(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Raja Shivaji Movie : ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील दुसरे भव्य गीत ‘जय शिवराय’ प्रदर्शित!
आता निर्मात्यांनी या चित्रपटातील एका दमदार गाण्याचा बीटीएस (BTS) व्हिडिओ रिलीज केला आहे, जो नक्कीच प्रेक्षकांच्या मनाला भिडेल. ‘नमस्ते सदा वत्सले’ या गाण्यात जोशपूर्ण आणि प्रभावी संगीत ऐकायला मिळते, जे आपल्याला जाणवून देते की या गाण्यातील प्रत्येक शब्द हा केवळ गाणे नसून एक वारसा आहे. ही एक गहन भावना आहे, जी आपल्या मातृभूमीला वंदन करते.
‘आखरी सवाल’च्या निर्मात्यांनी शुटच्या वेळीचे काही क्षण पोस्ट करत त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे: “एखाद्या खरोखरच दमदार गोष्टीच्या निर्मितीची झलक. प्रत्येक धूनचा एक उद्देश आहे आणि प्रत्येक शब्द एक वारसा आहे. ‘नमस्ते सदा वत्सले’ हे फक्त एक गाणे नाही, तर एक भावना आहे. असं लिहीत तिने #RSSPrarthana #NamasteSadaWatsale हे हॅशटॅग दिले आहेत. 8 मे रोजी फक्त सिनेमागृहात आपले उत्तर जाणून घेण्यासाठी तयार राहा. असं ही त्यांनी म्हटलं आहे.
‘आखरी सवाल’चे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग यांनी केले आहे. निखिल नंदा प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते निखिल नंदा आणि संजय दत्त आहेत. तर पुनीत नंदा, डॉ. दीपक सिंह, गौरव दुबे आणि उज्ज्वल आनंद हे सह-निर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादउत्कर्ष नैथानी यांनी लिहिले आहेत. हा चित्रपट 8 मे 2026 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
Exclusive: ‘आई तुळजाभवानी’च्या अलौकिक विवाहाचा हा अनुभव खूपच अद्भुत – पूजा काळे






