फोटो सौजन्य - Social media
श्वेता त्रिपाठीने ‘मिर्झापूर’मधील गोलू या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लोकांनी अभिनेत्रीला ओटीटी अभिनेत्री म्हणूनही टॅग केले आहे. श्वेता तिच्या मिर्झापूर फिल्म आणि ‘ये काली काली आँखे’ या दोन प्रसिद्ध शोमुळे चर्चेत असते. अभिनेत्रीने या वर्षात अनेक यश संपादन केले आहे, परंतु ती यावर समाधानी नाही. आता यासोबतच श्वेताने मिर्झापूर चित्रपटाबाबत एक मोठे अपडेट शेअर केले आहे.
मिर्झापूर चित्रपटासाठी श्वेता खूप उत्साहित आहे
स्क्रीनला दिलेल्या मुलाखतीत श्वेताने मिर्झापूर या चित्रपटाविषयीची तिची उत्सुकता शेअर केली. श्वेता म्हणाली, ‘मिर्झापूर चित्रपटाचा पहिल्या सीझनशी काहीही संबंध नाही. मुन्ना भैया म्हणजेच दिव्येंदू शर्मा देखील त्याचा एक भाग आहे. मुन्ना भैय्या जिवंत असताना आणि कदाचित स्वीटीही जिवंत असल्याच्या काळावर हे आधारित आहे. आतापर्यंत आम्हाला निर्मात्यांकडून कोणताही फोन आलेला नाही.’ असे देखील अभिनेत्रीने सांगितले आहे.
मालिकेपेक्षा चित्रपट चांगला असेल
श्वेता पुढे म्हणाली, ‘माझ्या मते हा चित्रपट पॉवर पॅक असणार आहे. यात पात्रांचा एक वेगळा स्वॅग पाहायला मिळणार आहे. वेब सीरिजपेक्षाही प्रेक्षकांना हा चित्रपट अधिक आवडणार आहे. मी फक्त निर्मात्यांच्या फोनची वाट पाहत आहे. कारण मला माहित आहे की चित्रपटाची स्क्रिप्ट हृदय पिळवटून टाकणारी असेल. मिर्झापूरच्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनचा लेखक पुनीत कृष्णा माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक आहे.’ असे तिने सांगितले.
अभिनेत्री उत्साहित आहे
अभिनेत्रीने पुढे खुलासा केला की, ‘चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे कारण स्क्रिप्ट अद्याप लिहिली जात आहे. हा चित्रपट वेब शोपेक्षा पूर्णपणे वेगळा असणार आहे. मिर्झापूर चित्रपटात वेब सिरीजमधील कोणताही आशय घेतला जाणार नाही. हा चित्रपट प्रेक्षकांच्या उत्साहाला नक्कीच न्याय देईल. मी देखील चित्रपटाच्या शूटिंगसाठी खूप उत्सुक आहे.’ असे अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले आहे.