Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्राजक्ता माळीची ‘मुंबई-पुणे-मुंबई’ कविता ऐकली का ? पाहा Video

पुण्यात झालेल्या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिची एक कविता सादर केली. प्राजक्ताच्या कवितेचं नाव 'मुंबई-पुणे-मुंबई' असं असून तिने कविता सादर करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 17, 2024 | 03:18 PM
प्राजक्ता माळीची 'मुंबई-पुणे-मुंबई' कविता ऐकली का ? पाहा Video

प्राजक्ता माळीची 'मुंबई-पुणे-मुंबई' कविता ऐकली का ? पाहा Video

Follow Us
Close
Follow Us:

प्राजक्ता माळी मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर आणि फॅशनच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नुकतंच प्राजक्ता माळीचा महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून नवोदित कवयित्री म्हणून ‘सुनीताबाई स्मृती साहित्य पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आलं आहे. प्राजक्ता माळीच्या पहिल्यावहिल्या ‘प्राजक्तप्रभा’ या कवितासंग्रहाला हा पुरस्कार मिळाला आहे. पुण्यात झालेल्या ह्या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रीने तिची एक कविता सादर केली. प्राजक्ताच्या या कवितेचं नाव ‘मुंबई-पुणे-मुंबई’ असं असून तिने कविता सादर करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

‘लाफ्टर शेफ’ मनोरंजनासाठी सज्ज; स्पर्धकांची नावे उघड, होणार नवीन चेहऱ्यांचा समावेश!

 

प्राजक्ता माळीची ‘मुंबई-पुणे-मुंबई’ कविता

पुणे-मुंबई-पुणे नाही आता ‘मुंबई-पुणे-मुंबई’ असा प्रवास करतो आम्ही…
जरी वाढलो पुण्यात, तरी कामानिमित्त मुंबईला राहतो हे अभिमानानं सांगतो आम्ही…
पुणं कठोर, कर्तव्यदक्ष… चुकल्यास कान पिळणाऱ्या बापासारखं…
तर मुंबई…सर्वांना मायेनं सांभाळून घेणारी आई वाटते आम्हांस…
आम्हाला सतत धावणारी, उत्साहानं भारलेली मुंबई आवडतेच…
आणि निवांत, मोकळढाकळं पुणंही खास…
चालत असतानाही, थांबून पत्ता सांगणाऱ्या ‘Helpfull’ मुंबईकरांचं कौतुक…
आणि spoon feeding न करता मेंदूचा उपयोग करायला भाग पाडणाऱ्या पुणेकरांचंही रास्त…

कामासमोर तहानभूक विसरणाऱ्या मानसिकतेचाही आदर…
आणि ज्या पोटासाठी सगळी उठाठेव चाललीय तिकडे कधीच दुर्लक्ष न करणाऱ्यांचंही बरोबर…
कधीच न झोपणाऱ्या आणि दुपारीही १-४ झोपणाऱ्या अशा दोन्ही शहरात व्यवस्थित Adjust होतो आम्ही…
मुंबईचं ट्राफिक आणि पुणेरी पाट्या अशा दोन्हीकडच्या कोपरखळ्या गोड हसत पचवतो आम्ही…
मुंबईचा वडापाव आणि पुण्याची मिसळ Diet बाजूला ठेवून तितक्याच आवडीनं खातो आम्ही…
अहो, एवढंच नाही…तर ह्या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या Expresswayच्याही प्रेमात आहोत आम्ही…
एक शहर Extra self respect शिकवतं.. दुसरं Extra flexibility
एकीकडे डोंगरमाथा दुसरीकडे समुद्र खाडी…
खरं तर नशीबवान आहोत, अशा दोन्ही शहरांच्या सानिध्यात वाढतोय…
सांस्कृतिक-आर्थिक अशा सगळ्या बाजूंनी प्रगल्भ होतोय…

प्राजक्ता माळीची ही मुंबई आणि पुण्यावरची नवीन कविता चाहत्यांच्या पसंदीस पडली आहे. तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. तर काही सेलिब्रिटींनीही प्राजक्ताच्या या कवितेला दाद दिली आहे.

मराठी इंडस्ट्रीत पहिल्यांदाच घडतंय, ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’चित्रपटाचा थिएटमरमध्ये नाही तर ‘इथे’ होणार प्रीमियर; वाचा केव्हा आणि कधी

 

Web Title: Marathi actress prajakta mali shared mumbai pune mumbai poem video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 03:18 PM

Topics:  

  • marathi actress
  • prajakta mali
  • Television Actress

संबंधित बातम्या

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ
1

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ

Prajakta Mali Birthday: कधी नृत्याने केले घायाळ तर, कधी अभिनयाने चाहत्यांना पाडली भुरळ; असा होता ‘फुलवंती’ चा संपूर्ण प्रवास
2

Prajakta Mali Birthday: कधी नृत्याने केले घायाळ तर, कधी अभिनयाने चाहत्यांना पाडली भुरळ; असा होता ‘फुलवंती’ चा संपूर्ण प्रवास

मालिकेतील येसुबाईंच्या खऱ्या आयुष्यात आले शंभूराज! प्राजक्ताच्या साडीवर कोरले तिच्या ‘अहों’चे नाव
3

मालिकेतील येसुबाईंच्या खऱ्या आयुष्यात आले शंभूराज! प्राजक्ताच्या साडीवर कोरले तिच्या ‘अहों’चे नाव

पांढऱ्या शुभ्र मिनी ड्रेसमध्ये अश्विनी चवरेचा बार्बी लूक व्हायरल, अभिनेत्रीच्या फॅशन अन् ग्लॅमरची चर्चा
4

पांढऱ्या शुभ्र मिनी ड्रेसमध्ये अश्विनी चवरेचा बार्बी लूक व्हायरल, अभिनेत्रीच्या फॅशन अन् ग्लॅमरची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.