Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काहीतरी हटके! रंगमंचावर पहिल्यांदाच लाईव्ह ट्रेलर; ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी’चा हटके प्रयोग

आमच्या पिढीची गोष्टच वेगळी! या नाटकाचा लाईव्ह ट्रेलर रंगमंचावर सादर करण्याचा अनोखा प्रयोग चर्चेत आहे. १ मे २०२६ रोजी जर तर ची गोष्ट च्या ३५० व्या प्रयोगादरम्यान हा खास ट्रेलर सादर होणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 29, 2026 | 05:26 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

मराठी रंगभूमीवर प्रयोगशीलतेची नवी दिशा दाखवत आमच्या पिढीची गोष्टच वेगळी! हे नाटक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पोस्टर आणि हटके प्रोमोमुळे आधीच चर्चेत आलेल्या या नाटकाने आता आणखी एक अनोखा प्रयोग सादर करण्याचा निर्णय घेतला आहे—तो म्हणजे ‘लाईव्ह ट्रेलर’. आतापर्यंत ट्रेलर हा स्क्रीनवर पाहायचा अनुभव असतो, मात्र या नाटकाचा ट्रेलर थेट रंगमंचावर, कलाकारांच्या जिवंत अभिनयातून सादर केला जाणार आहे.

RSS च्या इतिहासाची अनोखी झलक! संजय दत्तच्या ‘Aakhri Sawaal’ मधील दमदार गाण्याचा BTS व्हिडिओ समोर

१ मे २०२६ रोजी जर तर ची गोष्ट या लोकप्रिय नाटकाच्या ३५० व्या प्रयोगादरम्यान हा खास लाईव्ह ट्रेलर सादर होणार आहे. एकीकडे एका यशस्वी नाटकाचा मैलाचा दगड साजरा होत असताना, त्याच मंचावर नव्या नाटकाची झलक अनुभवायला मिळणार असल्यामुळे हा कार्यक्रम अधिकच खास ठरणार आहे. प्रकाशयोजना, संगीत आणि थेट परफॉर्मन्स यांच्या मदतीने सादर होणारा हा ट्रेलर प्रेक्षकांना नाटकाचा ‘फील’ प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी देणार आहे.

हे नाटक एका कुटुंबातील तीन वेगवेगळ्या पिढ्यांमधील नातेसंबंध, विचारसरणी आणि बदलत्या जीवनशैलीतील संघर्ष हलक्याफुलक्या आणि रिलेटेबल शैलीत मांडणार आहे. त्यामुळे तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील प्रेक्षकांना हे नाटक आपलंसं वाटेल, असा विश्वास निर्मात्यांना आहे. सोनल प्रॉडक्शन्स नेहमीच मार्केटिंगमध्ये नावीन्य आणण्यासाठी ओळखले जाते. ‘दादा एक गुड न्यूज आहे’पासून त्यांनी वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच परंपरेतून हा लाईव्ह ट्रेलरचा प्रयोग साकारला जात आहे. निर्माते नंदू कदम यांनीही पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन नवनवीन माध्यमांचा वापर करण्याची गरज अधोरेखित केली आहे.

गौरी इंगवलेची TV क्षेत्रात दमदार Entry! प्राजक्ता गायकवाडसह ‘या’ मालिकेत झळकणार अभिनेत्री

या नाटकात सुनील बर्वे, हर्षदा खानविलकर, अक्षर कोठारी, शर्मिला राजाराम शिंदे, शंतनू ठवळी आणि वैष्णवी आंबवणे यांची दमदार कलाकार फळी पाहायला मिळणार आहे. नाटकाचे लेखन अमोल पाटील यांनी केले असून दिग्दर्शन अद्वैत दादरकर करत आहेत, तर सादरीकरण प्रिया बापट यांच्याकडून होत आहे. या अनोख्या लाईव्ह ट्रेलरमुळे ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ या नाटकाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. १ मे रोजी यशवंतराव नाट्यगृह येथे सायंकाळी चार वाजता होणाऱ्या या सादरीकरणात नेमकं काय पाहायला मिळणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: A live trailer on stage for the very first time for amchya pidhichi goshtch vegli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 05:26 PM

Topics:  

  • Action Drama

संबंधित बातम्या

Tula Pahata : अभिनेत्री निशिगंधा वाड यांचे ‘तुला पाहता’ चित्रपटातून कमबॅक; तीन पिढ्यांची भावस्पर्शी कथा प्रेक्षकांसमोर
1

Tula Pahata : अभिनेत्री निशिगंधा वाड यांचे ‘तुला पाहता’ चित्रपटातून कमबॅक; तीन पिढ्यांची भावस्पर्शी कथा प्रेक्षकांसमोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.