Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुबोध भावेचा ‘संगीत मानापमान’ पाहून गायक सलील कुलकर्णी भारावला, पोस्ट शेअर करत केले कलाकारांचे कौतुक

सर्वच क्षेत्रातून 'संगीत मानापमान' चित्रपटाचे कौतुक केले जात आहे. गायक सलील कुलकर्णी यांनी सुबोध भावेंचा 'संगीत मानापमान' चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 12, 2025 | 08:10 PM
सुबोध भावेचा 'संगीत मानापमान' पाहून गायक सलील कुलकर्णी भारावला, पोस्ट शेअर करत केले कलाकारांचे कौतुक

सुबोध भावेचा 'संगीत मानापमान' पाहून गायक सलील कुलकर्णी भारावला, पोस्ट शेअर करत केले कलाकारांचे कौतुक

Follow Us
Close
Follow Us:

मराठी भारतीय सिनेसृष्टीमध्ये, सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ या मराठी चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होताना दिसत आहे. ‘संगीत मानापमान’ चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत सुबोध भावेसह वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुळकर्णी, निवेदिता सराफ आणि सुमीत राघवन हे कलाकार आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची चर्चा होताना दिसत आहे. सुबोध भावेचा ‘संगीत मानापमान’ हा चित्रपट जणू संगीतप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. ‘संगीत मानापमान’ सिनेमातील गाणी, कलाकारांचा अभिनय या सर्व गोष्टींची सिनेरसिकांना पसंतीस उतरत आहेत. ‘कट्यार काळजात घुसली’नंतर सुबोध भावे ‘संगीत मानापमान’च्या निमित्ताने दुसऱ्यांदा दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. दरम्यान, सर्वच क्षेत्रातून या चित्रपटाचे कौतुक केले जात आहे. गायक सलील कुलकर्णी यांनी सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

टिकू तलसानिया यांच्या पत्नीने दिली प्रकृतीबद्दल दिली धक्कादायक माहिती; म्हणाल्या, “हार्ट अटॅक नाही तर…”

 

गायक सलील कुलकर्णी यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये, चित्रपटासोबतच चित्रपटातील कलाकाराचेही कौतुक केले आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये सलील कुलकर्णी म्हणतात,

“संगीत मानापमान…!! तुम्ही बघाच आणि मुलांनाही घेऊन जा !! तुम्ही लहानपणी अमर चित्र कथा वाचली आहे ना? त्यात राजा, राजकन्या, सेनापती, युद्ध… हे वाचतांना डोळे विस्फारून तुम्ही त्या काळात गेला आहात ना? त्यातल्या एकेक पात्राचा आवाज तुम्हाला ऐकू यायचा? मला कायम यायचा… त्यांचं बोलणं ऐकू यायचं… आज खूप खूप वर्षांनी सुबोध भावेने पुन्हा एकदा मला एक अमर चित्र कथा दाखवली आणि ती सुद्धा अत्यंत रंजक आणि हळूवार पद्धतीने! चांदोबा मधली परीकथा वाचतांना आलेली मजा, तिच निरागसता आणि सच्चेपणा मला खूप आवडला… सुबोधच्या आणि त्याने साकारलेल्या धैर्यधराच्या डोळ्यांत ते सच्चेपण चित्रपटभर दिसतं… सुबोध आणि शंकर महादेवन एकत्र आले की ते एक अफाट सांगीतिक अनुभव देतातच… खूप मोठे मोठे गायक कलाकार आहेत आणि ते सर्व कमाल गायले आहेतच. समीर सामंत हा आमचा कवीमित्र अनेक प्रकारे शब्दांची ताकद घेऊन वेगवेगळ्या संगीत प्रकारांना भिडला आहे… पण , घरात अनेक यशस्वी लोकं असतांना, एक आजोबा येतात आणि असा काही विचार मांडतात की सगळे स्तब्ध होतात, तसं हृषीकेश बडवेच्या आवाजात जेव्हा “रवी मी” आणि आर्याच्या आवाजातलं “मला मदन भासे हा” आणि प्रियांकाच्या आवाजातलं “नाही मी बोलत” येतं आणि आपण सगळेच ११२ वर्षांपूर्वी केलेल्या या गाण्यांना सलाम करतो… युद्धाच्या प्रसंगाच्या मागे “प्रेम सेवा शरण” असावं… यासाठी सुबोध आणि शंकरजींना द्यावी तेवढी दाद कमी आहे. सुमीत राघवन प्रत्येक कलाकृतीत आपल्याला भारावून टाकतोच… डॉ.लागू म्हणून त्याने केलेला डोळ्यांचा वापर आणि इथे केलेला वापर इतका कमाल आहे की डोळे आणि नजर ह्यातून काय आणि किती व्यक्त होऊ शकतं हे जाणवतं… उपेंद्र लिमये, अर्चना निपाणकर ,नीना कुळकर्णी, निवेदिता सराफ सगळेच उत्तम आणि शैलेश दातार या आमच्या गुणी मित्राला इतकी छान आणि मोठी भूमिका मिळाली आणि त्याने ती उत्कृष्ट साकारली ह्याचा खूप आनंद आहे. वैदेही परशुरामीसाठी एक स्वतंत्र लेखच लिहावा लागेल किंवा कदाचित एखादं गाणंच करावं लागेल, इतकी अप्रतिम भूमिका तिने केली आहे… !! आज तिने तिचा एक मोठा फॅन तयार केला एवढं नक्की…”

Web Title: Marathi singer saleel kulkarni praises subodh bhave sangeet manapman movie shared special post on instagram

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2025 | 08:10 PM

Topics:  

  • marathi film

संबंधित बातम्या

१२ वर्ष लिव्ह-इन रिलेशननंतर अभिनेता सारंग साठ्येनं केले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले PHOTO
1

१२ वर्ष लिव्ह-इन रिलेशननंतर अभिनेता सारंग साठ्येनं केले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले PHOTO

‘लास्ट स्टॉप खांदा…’ चित्रपटाचे कलरफुल पोस्टर लाँच, श्रमेश बेटकरसोबत दिसणार ‘ही’ अभिनेत्री
2

‘लास्ट स्टॉप खांदा…’ चित्रपटाचे कलरफुल पोस्टर लाँच, श्रमेश बेटकरसोबत दिसणार ‘ही’ अभिनेत्री

‘बिन लग्नाची गोष्ट’ मधील पाहिलं गाणं रिलीज, प्रिया बापट आणि भारती आचरेकरचा लाभला आवाज
3

‘बिन लग्नाची गोष्ट’ मधील पाहिलं गाणं रिलीज, प्रिया बापट आणि भारती आचरेकरचा लाभला आवाज

Bal Karve: ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4

Bal Karve: ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.