Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“गाडगेबाबांबद्दल वाचलं की मला…”, अभिनेता किरण मानेनी शेअर केली संत गाडगे महाराजांबद्दल खास पोस्ट

आज संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिनेता किरण मानेने खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने त्यांचे विचार शेअर केले आहेत.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 20, 2024 | 03:27 PM
"गाडगेबाबांबद्दल वाचलं की मला...", अभिनेता किरण मानेनी शेअर केली संत गाडगे महाराजांबद्दल खास पोस्ट

"गाडगेबाबांबद्दल वाचलं की मला...", अभिनेता किरण मानेनी शेअर केली संत गाडगे महाराजांबद्दल खास पोस्ट

Follow Us
Close
Follow Us:

संत गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात एक किर्तनकार आणि समाजसुधारक म्हणून प्रसिद्ध होते. आज त्यांची पुण्यतिथी आहे. संत गाडगे महारांजांचं संपूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असं होतं. ते समाज प्रबोधन करण्यासाठी विविध गावांमध्ये भटकायचे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करायचे. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्याची शिकवण गाडगेबाबा देत. गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे ते समाजसुधारक होते.

‘पॉवर पॅक आणि जबरदस्त असेल कथा’, मिर्झापूर चित्रपटाबाबत ‘गोलू’चा मोठा खुलासा!

 

आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मराठमोळा अभिनेता किरण मानेने खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने त्यांचे विचार शेअर केले आहेत. संत गाडगे महाराज अभिनेता किरण मानेने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की,

“गाडगेबाबांबद्दल वाचलं की मला माझ्या आज्ज्याची, नानाची आठवण येते… माझा आज्जा, नाना वारकरी होता. अशिक्षित असुनबी तुकारामगाथा तोंडपाठ होती. तर, त्याच्या ट्रंकेत छोट्या-छोट्या डब्या, थैल्या असायच्या. आज्जा वर्षभर त्यात नाणी साठवून ठेवायचा. दहा पैसे, चार आणे, आठ आणे, रूपया.. आषाढीची पालखी निघंस्तोवर त्या गच्च भरायच्या. आज्जा रूबाबात वारीला निघायचा. बेभान होऊन ग्यानबा-तुकारामच्या गजरात नाचत-नाचत पंढरीला निघायचा…पंढरीला पोचल्यावर मात्र इठोबाच्या दर्शनाची लै आस नसायची त्याला. “ “पंढरीची माती कपाळाला लावून, कळसाचं दर्शन घिवून, समोर यिल त्या वारकर्‍याच्या पाया पडत थेट चंद्रभागेच्या वाळवंटात पोचायचा. तिथं गोरगरीब, भुकेले भिकारी, महारोगी बसलेले असायचे तिथं जायचा आणि त्याच्या डबीतला आन् थैल्यांमधला सगळा खजिना हळूहळू वाटायला सुरूवात करायचा…काहीजणांना खायला घेऊन द्यायचा.. सगळे तृप्त होऊन हसले की गडी खुश ! म्हणायचा, “चलंय दिनकर, किरन्या चल, झाली वारी.” आम्ही म्हणायचो, “दर्शन?” म्हणायचा, “या घिवून. जा.” आन् तिथंच त्या गोरगरीबांच्यात सावली बघून धोतर तोंडावर घेऊन सुखात झोपी जायचा ! गाडगेबाबांशी नाळ जोडणारं हाय का नाय ह्ये भावांनो? जवानीत आज्ज्यानं गाडगेबाबांची किर्तनं ऐकली होती… त्याचा प्रभाव जाणवायचा प्रत्येक कृतीत… गाडगेबाबा म्हणायचे,”संत तुकाराम माझा गुरू. माझा कुनी शिष्य नाय.” हेच विचार अंगीकारलेवते माझ्या आज्ज्यानं.” “कधी कुणाकडून पाया पडून घेत नसे माझा आज्जा ! गाडगेबाबांसारखाच. अडाणी असून माझ्या आज्ज्यानं घरात कधीच अंधश्रद्धेला थारा दिला नाय.. दारात आलेल्या याचकाला भुकेल्यापोटी परत पाठवलं नाय.. गाडगेबाबा म्हणायचे की, “शिक्षण ही लै मोठी गोष्ट हाय. जर तुमच्याकडं पैसं नसत्याल तर घरातली भांडी इका.. बायकापोरांसाठी स्वस्तातली कापडं खरेदी करा.. मोडक्या तोडक्या घरात र्‍हा, पण पोरापोरींना शिक्षन दिल्याशिवाय राहू नका.” माझ्या आज्ज्यानं हेच केलं ! लोकांकडं मजूरी केली. विहीरी खणल्या. मुंबैत जाऊन हमाली केली. लै गरीबीत दिस काढलं. पण एका पोराला-माझ्या बापाला इंजिनीयर केलं… दुसर्‍या पोराला-माझ्या चुलत्याला शिक्षक बनवलं. उरलेले दोघं शेतीत रमले. अप्रत्यक्षरीत्या का होईना, पण गाडगेबाबांचे संस्कार आज्ज्यानं आमच्यात रूजवले ! …कुठल्याबी गांवात गेल्यावर दिवसा गावातली घाण खराट्यानं स्वच्छ करायची आणि रात्री त्याच गावातल्या अडाणी बहुजनांच्या लोकांच्या डोक्यातली वाईट विचारांची घाण किर्तनानं दूर करायची, हे व्रत घेतलेल्या..विचारांनी अनेक पिढ्यांचं कल्याण करनार्‍या संत गाडगेबाबांना कोटी कोटी प्रणाम.”

Web Title: Marathi television actor kiran mane shared saint gadge maharaj post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2024 | 03:27 PM

Topics:  

  • Kiran Mane
  • marathi actor

संबंधित बातम्या

‘जिप्सी’ विशेष प्रदर्शन गाजलं! प्रेक्षकांनी दिला भरभरून प्रतिसाद; प्रशांत साजणीकरांची मुलाखत चर्चेत
1

‘जिप्सी’ विशेष प्रदर्शन गाजलं! प्रेक्षकांनी दिला भरभरून प्रतिसाद; प्रशांत साजणीकरांची मुलाखत चर्चेत

फिरसत्या देवाचा कोप अन् रहस्यमयी, गूढ कहाणी; ‘असुरवन’ चित्रपटाचा शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित, सोशल मीडियावर चर्चा
2

फिरसत्या देवाचा कोप अन् रहस्यमयी, गूढ कहाणी; ‘असुरवन’ चित्रपटाचा शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित, सोशल मीडियावर चर्चा

परदेशात फुलला मराठी रोमान्स!‘आसा मी अशी मी’ चा पोस्टर लाँच, डॅशिंग लूकने वेधले प्रेक्षकांचे लक्ष
3

परदेशात फुलला मराठी रोमान्स!‘आसा मी अशी मी’ चा पोस्टर लाँच, डॅशिंग लूकने वेधले प्रेक्षकांचे लक्ष

मराठी रंगभूमीचा जादूगर कपिल भोपटकर, ‘असंभव’ चित्रपटाने चर्चेत, ‘या’ तारखेला IFFI मध्ये होणार प्रदर्शित
4

मराठी रंगभूमीचा जादूगर कपिल भोपटकर, ‘असंभव’ चित्रपटाने चर्चेत, ‘या’ तारखेला IFFI मध्ये होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.