अवतार; नव्या दिग्दर्शकासोबत कामाचा अनुभव शेअर करत म्हणाली…
2

‘तुंबाडची मंजुळा’मध्ये सई ताम्हणकरचा नवा अवतार; नव्या दिग्दर्शकासोबत कामाचा अनुभव शेअर करत म्हणाली…

अरेंज मॅरेजनंतर आईचं निधन, मराठी अभिनेत्रीची डॉक्टर पतीसाठी भावूक पोस्ट;म्हणाली…
3

अरेंज मॅरेजनंतर आईचं निधन, मराठी अभिनेत्रीची डॉक्टर पतीसाठी भावूक पोस्ट;म्हणाली…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.