(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
कलर्स वाहिनीवरील अप्रतिम शो ‘लाफ्टर शेफ’ हा हास्याने भरलेला आणि प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा शो पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. आता शोच्या नवीन सीझनबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. या शोने पहिल्या सीझनमध्ये प्रेक्षकांची मने जिंकली होती, त्यानंतर शोचा पहिला सीझन बंद झाल्यामुळे चाहते खूप दुःखी झाले होते. या शोने चाहत्यांचे जबरदस्त मनोरंजन केले. आणि प्रेक्षकांनी या शोला भरपूर प्रेम दिले.
‘लाफ्टर शेफ्स 2’ होणार सुरु
या शोने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. भारती सिंग आणि शेफ हरपाल सिंग सोखी यांनी होस्ट केलेल्या या शोचा पहिला सीझन प्रचंड गाजला होता आणि आता त्याच्या दुसऱ्या सीझनबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शोचा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांसाठी सादर होणार आहे आणि यावेळी शोमध्ये पूर्वीपेक्षा अधिक मजेदार आणि मनोरंजक ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. तर या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नावे समोर आली आहेत जे यावेळी नवीन सीझनमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत. यासोबतच बिग बॉस 18 संपताच हा शो सुरू होणार असल्याचे समोर आले आहे.
🚨 BREAKING! Laughter Chefs is coming with season 2 but with the new cast
Elvish Yadav, Rubina Dilaik, Abdu Rozik, Abhishek Kumar, Krushna Abhishek, Sudesh Lahiri, and Mallika Sherwat are confirmed to participate.
From Bigg Boss 18, Vivian Dsena is likely to on board.
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) December 16, 2024
‘लाफ्टर शेफ सीझन 2’ मध्ये कोण आहे?
दुसऱ्या सीझनमध्ये काही नवीन आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचाही समावेश केला जाणार आहे. जे शोची शोभा आणखी वाढवणार आहेत. यावेळेस कोणते स्टार्स या शोचा भाग असणार आहेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर, ‘लाफ्टर शेफ्स 2: एंटरटेनमेंट अनलिमिटेड’मध्ये अनेक प्रसिद्ध नावं दिसणार आहेत. यावेळी शोमध्ये अभिषेक कुमार, एल्विश यादव, अब्दू रोजिक आणि रुबिना डिलाईक सारखे मोठे स्टार्स सहभागी होताना दिसणार आहेत. यासोबतच मल्लिका शेरावतलाही या शोमध्ये आणण्याची योजना आखली जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे, ज्यामुळे शोमध्ये आणखी मजा येईल.
भारती आणि कृष्णा अभिषेक पुन्हा एक भाग असणार आहेत
यावेळी कृष्णा अभिषेक, सुदेश लाहिरी आणि भारती सिंग यांना शोमध्ये कायम ठेवले जाणार आहे, तर शेफ हरपाल सिंगही त्यांची जादू चालवणार असल्याचे वृत्त आहे. याशिवाय ‘बिग बॉस 18’ चा स्पर्धक विवियन डिसेना देखील शोमध्ये सामील होऊ शकतो, जो शोमध्ये थ्रिल आणि मनोरंजनाची भर घालणार आहे. या बातमीने चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
Swapnil Joshi: स्वप्नील जोशीचे गुजराती चित्रपटसृष्टीत पदार्पण, ही अभिनेत्री काम करण्यासाठी उत्सुक!
शो कधी प्रसारित होईल?
हा शो कधी चाहत्यांमध्ये रिलीज होणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ‘लाफ्टर शेफ सीझन 2’ जानेवारी 2025 मध्ये ऑन-एअर होईल. हा शो ‘बिग बॉस 18’ ची जागा घेईल, जो प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहील. त्यामुळे तुम्हालाही हसण्याचा आणि स्वयंपाकाचा आनंद घ्यायचा असेल, तर तयार राहा कारण ‘लाफ्टर शेफ सीझन 2’ लवकरच तुमच्या टीव्ही स्क्रीनवर येण्यासाठी सज्ज झाला आहे.