‘सावळ्याची जणू सावली’ फेम अभिनेत्याचा शेतकऱ्यांसाठी स्तुत्य उपक्रम; पोस्टद्वारे दिली महत्त्वाची माहिती
‘सावळ्याची जणू सावली’ मालिका कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मलिकेप्रमाणेच मालिकेतील कलाकार मंडळीही सध्या चर्चेत आले आहेत. मालिकेतल्या कलाकार मंडळींचा सोशल मीडियावर फार मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेता मयूर खांडगेने मालिकेत जगन्नाथ नावाची खलनायिका भूमिका साकारलीये. आपल्या खलनायिकी भूमिकेमुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्याने शेतकऱ्यांना आणि भविष्यात सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल, असा त्याने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. नेमका उपक्रम काय आहे ? हे अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितले.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेता मयूर खांडगे म्हणतो, “कृषीथॉन फेस्टिवल २०२४ (नाशिक)
अभिनय, शेती आणि शेतकरी नेहमीच माझ्या आवडीचा जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा विषय. अभिनय करता करता शेतकऱ्यासाठी सुद्धा काहीतरी करावं असं नेहमी वाटायचं. पण काय ते कळत नव्हतं. कारण जे करायचं होतं ते आज उद्या आणि भविष्यात शेतकऱ्यासाठी त्याच्या कुटुंबासाठी आणि भविष्यात आपल्या मूलबाळांच्या भविष्यासाठी सुद्धा उपयोगी असेल अस काहीतरी. त्याचा शोध घेता घेता ‘माने ग्रो ऍग्रो’ या कंपनीच्या संपर्कात आलो. ह्या कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी अतिउत्तम अशा प्रतीचे सेंद्रिय खत तयार केल आहे. रासायनिक खतांच्या कंपन्यांनी शेतकऱ्यांना केमिकल वापरायला भाग पाडून शेतकऱ्याचं आणि शेतकऱ्यांच्या जमिनीचे जे नुकसान केलंय ते अतिशय भयंकर आहे.”
“काही शेतकऱ्यांच्या ते लक्षात आलंय आणि काही शेतकऱ्यांच्या अजूनही ते लक्षात येत नाहीये. कारण शेतकऱ्याकडे काही गोष्टींना पर्याय नसतो. आणि याचाच फायदा केमिकल कंपन्यांनी घेतला. अशाच भयंकर केमिकल वापरलेल्या जमिनीत तयार होणारा सगळा भाजीपाला तुम्ही मी आपलं कुटुंब खातोय आणि त्यातूनच नको तितक्या आजारांना आपण बळी पडतोय. वेळीच सेंद्रिय खताचा वापर करून तयार केलेला शेतीमाल जर आपल्यापर्यंत आला नाही तर याचे परिणाम भविष्यात खूप वाईट होणार यात शंका नाही. मी माझ्या परीने प्रयत्न करतोय की हे सेंद्रिय खत शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत कसं जाईल, खतात होणारा जास्तीचा खर्च शेतकऱ्याचा कसा कमी होईल ,आणि शेतकरी आणि त्याची जमीन कशी टिकेल यासाठी मी प्रयत्न करतोय.”
“हे तर देशाचे हनुमान…” अभिनेता वरुण धवन गृहमंत्री अमित शाह यांना असं का म्हणाला ?
“त्यासाठी मी हे सेंद्रिय खत शेतकऱ्यांसाठी घेऊन माझ्यापरीने मी एक पाऊल पुढे टाकलं आहे. तुम्हा सगळ्यांना माझी विनंती की तुम्ही सुद्धा या उत्तम विचारासाठी मला पाठबळ द्यावं आणि माझी सोबत करावी… या कार्यात यश मिळेल की अपयश याची मला खरच कल्पना नाही पण हे व्हावं अशी अतिशय मनापासून इच्छा आहे. माझ्या अभिनयावर तुम्ही इतकं मनापासून प्रेम करत आहात तर माझ्या ह्या कार्यासाठी सुद्धा तुम्ही मला सोबत कराल अशी आशा बाळगतो. बळीराजाचा विजय असो…”